Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking LIVE News Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या ब्रेकिंग बातम्या एका क्लिकवर

Today’s Breaking News Live Blog- महाराष्ट्रासह देश आणि जगातील राजकारण, निवडणुका, गुन्हे, क्रीडा, मनोरंजन, व्यवसाय व आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या ब्रेकिंग बातम्या इथे थेट लाईव्ह अपडेट्ससह वाचा.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 02, 2026 | 11:28 AM
LIVE
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • 02 Jan 2026 11:28 AM (IST)

    02 Jan 2026 11:28 AM (IST)

    अवघी सातारानगरी साहित्यमय, ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची भव्य ग्रंथदिंडी

    साताऱ्यामध्ये 99 वे अखिल मराठी साहित्य संमेलन होत आहे. यानिमित्ताने साताऱ्यात ग्रंथदिंडी काढण्यात आली. 'मी भाषाभिमानी... मी साहित्यप्रेमी' असे निनादणारे जयघोष... ढोल ताशांचा गगनभेदी गजर... बालगोपाळांचा उत्स्फूर्त सहभाग... विविध संकल्पनांनी सजलेले आकर्षक रथ... शोभायात्रेच्या स्वागतासाठी मार्गावरील रांगोळ्यांच्या सुंदर पायघड्या... अशा जल्लोषपूर्ण आणि उत्साही वातावरणामध्ये आज ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये ग्रंथदिंडी काढण्यात आली.

  • 02 Jan 2026 11:15 AM (IST)

    02 Jan 2026 11:15 AM (IST)

    विधानसभआ अध्यक्षांनी उमेदवारांना धमकावलं आहे - संजय राऊत

    महापालिका निवडणुकीसाठी राहुल नार्वेकरांनी दमदाटी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 30 तारखेचे 4 वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज गायब असून , सीसीटीव्ही फुटेज तपासा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा दबाव असल्याचे देखील राऊत म्हणाले आहेत.

  • 02 Jan 2026 11:05 AM (IST)

    02 Jan 2026 11:05 AM (IST)

    समाजसेवक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची पुण्यतिथी

    एक थोर समाजसुधारक असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी समाजातील तत्कालीन वंचित समाजासाठी अमोल कष्ट घेतले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण, दलित शिक्षण आणि सामाजिक समानतेसाठी मोठे कार्य केले. त्यांनी १९०६ मध्ये ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया’ ची स्थापना केली आणि सत्यग्रह, शिक्षण व जनजागृतीच्या माध्यमातून मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी लढा दिला, ज्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यासाठी पूरक पाया रचला गेला. मुंबईत शाळा उघडून दलित मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तसेच धर्मातील चुकीच्या रूढींविरुद्ध आवाज उठवला आणि ब्राह्मधर्माचा प्रचार केला. आजच्या दिवशी 1944 साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • 02 Jan 2026 10:51 AM (IST)

    02 Jan 2026 10:51 AM (IST)

    काश्मिरी क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज

    स्थानिक स्पर्धेत एका क्रिकेटपटूला त्याच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज लावून खेळताना पाहिल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि त्या क्रिकेटपटू आणि स्पर्धेच्या आयोजकांना चौकशीसाठी बोलावले. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, स्थानिक स्पर्धेचा भाग म्हणून आयोजित केलेल्या सामन्यात सहभागी होताना एका क्रिकेटपटूला पॅलेस्टिनी ध्वजासह हेल्मेट घालून पाहिलं गेलं.

  • 02 Jan 2026 10:46 AM (IST)

    02 Jan 2026 10:46 AM (IST)

    शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करताय?

    भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज शुक्रवारी, २ जानेवारी रोजी सपाट किंवा मंद पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त बहुतेक जागतिक बाजार बंद होते. आज गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सपाट परंतु सकारात्मक सुरुवात दर्शविली आहे. गिफ्ट निफ्टी २६,३१४ वर व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा २३ अंकांनी किंवा ०.०९% ने वाढला.

  • 02 Jan 2026 10:39 AM (IST)

    02 Jan 2026 10:39 AM (IST)

    अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस

    फ्री फायर मॅक्समध्ये बुयाह पास प्रिमियम प्लस अतिशय कमी किंमतीत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. रेड मिस्चिफ असं या पासचं नाव आहे. गेममध्ये अलीकडेच सुरु झालेल्या बुयाह पास रिंग ईव्हेंटचा हा एक भाग आहे. या स्पेशल पासद्वारे प्रिमियम बंडलसह लूट बॉक्स, वेपन स्किन, फीमेल बंडल, इमोट आणि एक्सट्रा इमोट स्लॉट फ्रीमध्ये क्लेम करण्याची संधी मिळार आहे. एवढंच नाही हे रिवॉर्ड्स खरेदी केल्यास प्लेअर्सना 20 टक्के डिस्काऊंट देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

  • 02 Jan 2026 10:32 AM (IST)

    02 Jan 2026 10:32 AM (IST)

    नागपूर महापालिका निवडणूक

    महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियेनंतर चित्र स्पष्ट होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या टप्प्यात एकूण १,२९४ उमेदवारांचे नामांकन वैध ठरले. यामध्ये ७५९ पुरुष आणि ५३५ महिला उमेदवारांचा समावेश आहे. नामांकन छाननीदरम्यान विविध प्रभागांतील अर्ज तपासले असता ८० उमेदवारांचे नामांकन अवैध ठरविण्यात आले. यामध्ये ४१ पुरुष आणि ३९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. नामांकन प्रक्रियेच्या समाप्तीनंतर सर्वच प्रभागांमध्ये निवडणुकीची रंगत वाढली आहे.

  • 02 Jan 2026 10:16 AM (IST)

    02 Jan 2026 10:16 AM (IST)

    प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडेल असा चित्रपट!

    मराठी माध्यम’ हा चित्रपट नुकताच नवीन वर्षाला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. या चित्रपटाने मराठी भाषेचे महत्त्व, आजची शिक्षणव्यवस्था आणि सामाजिक वास्तव हा गंभीर विषय लोकांना विचार करायला भाग पाडेल आणि सोप्या पद्धतीत मांडला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बजेट पेक्षा जास्त कमाई करून चित्रपटाचे मन जिंकले आहे. तसेच सोशल मीडियावर आणि चित्रपगृहाबाहेर या चित्रपटाचीच चर्चा सर्वत्र होत आहे.

  • 02 Jan 2026 10:07 AM (IST)

    02 Jan 2026 10:07 AM (IST)

    करोडो यूजर्सना कंपनीने दिलं नवीन वर्षांचं गिफ्ट!

    गेल्या काही काळापासून सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल त्यांच्या यूजर्ससाठी जबरदस्त प्रीपेड प्लॅन्स लाँच करत आहे. या प्लॅन्सची किंमत कमी आणि फायदे जास्त आहेत. सरकारी कंपनी त्यांच्या यूजर्सना असे प्लॅन्स ऑफर करत आहे, जे प्लॅन्स प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्याकडे देखील उपलब्ध नाहीत. बीएसएनएल कमी किंमतीत केवळ जास्तीचा डेटाच देत नाही तर अनलिमीटेड कॉलिंगसह दिर्घकाळ व्हॅलिडीटी देखील ऑफर करते. आता पुन्हा एकदा कंपनी त्यांच्या यूजर्ससाठी खास ऑफर घेऊन आली आहे.

  • 02 Jan 2026 09:40 AM (IST)

    02 Jan 2026 09:40 AM (IST)

    ए. आर. रहमान अभिनयात; ‘मूनवॉक’मधून कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदाच झळकणार

    ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान लवकरच नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, ते पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहेत. प्रभुदेवा अभिनीत ‘मूनवॉक’ या चित्रपटातून रहमान अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असून, हा मनोज एन. एस. दिग्दर्शित विनोदी चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रहमान ‘एंग्री यंग दिग्दर्शक’ची भूमिका साकारणार आहेत.

  • 02 Jan 2026 09:22 AM (IST)

    02 Jan 2026 09:22 AM (IST)

    निवडणूक पराभवासाठी जादूटोण्याचा आरोप

    निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जादूटोण्याचे प्रकार समोर येत असतानाच, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका पराभूत उमेदवाराने जादूटोण्यामुळेच आपला पराभव झाल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • 02 Jan 2026 09:20 AM (IST)

    02 Jan 2026 09:20 AM (IST)

    Dhurandhar Movie: ‘धुरंधर’मधील उजैर बलोचची भूमिका साकारणारा दानिश पांडोर चर्चेत

     ‘धुरंधर’ चित्रपटातील पात्रे आणि कलाकारांनी यावर्षी विशेष लोकप्रियता मिळवली असून, अक्षय खन्नाच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता दानिश पांडोरने उजैर बलोचची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. दरम्यान, दानिशचे एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांच्या नात्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी दानिशच्या वाढदिवसानिमित्त संबंधित अभिनेत्रीने त्याच्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत खास नोट लिहिल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

  • 02 Jan 2026 09:15 AM (IST)

    02 Jan 2026 09:15 AM (IST)

    BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणूक : अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

    मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. बंडखोरीचा फटका बसू नये यासाठी सर्व प्रमुख पक्ष अपक्ष अर्ज भरलेल्या नाराज उमेदवारांची मनधरणी शेवटच्या क्षणापर्यंत करत आहेत. त्यामुळे कोणकोणते बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीतील बंडखोर उमेदवारांची नावेही समोर आली आहेत.

  • 02 Jan 2026 09:05 AM (IST)

    02 Jan 2026 09:05 AM (IST)

    Cricket News: काश्मिरी क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज

    स्थानिक स्पर्धेत एका क्रिकेटपटूला त्याच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज लावून खेळताना पाहिल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि त्या क्रिकेटपटू आणि स्पर्धेच्या आयोजकांना चौकशीसाठी बोलावले. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, स्थानिक स्पर्धेचा भाग म्हणून आयोजित केलेल्या सामन्यात सहभागी होताना एका क्रिकेटपटूला पॅलेस्टिनी ध्वजासह हेल्मेट घालून पाहिलं गेलं.

  • 02 Jan 2026 09:03 AM (IST)

    02 Jan 2026 09:03 AM (IST)

    Stock Market Today: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करताय?

    India Share Market Update: भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज शुक्रवारी, २ जानेवारी रोजी सपाट किंवा मंद पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त बहुतेक जागतिक बाजार बंद होते. आज गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सपाट परंतु सकारात्मक सुरुवात दर्शविली आहे. गिफ्ट निफ्टी २६,३१४ वर व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा २३ अंकांनी किंवा ०.०९% ने वाढला.

Maharashtra to World Breaking News : 

धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची चर्चा पुन्हा सुरू

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात महाराष्ट्रातील अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना बीड न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. स्वतःला धनंजय मुंडेंची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा मुंडे यांनी दाखल केलेली फौजदारी तक्रार न्यायालयाने फेटाळली आहे. धनंजय मुंडे यांना दिलासा मिळताच आता त्यांच्या मंत्रिमंडळात ‘कमबॅक’ची चर्चा सुरु झाली आहे.

Web Title: Maharashtra breaking live news updates maharashtra india and world newslatest breaking new in marathi political national international crime sports entertainment weather

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today:  महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या ब्रेकिंग बातम्या एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या ब्रेकिंग बातम्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today:  राज्यातील महापालिका निवडणुकांचे latest Updates, वाचा सविस्तर
2

Maharashtra Breaking News Today: राज्यातील महापालिका निवडणुकांचे latest Updates, वाचा सविस्तर

Maharashtra Breaking News Today: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती नाहीच
3

Maharashtra Breaking News Today: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती नाहीच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.