Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : साताऱ्याच्या सांस्कृतिक वैभवाला नवी झळाळी! शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; शाहू कला मंदिरासाठी ७२ कोटींचा निधी मंजूर

Satara News : साताऱ्याच्या सांस्कृतिक वैभवात आता भर पडणार आहे. शाहू कला मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाने ७२ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 19, 2026 | 10:14 PM
Shivendraraje Bhosale

Shivendraraje Bhosale

Follow Us
Follow Us:
  • एक हजार आसनक्षमतेचे भव्य ऑडिटोरियम
  • ३०० आसनांचे स्वतंत्र छोटे सभागृह
  • अद्ययावत रंगमंच, ग्रीन रूम आणि प्रशस्त पार्किंगची सुविधा
 

सातारा, दि. १९ : ऐतिहासिक सातारा शहराच्या सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शाहू कला मंदिराच्या पुनर्बांधणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून शाहू कला मंदिर नव्याने उभारण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत तब्बल ७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. निधी मंजूर केल्याबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आभार मानले आहेत. (Satara News)

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शाहू कला मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी विशेष प्रयत्न केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यावेळी साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, भाजपचे गटनेते अविनाश कदम, नगरसेवक फिरोज पठाण आदी उपस्थित होते. या पाठपुराव्याला यश मिळत नगरविकास विभागाने ७२ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे.

नव्या शाहू कला मंदिराची उभारणी केवळ जुन्या वास्तूच्या पुनर्बांधणीपुरती मर्यादित न ठेवता आधुनिक सांस्कृतिक संकुलाच्या स्वरूपात करण्याचे नियोजन आहे. यामध्ये एक हजार प्रेक्षकांची आसनक्षमता असलेले भव्य मुख्य ऑडिटोरियम उभारण्यात येणार आहे. याशिवाय रंगकर्मी व कलाकारांच्या मागणीनुसार ३०० आसनक्षमतेचे स्वतंत्र छोटे ऑडिटोरियमही उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह नाट्यप्रयोग, व्याख्याने, परिसंवाद, संगीत मैफिली आणि लहान स्वरूपाचे कार्यक्रम एकाच ठिकाणी आयोजित करता येणार आहेत.

Dheeraj Deshmukh : लातूरमध्ये आमचं पॅनल जिंकलं; जाहीरनाम्यातील आश्वासनं पूर्ण करणार – धीरज देशमुख

कलाकारांच्या सोयीसाठी स्वतंत्र ग्रीन रूम, आधुनिक ध्वनी व प्रकाशव्यवस्था, कार्यक्रमांच्या स्वरूपानुसार विकसित केलेला रंगमंच आणि प्रेक्षकांसाठी अद्ययावत बैठक व्यवस्था यांचा प्रकल्पात समावेश करण्याचे नियोजन आहे. रंगमंचाची उभारणी करताना नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आवश्यक असलेल्या शास्त्रीय निकषांचा अभ्यास करून आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच वाहनांची गर्दी आणि पार्किंगची समस्या टाळण्यासाठी स्वतंत्र अद्ययावत पार्किंग व्यवस्थाही विकसित केली जाणार आहे.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची यंत्रणा सातारा नगरपरिषद असणार आहे. प्रकल्पाच्या खर्चाचा शंभर टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत.

शाहू कला मंदिराचे नवे रूप साकारल्यास साताऱ्याच्या सांस्कृतिक विश्वाला हक्काचे आधुनिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. स्थानिक कलाकार, रंगकर्मी, नाट्यसंस्था, सांस्कृतिक संघटना आणि विविध सामाजिक संस्थांसाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शाहू कला मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी ७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समस्त सातारकर, रंगकार्मी, कलाकार, रसिक- श्रोते यांनी आभार मानले आहेत. शाहू कला मंदिर नव्याने उभारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतला असून, यामुळे साताऱ्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. आधुनिक सुविधा आणि प्रशस्त सभागृहांमुळे सातारकरांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येईल, असा विश्वास शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

Harshwardhan Sapkal : वाढवण बंदर कायमचे रद्द करा! हर्षवर्धन सपकाळांची महायुती सरकारकडे मोठी मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: शाहू कला मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी किती निधी मंजूर झाला?

    Ans: साताऱ्यातील शाहू कला मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र शासनाने ७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

  • Que: नव्या शाहू कला मंदिरात किती आसनांची व्यवस्था असेल?

    Ans: मुख्य ऑडिटोरियममध्ये एक हजार प्रेक्षकांची आणि स्वतंत्र छोट्या सभागृहात ३०० प्रेक्षकांची आसनक्षमता असेल.

  • Que: शाहू कला मंदिराच्या प्रकल्पाची जबाबदारी कोणाकडे आहे?

    Ans: या प्रकल्पाची अंमलबजावणी सातारा नगरपरिषद करणार असून, संपूर्ण प्रकल्पाचा खर्च राज्य शासन करणार आहे.

Web Title: Shahu kala mandir satara news redevelopment shivendrasinhraje bhosale vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 10:14 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Satara News
  • Shivendra Raje Bhosale
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Harshwardhan Sapkal : अजितदादांच्या मृत्यू प्रकरणात काहीतरी लपवलं जातंय? सपकाळांचा फडणवीसांवर गंभीर आरोप
1

Harshwardhan Sapkal : अजितदादांच्या मृत्यू प्रकरणात काहीतरी लपवलं जातंय? सपकाळांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

Sunil Raut : बाळासाहेबांचा फोटो फाडला अन् सुनील राऊत संतापले! शायना एनसींच्या अटकेची मागणी, भांडूपमध्ये जोरदार आंदोलन
2

Sunil Raut : बाळासाहेबांचा फोटो फाडला अन् सुनील राऊत संतापले! शायना एनसींच्या अटकेची मागणी, भांडूपमध्ये जोरदार आंदोलन

Sushma Andhare : ‘शिंदेंसाठी बाळासाहेब ठाकरे फक्त पॉलिटिकल कार्ड’; सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर घणाघात
3

Sushma Andhare : ‘शिंदेंसाठी बाळासाहेब ठाकरे फक्त पॉलिटिकल कार्ड’; सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर घणाघात

Eknath Shinde Helicopter: एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे एक इंजिन सुरू, दुसरे इंजिन..; ऐनवेळी उड्डाण रद्द, पुण्याला कारने रवाना
4

Eknath Shinde Helicopter: एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे एक इंजिन सुरू, दुसरे इंजिन..; ऐनवेळी उड्डाण रद्द, पुण्याला कारने रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.