Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cabinet Decision : मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय; नगराध्यक्षांना बहुमताने हटवता येणार

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कैद्यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी भरपाई, कर वसुलीसाठी अभय योजना यासारखे ७ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 15, 2025 | 04:36 PM
मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय; नगराध्यक्षांना बहुमताने हटवता येणार

मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय; नगराध्यक्षांना बहुमताने हटवता येणार

Follow Us
Follow Us:

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कैद्यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी भरपाई, कर वसुलीसाठी अभय योजना यासारखे ७ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित आज बैठक पार पडली, या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

बैठकीतील ७ महत्वाचे निर्णय

1) विधि व न्याय विभाग

ठाणे जिल्ह्यातील चिखलोली-अंबरनाथमध्ये दिवाणी न्यायालय कनिष्ठ न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच त्याअनुषंगाने पदे मंजूर करण्यात येणार आहेत.

2) गृह विभाग

कैद्यांचा कोठडीत मृत्यू झाला त्याला भरपाई देण्यात येणार आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार हा निर्णय सरकारने घेतला आहे.

3) नगरविकास विभाग

नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक वसाहतीतील स्थावर मालमत्ता हस्तांतरणासाठी नियमांमध्ये बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

4) नगरविकास विभाग

नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिकनगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. या सर्व मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ करून कर वसुलीसाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

5) नगरविकास विभाग

नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक वसाहतींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींला मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री कार्यालय
मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त
(मंगळवार, दि. १५ एप्रिल २०२५)
एकूण निर्णय: ७ विधि व न्याय विभाग
चिखलोली-अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करणार व त्याअनुषंगाने पदे मंजूर
गृह विभाग… — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 15, 2025

6) महसूल व वन विभाग

भूसंपादन, पुनर्वसन पुनर्वसाहत भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा करताना व्याज आकारलं जातं. या आकारण्यात येणार्‍या व्याजदरांच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योग्य भरपाई आणि पारदर्शक हक्क अधिनियम, 2013, कलम-30(3), 72 व 80 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

7) उच्च व तंत्रशिक्षण विभाग

लातूरमधील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: Maharashtra cabinet 7 decisions cabinet meeting today presence of cm devendra fadnavis ajit pawar and eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 04:36 PM

Topics:  

  • cabinet decisions
  • Maharashtra Cabinet Decision
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Buldhana News: निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देवरांचे आवाहन
1

Buldhana News: निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! आता घरबसल्या सादर करा हयातीचा दाखला; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. देवरांचे आवाहन

Wardha News: कारंजातील अचानक डायलिसिस केंद्र बंद! निधीअभावी मोफत सेवा ठप्प; रुग्णांच्या अडचणीत भर
2

Wardha News: कारंजातील अचानक डायलिसिस केंद्र बंद! निधीअभावी मोफत सेवा ठप्प; रुग्णांच्या अडचणीत भर

Cabinet Decisions 2026 : मोदी सरकारचे ५ मोठे निर्णय! संग्रहालय, मेट्रोसह शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचे अनुदान
3

Cabinet Decisions 2026 : मोदी सरकारचे ५ मोठे निर्णय! संग्रहालय, मेट्रोसह शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचे अनुदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.