
Maharashtra Breaking News Today 31.10.2026
31 Oct 2026 11:00 AM (IST)
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघाचा भाग असलेला सलामीवीर यशस्वी जयस्वाल खराब फॉर्मशी झुंजत आहे. तो सध्या भारत ‘अ’ संघाकडून न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध एक अनधिकृत कसोटी सामना खेळत आहे. पहिल्या कसोटीत त्याने दोन्ही डावांत अनुक्रमे १७ आणि ५ धावा केल्या. दुसऱ्या कसोटीत त्याला खातेही उघडता आले नाही. यशस्वी शून्यावर बाद झाला हे आश्चर्यकारक नाही, तर त्याच्या फॉर्मबद्दल चिंता आहे. अलीकडेच वेगवेगळ्या सामन्यांमधील नऊ डावांमध्ये यशस्वी चार वेळा शून्यावर बाद झाला आहे.
31 Oct 2026 10:50 AM (IST)
सिडको प्राधिकरण क्षेत्रातील विविध नोडमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सिडको प्रशासनाने उपाययोजनांचा धडाका सुरू केला आहे. पाण्याचे न्याय्य वितरण सुनिश्चित करण्यासोबतच पाण्याचा गैरवापर आणि वितरणातील अनियमितता रोखण्यासाठी आता सर्व ३४ पाणीपुरवठा टैंकर्सना जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. तसेच ११ प्रमुख टैंकर भरणा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येत आहे.
31 Oct 2026 10:40 AM (IST)
भारतातील टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (Vi) ने त्यांच्या यूजर्सना आनंदाचा धक्का दिला आहे. कंपनीने 4 नवीन व्हॉईस-ओन्ली रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहे. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने अलीकडेच जारी केलेल्या आदेशांचे पालन करत कंपनीने हे नवीन रिचार्ज प्लॅन्स लाँच केले आहेत. कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर देखील नवीन व्हॉईस ओन्ली रिचार्ज प्लॅन्स लाईव्ह केले आहेत. यामध्ये सर्वात स्वस्त व्हॉईस ओन्ली पॅकची किंमत 179 रुपये आहे. तर सर्वात महागड्या व्हॉईस ओन्ली पॅकची किंमत 206 रुपये आहे.
31 Oct 2026 10:30 AM (IST)
देशातील सर्वात मोठे शिक्षण मंडळ असलेल्या सीबीएसई (CBSE) साठी २०२६ हे वर्ष निर्णय आणि त्यांच्या स्पष्टीकरणांचे वर्ष ठरत आहे. मे २०२६ पासून ते ऑक्टोबर २०२६ पर्यंत अवघ्या ७ महिन्यांत सीबीएसईला किमान ६ वेळा आपल्या नियमांमध्ये बदल, संशोधन किंवा स्पष्टीकरणे जारी करावी लागली. डिजिटल मूल्यांकनातील वादापासून ते अतिरिक्त गुणांची गणना, त्रि-भाषा सूत्र (थ्री लँग्वेज फॉर्म्युला), पास होण्याच्या गुणांविषयीचा संभ्रम आणि आता इयत्ता ९ वीच्या अभ्यासक्रमात अचानक केलेले बदल यामुळे विद्यार्थी, पालक आणि शाळा प्रशासन संभ्रमात पडले आहेत.
31 Oct 2026 10:20 AM (IST)
Honor Smartphone Launched: टेक कंपनी Honor ने मिडिल ईस्टमध्ये आज त्यांचा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. 8,560mAh बॅटरीसह नवा Honor X9e s स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. याा स्मार्टफोनचे डिझाईन चीनमध्ये लाँच झालेल्या Honor Turbo 5G सारखे आहे. क्वालकॉम प्रोसेसर आणि 120Hz डिस्प्लेने सुसज्ज असलेल्या नव्या ऑनर स्मार्टफोनची किंमत जाणून घेऊया.
31 Oct 2026 10:10 AM (IST)
स्वच्छ आणि हरित वाहतुकीला प्राधान्य देत महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी राज्य सरकार व्यापक नियोजन करत आहे. पुढील तीन वर्षांत राज्यात ५० हजार इलेक्ट्रिक बसेस आणण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी आवश्यक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची जबाबदारी सरकार घेणार आहे. महामार्गांसह राज्यभर आवश्यक त्या ठिकाणी चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
31 Oct 2026 10:00 AM (IST)
केंद्र सरकारने देशातील बहुप्रतीक्षित राष्ट्रीय जनगणना २०२७ (Census 2027) च्या प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेच्या तारखांची अधिकृत घोषणा केली आहे. देशभरात २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घराघरांत जाऊन ही जनगणना प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. देशातील बहुतांश भागात २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणी पार पडेल. जनगणनेसाठी १ मार्च २०२७ रोजी मध्यरात्री १२ वाजता (00:00 तास) ही अधिकृत संदर्भ वेळ निश्चित करण्यात आली आहे.
31 Oct 2026 09:50 AM (IST)
NavIC Navigation System: इस्रोने जीएसएलव्ही-एफ१८ रॉकेटद्वारे एनव्हीएस-०३ नेव्हिगेशन उपग्रह प्रक्षेपित केला. यामुळे भारताची स्वदेशी नेव्हिक प्रणाली अधिक मजबूत होईल आणि नेव्हिगेशन सेवांची क्षमता वाढेल.
इस्त्रोने जीएसएलव्ही-एफ१८ यानाद्वारे एनव्हीएस-०३ उपग्रह भूस्थिर हस्तांतरण कक्षेत (GTO) स्थापित केला. आयआरएनएसएस मालिकेसाठी नेव्हिगेशन सेवांचे सातत्य सुनिश्चित करण्याकरिता विकसित करण्यात आलेल्या, पुढच्या पिढीच्या नेव्हिगेशन उपग्रह प्रणालीमधील एनव्हीएस-०३ हा तिसरा उपग्रह आहे.
31 Oct 2026 09:40 AM (IST)
राजकारणात नेत्यांमधील वाद आणि टीका-टिप्पणी नवीन नाही, परंतु कधीकधी एखादी पोस्ट किंवा छायाचित्र शब्दांपेक्षाही बरेच काही सांगून जाते. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांच्यातील वादानंतर याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. आमदार निलेश राणे यांनी नवनाथ बन यांच्यावर वैयक्तिक टीका करत त्यांची लायकी काढल्याचे बोलले जात होते. या टीकेला थेट शब्दांची जुगलबंदी करत उत्तर देण्याऐवजी, नवनाथ बन यांनी आपल्या खास शैलीत एका सूचक छायाचित्राच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे.
31 Oct 2026 09:26 AM (IST)
काँग्रेस पक्षाकडून १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर प्रस्तावित असलेल्या मोठ्या आंदोलनाच्या आणि रॅलीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील व्यापारी वर्ग अत्यंत आक्रमक झाला आहे. चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (CTI) द्वारे रामलीला मैदानाभोवतीच्या सुमारे २० प्रमुख बाजारपेठांमध्ये एक विशेष पोस्टर मोहीम सुरू केली जात असून, यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना थेट आवाहन करण्यात येत आहे.
CTI चे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी स्पष्ट केले की, दिवाळीचा काळ हा व्यापाऱ्यांसाठी वर्षातील सर्वात मोठा कमाईचा काळ असतो. ऐन सणासुदीच्या काळात मध्य दिल्लीत एवढी मोठी रॅली निघाल्यास संपूर्ण वाहतूक आणि बाजारपेठा विस्कळीत होतील. या आंदोलनामुळे परिसरातील २० लाखांहून अधिक व्यापाऱ्यांच्या कामकाजावर थेट परिणाम होईल. एकाच दिवसात सुमारे १०,००० ते १२,००० कोटी रुपयांचा व्यापार धोक्यात येऊ शकतो, असा गंभीर इशारा व्यापाऱ्यांच्या संघटनेने दिला आहे.
Maharashtra to World Breaking News :
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आदरांजली अर्पण करण्यात आली. तीव्र ‘अर्नब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील २४ तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा (IMD) मोठा इशारा जारी करण्यात आला आहे.
‘SIR’ मतदार पडताळणी प्रक्रियेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांची दिल्लीतील मुख्य आंदोलनाची रणनीती तीव्र झाली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या कामांचा प्रशासनाकडून आढावा सुरू केला आहे. विकासकामांना गती देण्याचा निर्णय.यवतमाळ जिल्ह्यात पिकांची आणेवारी ४४ टक्क्यांवर आल्याने प्रशासनाकडून अधिकृतपणे दुष्काळसदृश परिस्थितीवर शिक्कामोर्तब, बळीराजा चिंतेत आहे.
समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गोदामावर छापा मारून पावणेदहा लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकाला अटक.आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी’ हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत मलेशियाचा पराभव केला.