Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: अर्णव’ चक्रीवादळ आज सकाळी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले

२८ ऑक्टोबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. 'अर्नब' चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकले, न्यूझीलंडविरुद्ध अभिषेक शर्माचे ३५ चेंडूंत वादळी शतक, इम्रान खानला हायकोर्टाचा दिलासा, मायक्रोसॉफ्टची ६० हजार कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना आणि नांदेडमध्ये मोफत कोचिंग उपक्रम; वाचा आजचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाण

  • By anuradha sagar
Updated On: Oct 28, 2026 | 10:08 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 28.10.2026

Maharashtra Breaking News Today 28.10.2026

Follow Us
Follow Us:
  • 28 Oct 2026 10:40 AM (IST)

    28 Oct 2026 10:40 AM (IST)

    मोबाईलची छोटी स्क्रीन विसरा! आता थेट Apple TV वर पाहता येणार Instagram रिल्स

    आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम केवळ छोट्या स्क्रीनपुरते मर्यादित राहिलेले नाही. कारण आता मेटाने त्यांचे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम Apple TV वर देखील उपलब्ध केले आहे. त्यामुळे आता यूजर्सना मोठ्या स्क्रीनवर देखील रिल्स पाहण्याचा आनंद मिळणार आहे. आता यूजर्स टिव्हीवर रिल्ससोबत इतर व्हिडीओ आणि लाईव्ह शो देखील पाहू शकणार आहेत. कंपनीने इंस्टाग्रामचा व्हिडीओ अनुभव स्मार्टफोनच्या पलीकडे जाऊन लिविंग रुमपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे मित्र आणि कुटूंब एकत्र येऊन इंस्टाग्रामवरील कंटेट पाहण्याचा अनुभव घेऊ शकतात.

  • 28 Oct 2026 10:30 AM (IST)

    28 Oct 2026 10:30 AM (IST)

    मेट्रो-रेल्वेनंतर आता रिक्षा, टॅक्सीही एका ॲपवर; एमएमआरडीएचा मोठा निर्णय

    एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मुंबई वन स्मार्ट कार्ड’ आणि ‘मुंबई १ ॲप’ कार्यान्वित केले असून या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे ॲप कार्यान्वित झाल्यापासून एका वर्षात यावरून १ कोटी ३२ लाखांहून अधिक तिकिटांची खरेदी झाली असून त्यातून ३२ कोटी रुपये महसूल मिळाला. या ॲपवरून मेट्रो, बेस्ट, रेल्वेसह ११ सेवांतील तिकीट उपलब्ध आहे. आता लवकरच टॅक्सी, रिक्षा, शेअर रिक्षा, बाइक टॅक्सीचे भाडेही या ॲपवरून अदा करता येणार असल्याची घोषणा एमएमआरडीएकडून करण्यात आली. सहा महिन्यांत ही सेवा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

  • 28 Oct 2026 10:20 AM (IST)

    28 Oct 2026 10:20 AM (IST)

    पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा! छापा टाकताच अधिकारीही चक्रावले

    पुणे शहरातील एका अत्यंत प्रतिष्ठित आणि पंचतारांकित (फाईव्ह स्टार) हॉटेलमधून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बंडगार्डन रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एजंटांमार्फत परराज्यांतील तरुणींना आणून चालविल्या जाणाऱ्या हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात बनावट ग्राहकाच्या मदतीने हा छापा टाकण्यात आला असून, समोर आलेले दृश्य पाहून पोलीस अधिकारीही अवाक झाले.

  • 28 Oct 2026 10:10 AM (IST)

    28 Oct 2026 10:10 AM (IST)

    शालेय अभ्यासक्रमात ऐतिहासिक बदल; इयत्ता ६ वीच्या पुस्तकांमधून काय हटवले?

    राज्यातील शालेय पुस्तकांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्याचे पाठ्यपुस्तक मंडळ ‘बालभारती’कडून याच शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ६ वीची इतिहास, भूगोल आणि विज्ञानाची नवीन पाठ्यपुस्तके सादर करण्यात आली आहेत. या नवीन पुस्तकांमध्ये प्राचीन भारतीय ज्ञानग्रंथ, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक विद्वानांना प्रमुखतेने स्थान देण्यात आले आहे. तसेच इतिहासाच्या काही सामाजिक आणि राजकीय घटकांच्या मांडणीत बदल करण्यात आले आहेत. एनसीईआरटीच्या (NCERT) धर्तीवर केलेल्या या बदलांतर्गत पुस्तकांमध्ये प्रामुख्याने तीन दिशांवर आणि इतिहासाच्या काही भागांमधील बदलांवर काम करण्यात आले आहे.

  • 28 Oct 2026 10:08 AM (IST)

    28 Oct 2026 10:08 AM (IST)

    Sambhajinagar MLC Result: पुण्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरच्या मतमोजणीत चिठ्ठ्यांचा सुळसुळाट! 

    Sambhajinagar MLC Result:  विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान एक अजब आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात मतमोजणीदरम्यान वादग्रस्त चिठ्ठी सापडल्यानंतर, आता छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीतही अनेक अजब चिठ्ठ्या पेटीतून बाहेर आल्याने अधिकाऱ्यांसह राजकीय नेतेही अवाक झाले आहेत.

    सुशिक्षित पदवीधरांनी केवळ उमेदवारांबद्दलच नव्हे, तर सध्याच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेबद्दल असणारा तीव्र असंतोष या चिठ्ठ्यांच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. काही मतपत्रिकांसोबत जोडलेल्या चिठ्ठ्यांमध्ये थेट अद्वातद्वा शब्द आणि शिव्यांचा वापर करण्यात आला आहे, तर काहींमध्ये राजकीय नेत्यांच्या वृत्तीवर अत्यंत भडक भाषेत ताशेरे ओढले गेले आहेत.

  • 28 Oct 2026 09:58 AM (IST)

    28 Oct 2026 09:58 AM (IST)

    Nagpur Graduate MLC Result Sudhakar Kohale Lead: नागपूर पदवीधरमध्ये  सुधाकर कोहळे यांची ४,२८० मतांची आघाडी कायम 

    विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात अत्यंत चुरशीची आणि उत्कंठावर्धक लढत पाहायला मिळत आहे. मतमोजणीत दुसऱ्या पसंतीची मते मोजली जात असून भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी ४,२८० मतांची आघाडी कायम ठेवली आहे.पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मते मिळून भाजपच्या सुधाकर कोहळे यांना ६०,९४५ मते, तर काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांना ५६,६६५ मते मिळाली आहेत. मोजणीच्या बाद फेरीत आतापर्यंत तळाशी असलेले १६ उमेदवार बाद करण्यात आले आहेत.

  • 28 Oct 2026 09:48 AM (IST)

    28 Oct 2026 09:48 AM (IST)

    Asian Champions Trophy: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात भारतीय हॉकी संघाचा विजय

    Asian Champions Trophy:  भारतीय हॉकी संघाने (Indian Hockey Team) आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ ची सुरुवात अत्यंत दणक्यात केली आहे. जालंधर येथील ऑलिम्पियन सुरजित सिंग हॉकी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्याच सामन्यात यजमान भारताने बांगलादेशचा १३-० असा एकतर्फी पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल नोंदवत भारताचे खाते उघडले आणि संघाला सुरुवातीपासूनच मजबूत आघाडी मिळवून दिली.

  • 28 Oct 2026 09:42 AM (IST)

    28 Oct 2026 09:42 AM (IST)

    Kaustubh Gawade Jayant Asgaonkar Defeat: पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर पराभूत; भाजपच्या कौस्तुभ गावडेंच्या विजयाचा मार्ग मोकळा

    विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांचा दारुण पराभव झाला असून, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीत ते बाद झाले आहेत. या धक्कादायक निकालानंतर भाजपपुरस्कृत कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा मार्ग आता सुकर झाला आहे.दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना केवळ ८,९६५ मते मिळाली, ज्यामुळे ते शर्यतीतून बाहेर पडले. भाजपपुरस्कृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी १८,३८५ मतांसह आपली भक्कम आघाडी कायम ठेवली असून त्यांचा विजय आता केवळ औपचारिक उरला आहे.

  • 28 Oct 2026 09:38 AM (IST)

    28 Oct 2026 09:38 AM (IST)

    Pune MLC Election Result: पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा देशमुख विजयाच्या उंबरठ्यावर

    Pune MLC Election Result: महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ जागांसाठी मंगळवारी (२७ ऑक्टोबर) सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेली मतमोजणी २४ तास उलटूनही सुरूच आहे. पसंतीक्रमाची क्लिष्ट मतमोजणी प्रक्रिया, बाद फेरीची मते (Elimination Process) आणि बाद झालेल्या मतांची मोठी संख्या यामुळे निकालाला प्रचंड विलंब होत आहे. महाविकास आघाडीच्या (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष) हर्षदा देशमुख-जाधव या १,१२,३७७ मतांसह मोठ्या आघाडीवर असून विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.

  • 28 Oct 2026 09:26 AM (IST)

    28 Oct 2026 09:26 AM (IST)

    Cyclone Arnab: 'अर्णब' चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीवर १४० किमी वेगाने धडकणार; महाराष्ट्रातील हवामानातही बदलाची शक्यता

    बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णव’ (Cyclone Arnab) चक्रीवादळामुळे देशाच्या किनारपट्टी भागांत मोठी खळबळ उडाली आहे. हे चक्रीवादळ वेगाने आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकत असून ते आणखी तीव्र होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.

    बुधवारी दुपारनंतर हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची (Landfall) शक्यता आहे. या काळात ताशी ११० ते १४० किलोमीटर वेगाने चक्री वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश आणि आसपासच्या किनारपट्टीच्या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) देण्यात आला आहे.

  • 28 Oct 2026 09:20 AM (IST)

    28 Oct 2026 09:20 AM (IST)

    ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार?

    नवी दिल्ली : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीला आणि त्यांनी घेतलेल्या एकतर्फी निर्णयांना आव्हान देणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या याचिकांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतली. मंगळवारी सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या संपूर्ण प्रकरणाची आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेची तपासणी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी झाली.

Maharashtra to World Breaking News :   तीव्र चक्रीवादळ ‘अर्नब’ (Cyclone Arnab) आज सकाळी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले असून दक्षिण भारत व महाराष्ट्रातील काही भागांत वाऱ्यासह पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या ३५ चेंडूंत शतक ठोकत भारताला मालिका विजय मिळवून दिला.

अभिनेता इम्रान खानला जारी करण्यात आलेल्या ‘लीव्ह इंडिया नोटीस’ला (Leave India Notice) मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीने जागतिक स्तरावर ६०,००० कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती (Voluntary Exit Package) योजना जाहीर केली.

नांदेड जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील २०० गुणवंत विद्यार्थ्यांसाठी NEET, JEE आणि CET ची मोफत कोचिंग योजना जाहीर करण्यात आला आहे.  महाराष्ट्रात एसआयआर (SIR) मतदार यादी पडताळणी प्रक्रियेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून कायदेशीर हालचालींना वेग आला आहे.

Web Title: Maharashtra and india breaking news live updates 28 october 2026 as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड
1

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.