Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalhapur North Constituency: मधुरिमाराजेंच्या माघारमुळे हायव्होल्टेज ड्रामा; कोल्हापुरात नेमक काय घडलं?

कोल्हापुरात झालेल्या या हायव्होल्टेड ड्राम्यानंतर सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सतेज पाटलांच्या अजिंक्यतारा येथील कार्यालयासमोर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 05, 2024 | 09:02 AM
Kalhapur North Constituency: मधुरिमाराजेंच्या माघारमुळे हायव्होल्टेज ड्रामा; कोल्हापुरात नेमक काय घडलं?
Follow Us
Follow Us:

कोल्हापूर:  विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी कोल्हापुरात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजेंनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्यामुळे कोल्हापुरात काँग्रेसवर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की ओढावली. त्यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी खासदार शाहू महाराज छत्रपतींवर अक्षरश: संताप व्यक्त केला. इतकेच नव्हे तर, शाहू राजेंनी आमची फसवणूक केल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली.

कोल्हापुरात नेमकं घडलं काय?

काँग्रेसने कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सुरूवातीला राजेश लाटकरांना उमेदवारी दिली होती. पण अचानक लाटकर यांची उमेदवारी रद्द करून शाहू महाराज छत्रपती यांच्या सुनबाई मधुरिमाराजेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे राजेश लाटकरांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. माघार घेण्याच्या दिवशी लाटकर नॉटरिचेबल झाले त्यामुळे अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेरच्या क्षणी मधुरिमा राजेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेतल्यानंतर मालोजीराजेंनी मधुरिमा राजेंचा हात ओढत बाहेर नेलं.त्यामुळे काँग्रेसला अखेरच्या क्षणी राजेश लाटकर यांना नाईलाजाने पाठिंबा जाहीर करावा लागला. पण या सर्व घटनेमुळे सतेज पाटलांना मात्र खूपच धक्का बसला आणि त्यांना अश्रू अनावर झाले.

हेही वाचा:  ‘जब बकरा बनाना ही था…’, संजय राऊत यांच्या भावाच्या विरोधात FIR दाखल, शिंदेंसेनेच्या उमेदवाराबद्दलचं वक्तव्य भोवलं!

पक्षातील वरिष्ठांनी राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. पण अखरेच्या क्षणी मधुरिमाराजेंनी माघार घेतल्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघातच काँग्रेसची नाचक्की झाली. त्यामुळे सतेज पाटील चांगलेच संतापले होते. मधुरीमाराजे यांना काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. “दम नव्हता तर उमेदवारी कशाला घेतली, जर लढायचे नव्हते तर उमेदवारी घ्यायलाच नको होती. मी माझी ताकद दाखवली असती, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

सतेज पाटलांना अश्रू अनावर

कोल्हापुरात झालेल्या या हायव्होल्टेड ड्राम्यानंतर सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सतेज पाटलांच्या अजिंक्यतारा येथील कार्यालयासमोर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. “माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो, मला काही माहीत नाही. जे काय झालं ते तुमच्या समोर आहे,” असं म्हणत भाषणाला सुरुवात केली. पण त्यांचा कंठ दाटून आला. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ‘सतेज पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर एका पदाधिकाऱ्याने उठून कार्यर्त्यांची गर्दी पाहून आणि पाठिंबा पाहून सतेज पाटलांच्या डोळ्यात आश्रू आल्याचं सांगत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास सांगितलं. “जे काही घडलं त्यावर मी आज काही बोलणार नाही. मात्र जे घडलं त्याला समोरे जाण्याचं समर्थ्य तुम्ही मला द्यावं अशी माझी विनंती आहे,” असं सतेज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा:  कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कच्च्या कैद्यांना मिळणार आता जामीन; संविधानदिनीच सुटका

Web Title: Madhurimarajes withdrawal sparks controversy between satej patil and shahu maharaj in kolhapur nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 09:02 AM

Topics:  

  • Congress
  • Satej Patil

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र
3

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज पाटलांचा गंभीर आरोप, ‘विशेष अधिवेशन बोलवा’
4

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज पाटलांचा गंभीर आरोप, ‘विशेष अधिवेशन बोलवा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.