IND A vs NZ A : भारताला विजयासाठी हवी होती फक्त एक विकेट, पण... सौजन्य : आयएएनएस
IND A vs NZ A : भारत ‘ए’ आणि न्यूझीलंड ‘ए’ यांच्यात खेळवण्यात आलेला पहिला अनधिकृत कसोटी सामना खराब प्रकाशामुळे ‘ड्रॉ’च्या रुपात समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय भारतासाठी एकप्रकारे धक्काच होता, कारण सामना अशावेळी थांबवण्यात आला, जेव्हा भारतीय संघाला विजयासाठी फक्त एका विकेटची गरज होती.
सामन्याबाबत बोलायचे झाले तर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने निराशाजनक फलंदाजी केली आणि अवघ्या 113 धावांत ते गारद झाले. भारतासाठी यश राठौडने सर्वाधिक 44 धावा केल्या, तर देवदत्त पड्डिकल 32 धावा करत दुसरा सर्वाधिक मोठा स्कोरर राहिला.
न्यूझीलंडचा कर्णधार राइस मारिउच्या 76 धावा आणि डिन फॉक्सक्रॉफ्टच्या 51 धावांच्या मदतीने पहिल्या डावात 317 धावा करत त्यांनी भारतीय संघावर 204 धावांची आघाडी घेतली. भारतीय संघाने दुसऱ्या डावात 516 धावांची मोठाली धावसंख्या उभारली.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या देवदत्त पड्डिकलने 248 चेंडूंत 24 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 199 धावा रचल्या. पड्डिकल अवघ्या एका धावेमुळे द्विशतकापासून मुकला. त्याशिवाय साई सुदर्शन ही शतकापासून हुकला. सुदर्शनने 184 चेंडूंत 12 चौकारच्या मदतीने 91 धावांची खेळी केली. यश राठौडने 66 आणि वॉशिंग्टन सुंदरने 52 धावांची खेळी केली.
IND vs NZ: आँधी बनके आया हूँ! Abhishek Sharma च्या बॅटने ओकली आग, NZ चा गेम ओव्हर; सिरीज खिशात
न्यूझीलंड ‘ए’ने पहिल्या डावात 204 धावा केल्या होत्या, त्यामुळे विजयासाठी त्यांना 313 धावांचे लक्ष्य मिळाले. पण किवी संघाचा दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने आपले 9 विकेट 187 धावांत गमावले. सामन्याचा एक तासांचा खेळ शिल्लक होता. पण खराब प्रकाशामुळे सामना थांबवावा लागला. अखेर हा सामना ड्रॉच्या रुपात समाप्त झाला. या निर्णयाचा भारतीय संघाला धक्का बसला, कारण हातात आलेला सामना ते जिंकू शकले नाहीत.
Ballon d’Or : किंग कोहलीने हॅरी केनला दिल्या शुभेच्छा, म्हणाला, तू या सन्मानाचे हक्कदार!
भारतासाठी चिंतेची बाब अशी की, स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि के. एल. राहुल ही सलामी जोडी दोन्ही डावांत फ्लॉप राहिली. जयस्वालने पहिल्या डावात 17 आणि दुसऱ्या डावात 5 धावा केल्या, तर राहुल पहिल्या डावात भोपळाही फोडू शकला नाही. दुसऱ्या डावात त्याने फक्त 4 धावांचे योगदान दिले. राहुल आणि जयस्वालला भारतीय सीनियर टीमसाठी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत डावाची सुरुवात करायची आहे.






