#LiveBlogMarathi #BreakingNews #आजच्या_बातम्या
27 Dec 2025 12:29 PM (IST)
शिवसेना नेते व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयासमोर आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.
27 Dec 2025 12:26 PM (IST)
कल्याण–डोंबिवलीत महायुतीमध्ये सक्रिय भूमिका बजावणारे आणि आगरी–कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. कल्याण पूर्वेतील शिवसेनेच्या ‘निर्धार मेळाव्या’त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
27 Dec 2025 12:20 PM (IST)
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि मनसे यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून 122 जागांपैकी 54 जागांवर मनसे, तर 68 जागांवर शिवसेना ठाकरे सेना पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहेच.
27 Dec 2025 12:12 PM (IST)
माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत दुरुस्ती करण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. परिणामी लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावणार आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी-बांद्रा स्थानकांदरम्यान अप-डाउन दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत दुरुस्ती असणार आहे. या दरम्यान सीएसएमटी ते चुनाभट्टी, बांद्रा-गोरेगाव दरम्यानची लोकल वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातून पनवेल करिता स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहे.
27 Dec 2025 12:06 PM (IST)
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील गोला पोलीस स्टेशन परिसरात हुंड्यासाठी छळ आणि फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका विवाहित महिलेने तिच्या पती आणि सासरच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत आणि न्यायासाठी पोलिसांकडे दाद मागितली आहे. महिलेचे म्हणणे आहे की, तिचा नवरा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे, तरीही त्याचे सासरचे लोक हुंड्यासाठी तिचा छळ करत आहेत.
27 Dec 2025 12:04 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळींची विधानं चर्चेचे कारण ठरत आहेत. असे असताना शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी शरद पवारांबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यावर आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शरद पवारांना समाविष्ट करण्याचा अधिकार आम्हाला नाही; हा निर्णय केवळ भाजप हायकमांड घेईल, असे त्यांनी म्हटले आहे.
27 Dec 2025 11:54 AM (IST)
Controversy over Joe Root dropping a catch : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यामध्ये इंग्लडच्या खराब कामगिरीनंतर चौथ्या सामन्यामध्ये इंग्लडने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या दिवसामध्ये 20 विकेट्स गोलंदाजांनी घेतल्यानंतर सोशल मिडियावर या सामन्यांची मोठी चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी सध्या इंग्लडला 175 धावांची सामना जिंकण्यासाठी गरज आहे. त्याआधी सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
27 Dec 2025 11:44 AM (IST)
नेदरलँड्समधील एका स्वयंसेवी संस्थेने टाटा स्टीलच्या दोन उपकंपन्यांवर १.६ अब्ज डॉलर्स (अंदाजे ₹१३,००० कोटी) चा दावा दाखल केला आहे. कंपनीने गुरुवारी शेअर बाजारांना माहिती दिली की एका डच स्वयंसेवी संस्थेने त्यांच्या डच युनिटविरुद्ध दावा दाखल केला आहे. या खटल्यात अंदाजे १.६ अब्ज डॉलर्स (अंदाजे ₹१३,००० कोटी) नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. स्टिचिंग फ्रिस विंड (SFW) या संस्थेने नेदरलँड्समधील जिल्हा न्यायालयात हा खटला दाखल केला आहे.
27 Dec 2025 11:34 AM (IST)
Honor Win आणि Honor Win RT हे दोन स्मार्टफोन्स शुक्रवारी चीनमध्ये लाँच करण्यात आले. लेटेस्ट Honor स्मार्टफोन तीन रंगात लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. Honor Win सीरीजच्या स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच डिस्प्ले आणि 10,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामुळे बॅटरीच्या बाबतीत हे स्मार्टफोन्स अतिशय शक्तीशाली मानले जात आहेत. Honor Win मध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर आहे. तर Win RT मॉडेलमध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट देण्यात आला आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या दोन्ही मॉडेल्समध्ये 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर आहे. डिव्हाईस प्रीइंस्टॉल्ड MagicOS 10 सह उपलब्ध आहेत.
27 Dec 2025 11:24 AM (IST)
SA20 च्या चौथ्या हंगामाची सुरुवात एका रोमांचक सामन्याने झाली. गेल्या हंगामातील तळाच्या डर्बन सुपर जायंट्स (DSG) ने MI केपटाऊनचा पराभव केला. न्यूलँड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात 449 धावा झाल्या, जो SA20 इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सामना होता. प्रथम फलंदाजी करताना, डर्बन सुपर जायंट्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 232 धावा केल्या. तथापि, रायन रिकेल्टनच्या स्फोटक शतकानंतरही, MI केपटाऊनचा 15 धावांनी पराभव झाला.
27 Dec 2025 11:14 AM (IST)
क्वालालंपूर : थायलंड (Thailand) आणि कंबोडियातील संघर्ष काही थांबण्याचे नाव घेईना. दोन्ही देशांत शांतता चर्चा सुरु असताना पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये सीमेवर पुन्हा चकामक झाली आहे. कंबोडियाने थाई सैनिकांवर जोरदार हवाई हल्ल्याचा आरोप केला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
27 Dec 2025 10:59 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळींची विधानं चर्चेचे कारण ठरत आहेत. असे असताना शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी शरद पवारांबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यावर आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शरद पवारांना समाविष्ट करण्याचा अधिकार आम्हाला नाही; हा निर्णय केवळ भाजप हायकमांड घेईल, असे त्यांनी म्हटले आहे.
27 Dec 2025 10:55 AM (IST)
नेदरलँड्समधील एका स्वयंसेवी संस्थेने टाटा स्टीलच्या दोन उपकंपन्यांवर १.६ अब्ज डॉलर्स (अंदाजे ₹१३,००० कोटी) चा दावा दाखल केला आहे. कंपनीने गुरुवारी शेअर बाजारांना माहिती दिली की एका डच स्वयंसेवी संस्थेने त्यांच्या डच युनिटविरुद्ध दावा दाखल केला आहे. या खटल्यात अंदाजे १.६ अब्ज डॉलर्स (अंदाजे ₹१३,००० कोटी) नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. स्टिचिंग फ्रिस विंड (SFW) या संस्थेने नेदरलँड्समधील जिल्हा न्यायालयात हा खटला दाखल केला आहे.
27 Dec 2025 10:49 AM (IST)
Honor Win आणि Honor Win RT हे दोन स्मार्टफोन्स शुक्रवारी चीनमध्ये लाँच करण्यात आले. लेटेस्ट Honor स्मार्टफोन तीन रंगात लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. Honor Win सीरीजच्या स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच डिस्प्ले आणि 10,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामुळे बॅटरीच्या बाबतीत हे स्मार्टफोन्स अतिशय शक्तीशाली मानले जात आहेत. Honor Win मध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर आहे. तर Win RT मॉडेलमध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट देण्यात आला आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या दोन्ही मॉडेल्समध्ये 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर आहे. डिव्हाईस प्रीइंस्टॉल्ड MagicOS 10 सह उपलब्ध आहेत.
27 Dec 2025 10:41 AM (IST)
SA20 च्या चौथ्या हंगामाची सुरुवात एका रोमांचक सामन्याने झाली. गेल्या हंगामातील तळाच्या डर्बन सुपर जायंट्स (DSG) ने MI केपटाऊनचा पराभव केला. न्यूलँड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात 449 धावा झाल्या, जो SA20 इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सामना होता. प्रथम फलंदाजी करताना, डर्बन सुपर जायंट्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 232 धावा केल्या. तथापि, रायन रिकेल्टनच्या स्फोटक शतकानंतरही, MI केपटाऊनचा 15 धावांनी पराभव झाला.
27 Dec 2025 10:34 AM (IST)
क्वालालंपूर : थायलंड (Thailand) आणि कंबोडियातील संघर्ष काही थांबण्याचे नाव घेईना. दोन्ही देशांत शांतता चर्चा सुरु असताना पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये सीमेवर पुन्हा चकामक झाली आहे. कंबोडियाने थाई सैनिकांवर जोरदार हवाई हल्ल्याचा आरोप केला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
27 Dec 2025 10:27 AM (IST)
राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकीय वर्तुळात अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. अशातच शुक्रवारी युतीच्या चर्चा फिस्कटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांनाच चक्रावून सोडले आहे. पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून अजित पवार कोणालाही काहीही न सांगता अचानक रवाना झाले. विशेष म्हणजे, त्यांनी कोणताही सरकारी ताफा किंवा पोलीस संरक्षण न घेता प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार नेमके कुठे गेले, याबाबत सध्या तर्कवितर्क सुरू असून, चर्चांना उधाण आले आहे.
27 Dec 2025 10:19 AM (IST)
अॅशेस मालिकेचा चौथा सामना सध्या खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी सामना संपेल अशी परिस्थिती आहे. इंग्लडने पहिल्या तीन सामन्यामध्ये केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर आता चौथ्या सामन्यामध्ये त्याची प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली आहे. इंग्लडने कमालीची कामगिरी चौथ्या सामन्यामध्ये केली आहे. सामन्याचा दुसरा दिवस असताना आता इंग्लडला ऑस्ट्रेलियाच्या संघाने फार कमी धावांचे लक्ष दिले आहे. पहिल्या तीन सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाचा दबदबा पाहायला मिळाला आता चौथ्या सामन्यामध्ये इंग्लडच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
27 Dec 2025 10:12 AM (IST)
शेतनागभीड तालुक्यातील सावकारी कर्जची परतफेड करण्यासाठी किडनी विकल्याचे प्रकरण उघडकीस आले. हे प्रकरण समोर येताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात सहा सावकारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. तर या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली. किडनी विक्री प्रकरणात पोलिसांनी आरोपी सुब्रोजित पॉलचा शोध घेण्यासाठी कोलकाता शहर पालथे घातले. परंतु तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही.
27 Dec 2025 10:08 AM (IST)
बाॅलिवूडचा स्टार सलमान खान आज 60 वर्षाचा झाला आहे, बॉलिवूडचा सुपरस्टार आणि भाईजान सलमान खान त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. आज, २७ डिसेंबर रोजी सलमानचा वाढदिवस पनवेल येथील त्याच्या फार्महाऊसवर साजरा होत आहे, ज्यामध्ये अनेक प्रमुख सेलिब्रिटी उपस्थित आहेत. सलमानने वाढदिवसाच्या पार्टीसाठी बॉलिवूडबाहेरील अनेक प्रमुख व्यक्तींनाही आमंत्रित केले आहे, ज्यात माजी भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचाही समावेश आहे. धोनी त्याच्या कुटुंबासह या भव्य पार्टीत सहभागी होण्यासाठी पोहोचला होता.
27 Dec 2025 09:44 AM (IST)
फ्री फायर मॅक्स हा भारतातील लोकप्रिय बॅटल रॉयल गेम्सपैकी एक आहे. दररोज करोडो प्लेअर्स हा गेम खेळतात. मात्र या गेममध्ये काही वेळेस प्लेअरचे अकाऊंट अचानक बॅन होते. ज्यामुळे प्लेअर्सनी जिंकलेले स्किन्स, रँक, डायमंड्स आणि त्यांची सर्व मेहनत वाया जाते. यामुळे आपलं अकाऊंट बॅन होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहे.
27 Dec 2025 09:39 AM (IST)
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांनाच चक्रावून सोडले आहे. पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून अजित पवार कोणालाही काहीही न सांगता अचानक रवाना झाले. विशेष म्हणजे, त्यांनी कोणताही सरकारी ताफा किंवा पोलीस संरक्षण न घेता प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार नेमके कुठे गेले, याबाबत सध्या तर्कवितर्क सुरू असून, विविध चर्चांना उधाण आले आहे.
27 Dec 2025 09:35 AM (IST)
वाई : किसन वीर महाविद्यालयाच्या परिसरात नुकताच एक दुर्मिळ असा मून मॉथ (Moon Moth) आढळले आहे. महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक जितेंद्र चव्हाण व ग्रंथालय परिचर ऋषिकेश शिंदे यांना हा मून मॉथ दिसून आला. हा मून वॉथ दिसताच विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
27 Dec 2025 09:26 AM (IST)
Harmanpreet Kaur breaks Meg Lanning’s record : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेच्या पहिल्या तीनही सामन्यामध्ये भारताच्या संघाचा श्रीलंकेवर दबदबा पाहायला मिळाला. भारताच्या संघाने पहिल्या तीनही सामन्यामध्ये वर्चस्व पाहायला मिळाला. या तीनही सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाची निराशाजनक फलंदाजी पाहायला मिळाली. शुक्रवारी तिरुअनंतपुरममधील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा ८ विकेट्सने पराभव केला.
27 Dec 2025 09:25 AM (IST)
वाई : किसन वीर महाविद्यालयाच्या परिसरात नुकताच एक दुर्मिळ असा मून मॉथ (Moon Moth) आढळले आहे. महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक जितेंद्र चव्हाण व ग्रंथालय परिचर ऋषिकेश शिंदे यांना हा मून मॉथ दिसून आला. हा मून वॉथ दिसताच विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
27 Dec 2025 09:17 AM (IST)
सातारा : तब्बल चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीची अखेर करत नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी सभागृहाच्या शानदार सोहळ्यात नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
27 Dec 2025 09:17 AM (IST)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक ठिकाणी तापमानात घट होऊन थंडी वाढताना दिसत आहे. नवीन वर्षाच्या आधी, उत्तर भारत, पूर्व आणि ईशान्य भारतात हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. या बदलत्या हवामानाचा वाहतूक आणि आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहे. या बदलत्या हवामानापासून सध्यातरी कोणताही दिलासा मिळणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत.
27 Dec 2025 09:16 AM (IST)
खोपोली नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे, जिल्हा प्रवक्ता भरत भगत यांच्यासह एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यानंतर खोपोली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, खबरदारी म्हणून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, काळोखे कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. घटनेचा तपास पोलीस करत असून, शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
27 Dec 2025 09:12 AM (IST)
Harmanpreet Kaur breaks Meg Lanning’s record : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेच्या पहिल्या तीनही सामन्यामध्ये भारताच्या संघाचा श्रीलंकेवर दबदबा पाहायला मिळाला. भारताच्या संघाने पहिल्या तीनही सामन्यामध्ये वर्चस्व पाहायला मिळाला. या तीनही सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाची निराशाजनक फलंदाजी पाहायला मिळाली. शुक्रवारी तिरुअनंतपुरममधील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा ८ विकेट्सने पराभव केला.
27 Dec 2025 09:12 AM (IST)
राज्यात थंडीचे चढ-उतार सुरू असले तरी गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सकाळच्या वेळी कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरत असून अनेक भागांत किमान तापमान सातत्याने १० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले जात आहे. हवामान विभागानुसार, राज्यातील किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नसून पुढील काही दिवस थंडी कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
27 Dec 2025 09:08 AM (IST)
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक ठिकाणी तापमानात घट होऊन थंडी वाढताना दिसत आहे. नवीन वर्षाच्या आधी, उत्तर भारत, पूर्व आणि ईशान्य भारतात हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. या बदलत्या हवामानाचा वाहतूक आणि आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहे. या बदलत्या हवामानापासून सध्यातरी कोणताही दिलासा मिळणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत.
Maharashtra to World Breaking News Live:
आगामी 2026 मधील कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. उमेदवार निवडीबाबत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अद्याप तिढा कायम असताना काँग्रेसने आघाडी घेतली आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून या यादीत 48 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत राजेश लाटकर यांच्यासह अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. लवकर यादी जाहीर केल्याने संभाव्य बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येत असल्याचे चित्र आहे.