Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माढा लोकसभा निवडणूक आता नेत्यांची नसून कार्यकर्त्यांची; कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक, भाजपच्या विजयाला लागेल ‘ब्रेक’

भारतीय जनता पक्षाकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची घोषणा झाली आणि सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून मोहिते-पाटील समर्थक कार्यकर्त्यांकडून विरोधाची प्रचंड मोठी त्सुनामी आली. 'जे एक लाखाचे लीड देऊ शकतात, ते एक लाखाने मायनस मतदान करु शकतात', अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया आता कार्यकर्ते उघडपणे व्यक्त करताना दिसत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 16, 2024 | 12:46 PM
BJP

BJP

Follow Us
Close
Follow Us:

अकलुज : भारतीय जनता पक्षाकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची घोषणा झाली आणि सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून मोहिते-पाटील समर्थक कार्यकर्त्यांकडून विरोधाची प्रचंड मोठी त्सुनामी आली. ‘जे एक लाखाचे लीड देऊ शकतात, ते एक लाखाने मायनस मतदान करु शकतात’, अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया आता कार्यकर्ते उघडपणे व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीसाठी सहज वाटणारा विजयाला कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक ब्रेक लावणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील चार तालुके येतात तर सातारा जिल्ह्यातील दोन तालुके असलेल्या सातारा जिल्ह्याला संधी मिळाल्यानंतर यावेळी सोलापूर जिल्ह्यातील उमेद‌वाराला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती आणि त्यातही इच्छुक उमेदवारांमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू असलेल्या मोहिते-पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते-पाटील असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसहीत मोहिते-पाटील समर्थकांमध्ये होती.

गेली ४० ते ५० वर्षे समाजकारणाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाचे नेतृत्व करत असलेल्या मोहिते पाटील कुटुंबाने आपल्या कार्यकर्त्यांशी नाळ कधी तुटू दिली नाही. सातत्याने संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. त्यामुळे त्याच कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहाखातर भारतीय जनता पार्टीसाठी अहोरात्र झोकून पक्षवाढीसाठी झटणाऱ्या धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवण्याची सहमती दर्शवून तब्बल दोन ते तीन वेळा अख्खा मतदारसंघ पिंजून काढला आहे. असे असतानाही पक्षाकडून उमेदवारीसाठी डावलले गेल्याने कार्यकर्ते प्रचंड नाराज असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मोहिते-पाटील समर्थकांनी सर्व यंत्रणा सज्ज करून ठेवली असून, ‘तुम्ही फक्त निर्णय घ्या’, ‘तुम्ही फक्त आदेश द्या…ही निवडणूक कोणाही नेत्याविरुध्द किंवा पक्षाविरुध्द लढायची नसून आपल्या आत्मसन्मानासाठी लढायची असल्याच्या भावना कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहे. त्यामुळे एकंदरीत आता माढा लोकसभा नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांनीच हातात घेतली असून, त्यांच्या भावनांचा आदर राखून मोहिते-पाटील काय निर्णय येतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Madha lok sabha election is not for leaders but for activists bjp victory will need a break nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2024 | 12:46 PM

Topics:  

  • Lok Sabha 2024
  • Lok Sabha Election 2024
  • Madha Lok Sabha
  • political news

संबंधित बातम्या

“अशा लोकांचा गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही…; मतफुटीच्या आरोपांवर खासदार संजय राऊतांचा चढला पारा
1

“अशा लोकांचा गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही…; मतफुटीच्या आरोपांवर खासदार संजय राऊतांचा चढला पारा

नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना जगदीप धनखड यांनी दिल्या शुभेच्छा; धनखड यांनी म्हटले…
2

नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना जगदीप धनखड यांनी दिल्या शुभेच्छा; धनखड यांनी म्हटले…

जतमध्ये ओबीसी समाजाची तहसीलदारांकडे धाव; समाजावर अन्याय करणारा आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी
3

जतमध्ये ओबीसी समाजाची तहसीलदारांकडे धाव; समाजावर अन्याय करणारा आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी

Nepal Crisis : नेपाळच्या अर्थमंत्र्यांना रस्त्यावर पळवून मारताच राऊतांचे ट्वीट; म्हणाले, “कोणत्याही देशात हा…”
4

Nepal Crisis : नेपाळच्या अर्थमंत्र्यांना रस्त्यावर पळवून मारताच राऊतांचे ट्वीट; म्हणाले, “कोणत्याही देशात हा…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.