Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन होणार? CSR निधीच्या प्रभावी वापरासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील CSR निधीचा समन्वयित आणि प्रभावी वापर करण्यासाठी ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन करण्याची तयारी सुरू आहे. प्रकल्पांची प्रकल्प बँक, देखभाल-दुरुस्ती आणि ‘डायस्पोरा कनेक्ट’वर सरकारचा भर असेल.

  • By विवेक
Updated On: Aug 21, 2026 | 07:51 PM
Devendra Fadnavis, Maharashtra Drought, Water Management, Gadchiroli Flood,

Devendra Fadnavis, Maharashtra Drought, Water Management, Gadchiroli Flood,

Follow Us
Follow Us:
  • CSR निधीच्या समन्वयासाठी ‘महा सीएसआर प्राधिकरण’ प्रस्तावित.
  • जुन्या CSR प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीला मिळणार प्राधान्य.
  • परदेशातील महाराष्ट्रीयांच्या सहभागासाठी ‘डायस्पोरा कनेक्ट’चा अभ्यास.
 

महाराष्ट्रात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व अर्थात CSR निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नियोजनबद्ध वापर करण्यासाठी राज्य सरकारकडून ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

राज्यात CSR क्षेत्रातील विविध उपक्रम वेगवेगळ्या पातळ्यांवर राबवले जातात. या सर्व उपक्रमांना एकत्रित व्यासपीठ मिळावे आणि निधीचा योग्य ठिकाणी वापर व्हावा, या उद्देशाने प्रस्तावित प्राधिकरणाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्राधिकरणामार्फत CSR निधीचे समन्वयन, निरीक्षण आणि योग्य वापर सुनिश्चित करण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या प्राधान्यक्रमातील विकासकामांची दर्जेदार ‘प्रकल्प बँक’ तयार करून ती कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांसाठी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्यामुळे CSR निधी देऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांना योग्य प्रकल्प निवडणे अधिक सोपे होणार आहे.

Buldhana News: बुलढाणा जिल्हा परिषदेतील प्रतिनियुक्त्या केल्या रद्द; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांना सीईओ गुलाबराव खरात यांचा दणका

CSRसाठी पात्र असलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांना योग्य प्रकल्प तसेच स्वयंसेवी संस्था निवडण्यासाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारीही प्रस्तावित प्राधिकरणाकडे असणार आहे. राज्यातील उत्कृष्ट CSR उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासोबतच गरज असलेल्या सरकारी प्रकल्पांना CSR निधीतून आर्थिक पाठबळ मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

दरम्यान, CSR निधीतून उभारलेल्या प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्नही सरकारने गांभीर्याने घेतला आहे. अनेक प्रकल्प उभारल्यानंतर त्यांच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध न झाल्याने काही वर्षांत ते निष्क्रिय होतात. ही समस्या टाळण्यासाठी जुन्या प्रकल्पांच्या देखभाल आणि दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पाण्यावरून राजकारण तापले! ‘विरोधकांनी पाणी पुरवठा योजनेवरुन…’; नगरसेवक विजय धट काय म्हणाले?

परदेशात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या महाराष्ट्राशी संबंधित नागरिकांच्या माध्यमातून CSR आणि सामाजिक विकासासाठी निधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ‘डायस्पोरा कनेक्ट’ संकल्पनेचाही अभ्यास केला जाणार आहे.

प्रस्तावित प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील. गव्हर्निंग कौन्सिलमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश असेल, तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य-सचिव आणि कार्यकारी कौन्सिलचे प्रमुख असतील.

Web Title: Maha csr authority maharashtra devendra fadnavis csr fund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 07:51 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Dhule News : धुळ्यातील 3,258 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा मोठा दिलासा; 33 कोटी 1 लाखांचा लाभ खात्यावर जमा
1

Dhule News : धुळ्यातील 3,258 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा मोठा दिलासा; 33 कोटी 1 लाखांचा लाभ खात्यावर जमा

Beed News : बीडमध्ये राजकीय वातावरण तापलं; सकाळी बजरंग सोनवणेंचे गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे फडणवीसांच्या भेटीला
2

Beed News : बीडमध्ये राजकीय वातावरण तापलं; सकाळी बजरंग सोनवणेंचे गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे फडणवीसांच्या भेटीला

Shivbhojan Yojana : शिवभोजन थाळीबाबत सरकारचा मोठा निर्णय! नवी नियमावली जारी, नियम मोडल्यास भरावा लागणार दंड
3

Shivbhojan Yojana : शिवभोजन थाळीबाबत सरकारचा मोठा निर्णय! नवी नियमावली जारी, नियम मोडल्यास भरावा लागणार दंड

CM Devendra Fadnavis: आदिवासी विकासासाठी २५ हजार कोटींची तरतूद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
4

CM Devendra Fadnavis: आदिवासी विकासासाठी २५ हजार कोटींची तरतूद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.