Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Bhushan: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर; फडणवीसांची घोषणा

Ram Sutar : इंदू मिल येथे निर्माणाधीन असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती तयार करण्याचे कामही राम सुतार करीत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 20, 2025 | 03:26 PM
Maharashtra Bhushan: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर; फडणवीसांची घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबद्दल घोषणा केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या बाबत दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले, राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत. त्यांचे वय सध्या १०० वर्ष असून अजूनही ते शिल्प तयार करण्याचे काम करीत आहेत. इंदू मिल येथे निर्माणाधीन असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती तयार करण्याचे कामही राम सुतार करीत आहेत.

महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झाला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. या पुरस्कार निवडीबाबत १२ मार्च २०२५ रोजी निवड समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राम सुतार यांचे नाव २०२४ च्या पुरस्कारासाठी मान्यता देण्यात आली. या पुरस्कारचे स्वरूप २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असे आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी अनेक पुतळ्यांचे निर्माण केले आहे. राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार आहेत. धुळे जिल्ह्यातील गोंदूर हे त्यांचे मूळ गाव. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 मध्ये झाला. देशभरात त्यांनी अनेक शिल्प साकारली आहेत. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा देखील राम सुतार यांनी साकारला आहे.

राम सुतार यांची अनेक शिल्पांमध्ये संस्कृतीचे दर्शन घडते. त्यांना 2016 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यांच्या शिल्पकलेत भारतीय संस्कृतीचा इतिहासाचा उत्तम मिलाफ दिसून येतो. राम सुतार यांनी संसद भवन परिसरात महात्मा गांधी, महाराजा रणजीत सिंग, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, सरदार पटेल, यांचे पुतळे साकारले आहेत.

राम सुतार यांनी कांस्य, दगड आणि संगमरवरी दगडात अनेक पुतळे उभारले आहेत. राम सुतार यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा देखील साकारला आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हे सरदार सरोवरच्या जवळ बांधण्यात आलेले स्मारक आहे.

Web Title: Maharashtra cm devendra fadnavis announced maharashtra bhushan award indian sculptor ram sutar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!
1

मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!

Devendra Fadnavis: मराठा आणि OBC आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका; “कोणाच्याही ताटातील काढून दुसऱ्याला देणार नाही”
2

Devendra Fadnavis: मराठा आणि OBC आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका; “कोणाच्याही ताटातील काढून दुसऱ्याला देणार नाही”

Maharashtra Rain News: अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
3

Maharashtra Rain News: अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली; हजारो महिला पुनर्पडताळणीत ठरल्या बाद
4

लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली; हजारो महिला पुनर्पडताळणीत ठरल्या बाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.