Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Cabinet Meeting : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, फडणवीस सरकारचे 7 मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसह विविध क्षेत्रांसाठी 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

  • By विवेक
Updated On: Sep 15, 2026 | 03:44 PM
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • ऊस उत्पादक शेतकरी आणि सहकारी साखर कारखान्यांना सॉफ्ट लोनचा आधार मिळणार.
  • 2025-26 मधील थकीत FRP देण्यासाठी आणि 2026-27 गाळप हंगामासाठी सरकारचे पाठबळ.
  • हरेगावमधील जमीन मूळ मालक शेतकऱ्यांना परत करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यास मंजुरी.
 

Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज, 15 सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी, साखर उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी धोरणांच्या मूल्यांकनाशी संबंधित असे तब्बल 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे, ऊस उत्पादक शेतकरी आणि सहकारी साखर कारखान्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन

साखर कारखान्यांसमोर असलेल्या आर्थिक अडचणी लक्षात घेता सरकारने सहकारी साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन देण्याचा निर्णय घेतला आहे. 2025-26 च्या गाळप हंगामातील थकीत एफआरपी देण्यासाठी तसेच आगामी 2026-27 च्या गाळप हंगामासाठी कारखान्यांना शासनाकडून आर्थिक पाठबळ मिळणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकीत एफआरपी मिळण्याचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.

सरकारच्या योजनांचं होणार मूल्यमापन

राज्य सरकारच्या 25 प्रमुख धोरणांसह 25 महत्त्वाच्या लोककल्याणकारी योजनांचे विश्लेषण आणि मूल्यांकन करण्यासाठी ‘महाराष्ट्र तांत्रिक सहाय्यता कक्ष’ अर्थात ‘महा-टॅक’ स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. IIM मुंबई आणि CRISP यांच्या शिफारशींच्या आधारे हे मूल्यांकन केले जाणार आहे.

अकोल्यात 26 लाख 57 हजार ज्येष्ठांना ‘अमृत’ लाभ’; अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे सादर

शेतकऱ्यांना आणखी एक मोठा दिलासा

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील जमीन मूळ मालकांना परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम, 1961 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली.

याशिवाय नाशिकमधील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेला अभ्यासिका आणि वाचनालयासाठीच्या भाडेपट्टा करारावर मुद्रांक शुल्क माफी देण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी नगरपरिषदेला व्यापारी संकुल उभारण्यासाठी 6,240.30 चौ.मी. शासकीय जमीन विनामूल्य देण्यासही मंजुरी मिळाली आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रोजेक्टच्या अध्यक्षांच्या कार्यालयासाठी चार नवीन पदे निर्माण करण्यास आणि त्यासाठीच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.

एकूणच, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी आणि साखर उद्योगाला दिलासा देण्यापासून सरकारी योजनांच्या मूल्यमापनापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी

Web Title: Maharashtra cabinet meeting 7 big decisions sugarcane farmers soft loan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Cabinet Decision
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

‘माय मरो पण मावशी जगो!’; फडणवीसांच्या ‘मराठी आई, हिंदी मावशी’ विधानावर अंबादास दानवेंचा खोचक टोला
1

‘माय मरो पण मावशी जगो!’; फडणवीसांच्या ‘मराठी आई, हिंदी मावशी’ विधानावर अंबादास दानवेंचा खोचक टोला

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…
2

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
3

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

MPSC विद्यार्थ्यांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय! ‘सगळ्या मागण्या मान्य’, 8 दिवसांत कारवाईचं आश्वासन; परीक्षेचं रिचेकिंग होणार
4

MPSC विद्यार्थ्यांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय! ‘सगळ्या मागण्या मान्य’, 8 दिवसांत कारवाईचं आश्वासन; परीक्षेचं रिचेकिंग होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.