Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या ब्रेकिंग बातम्या एका क्लिकवर

Today’s Breaking News Live Blog- महाराष्ट्रासह देश आणि जगातील राजकारण, निवडणुका, गुन्हे, क्रीडा, मनोरंजन, व्यवसाय व आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या ब्रेकिंग बातम्या इथे थेट लाईव्ह अपडेट्ससह वाचा.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 31, 2025 | 12:35 PM
LIVE
#BMCelection #MumbaiPolitics #ShivSena #MNS #GoldPrices #महापालिकानिवडणूक #पुणेमहापालिकानिवडणूक, #महाराष्ट्रस्थानिकस्वराज्यसंस्थानिवडणूक

#BMCelection #MumbaiPolitics #ShivSena #MNS #GoldPrices #महापालिकानिवडणूक #पुणेमहापालिकानिवडणूक, #महाराष्ट्रस्थानिकस्वराज्यसंस्थानिवडणूक

Follow Us
Close
Follow Us:
  • 31 Dec 2025 12:40 PM (IST)

    31 Dec 2025 12:40 PM (IST)

    बर्थडे पार्टीत डीजेवर मुली नाचल्या अन् वाद भडकला; दाजीने मेहुण्याचा चाकू भोसकून खून

    उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये बर्थडे पार्टीत डीजेवर मुली नाचल्याने वाद पेटला. संतापलेल्या दाजीने हस्तक्षेप करणाऱ्या मेहुण्याच्या छातीवर चाकूने वार केला. उपचारांपूर्वीच मेहुण्याचा मृत्यू; आरोपी अटकेत.

  • 31 Dec 2025 12:35 PM (IST)

    31 Dec 2025 12:35 PM (IST)

    2025 च्या मान्सूनने बदलली शहराची वेळ; निरोपाची तयारी सुरू असताना पुन्हा पुन्हा हजेरी

    वर्ष आणि डिसेंबर महिना संपत आलेला असतानाही काही भागात अजूनही पाऊस सुरु आहे.राज्यात गेल्या महिनाभरापासून थंडीचा कडाका आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीमुळे गारठा वाढताना दिसतोय.

  • 31 Dec 2025 12:30 PM (IST)

    31 Dec 2025 12:30 PM (IST)

    देशसेवेचं स्वप्न अधुरंच! प्रेयसीच्या सततच्या धमक्यांमुळे तरुणाची आत्महत्या

    देशसेवेचं स्वप्न उराशी बाळगून आसामला गेलेल्या कानपूरच्या दीपू यादवने प्रेयसीच्या सततच्या लग्नाच्या धमक्या आणि मानसिक छळाला कंटाळून व्हिडिओ कॉलदरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • 31 Dec 2025 12:25 PM (IST)

    31 Dec 2025 12:25 PM (IST)

    भाजप आमदार राहुल आवाडे ‘ॲटिव्ह’; तर सेनेचे खासदार धैर्यशील माने ‘गायब’

    निवडणूक ही केवळ उमेदवारांची नसून संपूर्ण संघटनेची असते, हे भाजपने या तयारीतून दाखवून दिले आहे. तरीही अनेक प्रभागात निष्ठावंत भाजपचे इच्छुक उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले.

  • 31 Dec 2025 12:20 PM (IST)

    31 Dec 2025 12:20 PM (IST)

    संतापजनक प्रकार! विनयभंगाची तक्रार केल्याचा राग; महिलेच्या पतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

    नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बेंद्री गावात विनयभंगाची तक्रार केल्याच्या रागातून सूड उगवत महिलेच्या पतीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. पती 50% भाजले; तिघांना अटक, गावात तणाव.

  • 31 Dec 2025 12:15 PM (IST)

    31 Dec 2025 12:15 PM (IST)

    उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली

    राज्यामध्ये पुणे महापालिकेसह 26 पालिकांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून पालिका अधिकाऱ्यांनी देखील आढावा बैठक घेतली.

  • 31 Dec 2025 12:10 PM (IST)

    31 Dec 2025 12:10 PM (IST)

    नवजात बाळाला भेटायला निघाले अन् काळाने घातला घाव; अपघातात पित्याचा मृत्यू

    यवतमाळच्या भिसनी गावात नवजात बाळाच्या जन्माचा आनंद क्षणातच शोकात बदलला. पत्नी व बाळाला भेटायला दुचाकीने निघालेल्या पित्याचा अंधारात उभ्या ट्रॅक्टरला धडकून अपघाती मृत्यू झाला; मुलगा गंभीर जखमी.

  • 31 Dec 2025 12:05 PM (IST)

    31 Dec 2025 12:05 PM (IST)

    स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर; ३ जणांचा मृत्यू

    मध्य प्रदेशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाणारे इंदूर हे शहर आजकाल त्याच्या सौंदर्यामुळे किंवा स्वच्छतेमुळे नाही तर दुसऱ्याच कारणामुळे चर्चेत आहे. शहरातील भागीरथपुरा परिसरात दूषित पाण्याचा कहर सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर अनेक जण आजारी असल्याचे वृत्त आहे. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री मोहन यादव यांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

  • 31 Dec 2025 11:55 AM (IST)

    31 Dec 2025 11:55 AM (IST)

    दिल्ली - NCRमध्ये धुक्याचे सावट कायम आहे, एक्यूआय ४०० च्या पुढे

    राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि संपूर्ण एनसीआर सध्या दाट धुके, तीव्र थंडी आणि प्रदूषणाच्या धोकादायक पातळीने ग्रासले आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) १ जानेवारीपर्यंत दाट धुके आणि थंडीसाठी पिवळा इशारा जारी केला आहे. धुक्यामुळे अनेक भागात दृश्यमानता जवळजवळ शून्य झाली आहे, ज्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. हवामान परिस्थिती लक्षात घेता, आयजीआय विमानतळाने एक सल्लागार जारी केला आहे.

  • 31 Dec 2025 11:45 AM (IST)

    31 Dec 2025 11:45 AM (IST)

    नवीन वर्षाच्या निमित्ताने धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर तुफान गर्दी

    नवीन वर्षांची सुरुवात आराध्य देवाच्या दर्शनाने करण्याचा अनेकांचा मानस असतो. यानिमित्ताने वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा २ किलोमीटरपर्यंत पसरल्या आहेत. प्रचंड गर्दीमुळे बाबा विश्वनाथांचे दर्शन ३ जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे वृत्त आहे. शहरातील हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊस पूर्णपणे भरले असल्याचे अहवालात म्हटले आहे.

  • 31 Dec 2025 11:35 AM (IST)

    31 Dec 2025 11:35 AM (IST)

    नवीन वर्षात योगींच्या सरकारच्या मंत्रिमंडळात होणार बदल

    नवीन वर्षात उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारमध्ये काही बदल होऊ शकतात. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली, ज्यामध्ये अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी देखील उपस्थित होते. बैठकीत संघटनेत आणि सरकारमध्ये काही बदलांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.  प्रथम मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल आणि त्यानंतर मोठे संघटनात्मक बदल केले जातील. नवे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी संघटनेत काही बदल करतील आणि एक नवीन टीम तयार करतील.

  • 31 Dec 2025 11:25 AM (IST)

    31 Dec 2025 11:25 AM (IST)

    निवडणुकीपूर्वीच भाजपचे दोन उमेदवार विजयी

    राज्यामध्ये महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपली असून 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच भाजपच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. कल्याण डोंबिवली नगरपालिकांमधून भाजपने विजयी खाते उघडले आहे. या पालिकेमधून भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे यांचा बिनविरोध विजय झाला आहे.

  • 31 Dec 2025 11:15 AM (IST)

    31 Dec 2025 11:15 AM (IST)

    26 महापालिकांसाठी अर्ज दाखल करण्याची मुदतवाढ संपली

    राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. 26 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आता उमेदवारांची अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. पक्षांनी अनेकांना उमेदवारी न दिल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नाराजीनाट्य जोरदार सुरु आहे.

  • 31 Dec 2025 11:05 AM (IST)

    31 Dec 2025 11:05 AM (IST)

    व्लादिमीर पुतिन यांनी स्वीकारली रशियाची धुरा;

    रशियाचे प्रभावी नेते व्लादिमीर पुतिन यांची चर्चा संपूर्ण जगात आहे. आजच्या दिवशी पुतिन यांनी रशियाची धुरा स्वीकारली. 31 डिसेंबर 1999 रोजी पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांना कार्यवाहक अध्यक्ष आणि उत्तराधिकारी म्हणून कारभार हाती घेतला. रशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी पदाचा राजीनामा दिला आणि व्लादिमीर पुतिन यांनी पद स्वीकारले. पुतिन यांच्या राजवटीत , रशियन राजकीय व्यवस्था व्यक्तिमत्त्व पंथ असलेल्या हुकूमशाहीत रूपांतरित झाली. पुतिन यांचा कार्यकाळ, त्यांची कामाची पद्धत आणि निर्णय याचे परिणाम फक्त रशियावर नाही तर संपूर्ण विश्वावर झाले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये व्लादिमीर पुतिन यांनी अढळ आणि अनोखे स्थान निर्माण केले आहे.

  • 31 Dec 2025 10:55 AM (IST)

    31 Dec 2025 10:55 AM (IST)

    धुरंधरच्या FA9LA गाण्यावर पाकिस्तानच्या बलोच लोकांनी केला डान्स

    FA9LA गाण्यावर खऱ्या बलुची पुरुषांचा डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये काही लोक टाळ्यांच्या कडकडाटात खांदे हलवत नाचत आहेत. अक्षय खन्नाच्या डान्स मूव्हजपेक्षा या मूव्हज थोड्या वेगळ्या हेत, पण त्यांच्या डान्स मूव्हज आणि एनर्जीने यूजर्सना चांगलंच इम्प्रेस केलं. गाण्याच्या बीटवर ते सुंदर नृत्य सादर करतात. बॅकग्राउंडमध्ये FA9LA हे गाणं वाजत असतं आणि पुरुष बीटच्या तालावरच नाचू लागतात. व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ खऱ्या बलुच लोकांचा FA9LA या गाण्यावर नाचतानाचा आहे. तथापि, व्हिडिओमधील लोक खरोखर FA9LA या गाण्यावर नाचत होते की हे गाणे नंतर एडिट केले गेले आहे याची पुष्टी झालेली नाही. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

  • 31 Dec 2025 10:47 AM (IST)

    31 Dec 2025 10:47 AM (IST)

    मैदा कशाला यावेळी पार्टीत सामील करा 'गव्हाचे सामोसे', कुरकुरीत आणि खमंग चवीची रेसिपी

    • गव्हाच्या पिठाचे समोसे मैद्याच्या समोशांपेक्षा हलके, फायबरयुक्त आणि पचनासाठी अधिक चांगले असतात.

    • योग्य मसाले आणि सारणामुळे हे समोसे बाहेरून खुसखुशीत व आतून मऊ-चविष्ट लागतात.

    • कमी तेलात किंवा एअर फ्रायरमध्येही हे हेल्दी समोसे सहज तयार करता येतात.

    समोसा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. चहा, पावसाळा आणि गरमागरम समोसा यांचं नातं फारच खास आहे. पण पारंपरिक समोसे मैद्यापासून बनवले जात असल्याने ते जड वाटू शकतात आणि रोजच्या आहारासाठी फारसे आरोग्यदायी नसतात. म्हणूनच आजकाल अनेक जण हेल्दी पर्यायांचा विचार करत आहेत. गव्हाच्या पिठाचे समोसे हा त्याचाच एक उत्तम पर्याय आहे.

    गव्हाचं पीठ फायबरयुक्त असल्यामुळे पचनासाठी चांगलं असतं आणि पोट भरल्याची भावना लवकर मिळते. त्यामुळे वजनाची काळजी घेणाऱ्यांसाठीही हे समोसे उत्तम ठरतात. चवीच्या बाबतीतही गव्हाच्या पिठाचे समोसे पारंपरिक समोशांपेक्षा कमी नाहीत. योग्य मसाले, चांगली सारण आणि योग्य तापमानात तळल्यास हे समोसे बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ व चविष्ट लागतात.

    घरात आलेले पाहुणे असोत, संध्याकाळचा नाश्ता असो किंवा एखादा खास प्रसंग असल्यास गव्हाच्या पिठाचे समोसे सर्वांनाच खुश करतील. विशेष म्हणजे हे समोसे आपण कमी तेलात किंवा एअर फ्रायरमध्येही बनवू शकतो. चला तर मग पाहूया, घरीच सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे हेल्दी आणि स्वादिष्ट समोसे कसे तयार करायचे. सोपी रेसिपी नोट करा.

    साहित्य

    बाहेरील आवरणासाठी:

    • गव्हाचे पीठ – 2 कप
    • मीठ – चवीनुसार
    • ओवा – ½ टीस्पून
    • तेल/तूप – 3 टेबलस्पून
    • पाणी – मळण्यासाठी

    सारणासाठी:

    • उकडलेले बटाटे – 3 ते 4
      हिरवे वाटाणे – ½ कप
      तेल – 2 टेबलस्पून
      जिरे – 1 टीस्पून
      आलं-हिरवी मिरची पेस्ट – 1 टीस्पून
      हळद – ½ टीस्पून
      लाल तिखट – 1 टीस्पून
      धणे-जिरे पूड – 1 टीस्पून
      गरम मसाला – ½ टीस्पून
      मीठ – चवीनुसार
      कोथिंबीर – बारीक चिरलेली

    कृती

    यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ, मीठ, ओवा आणि तेल घालून चांगले मिसळा.
    थोडेथोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या आणि झाकून 15–20 मिनिटे ठेवा.
    दुसऱ्या कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला. जिरे तडतडले की आलं-मिरची पेस्ट घाला.
    त्यात वाटाणे, बटाटे आणि सर्व कोरडे मसाले घालून चांगले परता. शेवटी कोथिंबीर घालून सारण थंड होऊ द्या.
    पीठाच्या मध्यम आकाराच्या पोळ्या लाटा, त्या अर्ध्या कापा आणि कोन तयार करा.
    त्या कोनामध्ये तयार सारण भरा आणि कडा पाण्याने चिकटवून समोसा बंद करा.
    कढईत मध्यम आचेवर तेल गरम करून समोसे मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
    गरमागरम गव्हाच्या पिठाचे समोसे हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
    अधिक हेल्दी पर्यायासाठी हे समोसे एअर फ्रायरमध्येही शिजवले जाऊ शकतात.
    हे लक्षात ठेवा की सामोसे हे नेहमी मंद आचेवर तळावे तेव्हाच ते खुसखुशीत बनतात.

    Wheat Samosa Recipe : आरोग्य आणि चव यांचा सुंदर संगम म्हणजे गव्हाच्या पिठाचे समोसे. आजच्या पार्टीत एक टेस्टी पण हेल्दी असा स्नॅक्स शोधत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

  • 31 Dec 2025 10:45 AM (IST)

    31 Dec 2025 10:45 AM (IST)

    ट्रम्पनंतर चीन बनला पाकिस्तानचा पाठीराखा

    भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) मध्ये पाकिस्तानचा (Pakistan) खरा दहशतवादी चेहरा उघड केला होता. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ही कारवाई केली होती. यावेळी ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये चार दिवस तीव्र संघर्ष झाला होता.

  • 31 Dec 2025 10:40 AM (IST)

    31 Dec 2025 10:40 AM (IST)

    संभाजीनगर गुन्हेगारांचा नवा अड्डा

    शहरातील वाढते गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यात पोलिसांना अपयश आले असून खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बलात्कार, विनयभंगाच्या घटनेत झपाट्‌याने वाढ होत आहे. गेल्या वर्षभरात दलित अत्याचारांमध्ये वाढ झाल्याने वर्षभरात तब्बल १०३ अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून ही बाब चिंताजनक आहे. मात्र, खुनाचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आल्याने पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी समाधान व्यक्त केले आहे.

     

  • 31 Dec 2025 10:30 AM (IST)

    31 Dec 2025 10:30 AM (IST)

    यर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट

    फ्री फायर मॅक्समध्ये अनेक इव्हेंट्स लाईव्ह आहेत. या सर्व इव्हेंट्समध्ये प्लेयर्सना अनेक जबरदस्त रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. यातीलच एक इव्हेंट म्हणजे विंटर फायनल इव्हेंट आहे. यामध्ये प्लेयर्सना व्हीकल स्किन रिवॉर्ड जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच गोल्ड आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस पॅक देखील मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लेअर्सना हे सर्व रिवॉर्ड्स डायमंडशिवाय क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

  • 31 Dec 2025 10:21 AM (IST)

    31 Dec 2025 10:21 AM (IST)

    हॉलिवूड अभिनेते Isiah Whitlock Jr यांचे वयाच्या ७१ व्या निधन

    हॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता इसाया व्हिटलॉक ज्युनियर यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले आहे. “द वायर” या गुन्हेगारी नाटकातून प्रसिद्धी मिळवलेल्या व्हिटलॉक ज्युनियर यांच्या निधनाने हॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मॅनेजरने अभिनेत्याच्या निधनाची घोषणा केली, ज्यामुळे शोककळा पसरली. इसाया व्हिटलॉक ज्युनियरचे चाहते सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

  • 31 Dec 2025 09:40 AM (IST)

    31 Dec 2025 09:40 AM (IST)

    Pune traffic Update नववर्ष स्वागतासाठी पुण्यात वाहतूक बदल

    नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात जल्लोष होत असल्याने लष्कर आणि डेक्कन जिमखाना परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी लक्षात घेऊन आज, बुधवार 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यानंतर वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिला आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

  • 31 Dec 2025 09:30 AM (IST)

    31 Dec 2025 09:30 AM (IST)

    India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: महिला टी-20 मालिकेत भारताचा क्लीन स्वीप; श्रीलंकेवर 15 धावांनी विजय

    India Women vs Sri Lanka Women, 5th T20I:

    तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या शेवटच्या टी-20 सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा 15 धावांनी पराभव करत मालिका 5-0 अशी जिंकली. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी निवडली, मात्र भारताने 176 धावांचे आव्हान उभे केले. हरमनप्रीत कौरच्या शानदार अर्धशतकामुळे भारताला मजबूत धावसंख्या उभारता आली. प्रत्युत्तरात श्रीलंकेला 160 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारतात 2026 मध्ये होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

  • 31 Dec 2025 09:24 AM (IST)

    31 Dec 2025 09:24 AM (IST)

    PMC Election 2026: पुण्यात भाजपचा नवा प्रयोग, तरुण व महिलांना संधी

    पुण्यात भाजपकडून तरुण व महिलांना संधी:  राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपने उमेदवारी निश्चित करताना नवे प्रयोग केल्याचे दिसून येत आहे. अनेक माजी नगरसेवकांना डावलत आमदार-खासदारांच्या नातेवाइकांनाही तिकीट नाकारण्यात आले असून तरुण व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे खुल्या जागांवरही महिलांना उमेदवारी देत विरोधकांसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घराणेशाहीला आळा घालण्याच्या या भूमिकेमुळे काही इच्छुक नाराज झाले असून, काहींनी इतर पक्षांतून उमेदवारी स्वीकारल्याचे चित्र आहे. भाजपचे हे नवे प्रयोग निवडणुकीत कितपत यशस्वी ठरतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

  • 31 Dec 2025 09:17 AM (IST)

    31 Dec 2025 09:17 AM (IST)

    PMC Election 2026: पुण्यात जागावाटपावरून भाजप–शिंदे शिवसेना युती कशी तुटली

    पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील जागावाटपाचा वाद चव्हाट्यावर आला. 165 जागांच्या महापालिकेत भाजपने शिंदे सेनेला केवळ 15 जागा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र शिंदे सेनेकडून 15 उमेदवारांची यादी मिळाल्यानंतर भाजपने युतीबाबतची चर्चा थांबवून सर्व उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश दिले. त्यानंतर शिंदे गटानेही पुण्यासाठी 165 एबी फॉर्म पाठवले. युती तुटल्याचे दावे झाले असतानाच काही नेत्यांनी चर्चेचा सूर कायम असल्याचे सांगितले, मात्र अंतर्गत घडामोडी पाहता पुण्यात भाजप–शिंदे शिवसेना युती होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट होत आहे.

Maharashtra to World Breaking News : 

 भाजप सरकार कोसळणार? मुख्यमंत्री अन् मंत्र्यांमधला वाद चव्हाट्यावर

हरियाणा: हरियाणा राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. हरियाणा सरकार डगमगले असल्याचे म्हटले जात आहे. हरियाणामधील भाजप सरकार अडचणीत असल्याची चर्चा सुरू आहे. सरकारमध्ये बंडखोरीचे वारे वाहत असलत्याचे म्हटले जात आहे. सरकारमधील कॅबिनेट मंत्री अनिल वीज यांनी कामगार विभागात झालेला घोटाला उघडकीस आणून स्वतःच्याच सरकारला अडचणीत आणले असल्याचे सांगितले जात आहे. कॅबिनेट मंत्री वीज यांनी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याकडे स्वतंत्र यंत्रणेकडून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

Web Title: Maharashtra india breaking news live update election live updates sports breaking breaking news alert politics breaking news live

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 09:11 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today:  राज्यातील महापालिका निवडणुकांचे latest Updates, वाचा सविस्तर
1

Maharashtra Breaking News Today: राज्यातील महापालिका निवडणुकांचे latest Updates, वाचा सविस्तर

Maharashtra Breaking News Today: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती नाहीच
2

Maharashtra Breaking News Today: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती नाहीच

Maharashtra Breaking LIVE News Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ब्रेकिंग बातम्यांच्या लाईव्ह अपडे्स एका क्लिकवर
3

Maharashtra Breaking LIVE News Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ब्रेकिंग बातम्यांच्या लाईव्ह अपडे्स एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.