Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: मराठा आणि OBC आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका; “कोणाच्याही ताटातील काढून दुसऱ्याला देणार नाही”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'कोणाच्याही ताटातील काढून दुसऱ्याला देणार नाही' अशी स्पष्ट भूमिका घेतली. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्यात ते बोलत होते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 07, 2025 | 08:46 PM
मराठा आणि OBC आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

मराठा आणि OBC आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

Follow Us
Close
Follow Us:

Yala Saswad/Sambhaji Mahamuni: मराठा आरक्षणावरून सध्या सुरू असलेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. “दोन समाजांना एकमेकांमध्ये भांडणे लावायची आमची नीती नाही. एकाच्या ताटातील काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणार नाही,” असे सांगत मराठा आरक्षणात ओबीसी समाजाचे कोणतेही नुकसान होणार नाही, याला प्राधान्य दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रामोशी समाजाला सक्षम करण्याचे सरकारचे धोरण

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामोशी समाजासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाकडून २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणतेही तारण न घेता दिले जाईल, तर १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. “पुढील काळात नोकरी मागणारे नाही, तर नोकऱ्या देणारे बना,” असे आवाहन करत त्यांनी रामोशी महामंडळाला तरुणांना पोलिस भरतीचे प्रशिक्षण देण्याची योजना तयार करण्याचे निर्देश दिले. यामुळे समाजातील तरुण-तरुणींना पोलीस सेवेत दाखल होऊन उमाजी नाईक यांचे कार्य पुढे नेता येईल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भिवडी, ता. पुरंदर, जि. पुणे येथे ‘आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा 234 वा शासकीय जयंती सोहळा’ कार्यक्रमस्थळी ‘राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळा’द्वारे निर्मित कक्षाचे उदघाटन करत, महामंडळाच्या विविध योजनांच्या माहिती फलकांचे अवलोकन… pic.twitter.com/ccAiDHzKrh — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 7, 2025

हे देखील वाचा: Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय; आत्महत्या केलेल्या २१ कुटुंबांना प्रत्येकी १० लाखांची मदत

‘हैदराबाद गॅझेट’वर स्पष्टीकरण

मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील कुणबी नोंदींवरही स्पष्टीकरण दिले. “मराठवाड्यात इंग्रजांचे नव्हे, तर निजामाच्या शासन होते. त्यामुळे इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही. म्हणून आम्ही ‘हैदराबाद गॅझेट’चा आधार घेतला आहे. ज्यांच्याकडे गॅझेटचा पुरावा असेल आणि ज्यांची नोंद असेल, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल,” असे त्यांनी सांगितले. यामुळे सरसकट प्रमाणपत्रे दिली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले.

आमदार गोपीचंद पडळकर यांनीही यावर बोलताना, “आमचा ओबीसी समाजावर विश्वास आहे. तुम्ही आमचे हक्क सुरक्षित ठेवा, आम्ही तुमचा गड राखतो,” असे सांगत मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर विश्वास व्यक्त केला.

विरोधकांवर जोरदार निशाणा

या सोहळ्यात बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. पूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने उमाजी नाईक यांची शासकीय जयंती साजरी केली नाही, असा आरोप शिवेंद्रराजे यांनी केला. “आज मराठा आणि ओबीसी समाजाचे खरे नेते देवेंद्र फडणवीस आहेत,” असे सांगत, त्यांनी आंदोलनामुळे घाबरून न जाण्याचे आवाहन केले. या सोहळ्याचे आयोजन जय मल्हार क्रांती संघटनेने केले होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांनी राजे उमाजी नाईक स्मारकाचा विकास आराखडा सादर केला आणि आर्थिक महामंडळातून मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा वाढवण्याची मागणी केली.

Web Title: Mumbais ganesh visarjan ceremony enchants foreign tourists chief minister and deputy chief minister perform bappas aarti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 08:16 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • maratha obc reservation
  • Maratha Reservation
  • OBC Reservation
  • Pune

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात सुरु होणार जगातलं पहिलं अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग इंस्टीट्युट, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
1

महाराष्ट्रात सुरु होणार जगातलं पहिलं अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग इंस्टीट्युट, देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Pune News: ‘प्राध्यापक भरती संदर्भातील अध्यादेश नियमबाह्य…’; संघटनेने आक्रमक पवित्रा घेत थेट अन्नत्याग…
2

Pune News: ‘प्राध्यापक भरती संदर्भातील अध्यादेश नियमबाह्य…’; संघटनेने आक्रमक पवित्रा घेत थेट अन्नत्याग…

Farmer Protest: बच्चू कडूंचा ‘ट्रॅक्टर मार्च’ नागपुरात दाखल; मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ते RSS मुख्यालय परिसरापर्यंत ‘हाय अलर्ट’!
3

Farmer Protest: बच्चू कडूंचा ‘ट्रॅक्टर मार्च’ नागपुरात दाखल; मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ते RSS मुख्यालय परिसरापर्यंत ‘हाय अलर्ट’!

Mumbai Climate Week 2026: मोठी घोषणा! भारत फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘मुंबई क्लायमेट वीक’चे यजमानपद भूषवणार
4

Mumbai Climate Week 2026: मोठी घोषणा! भारत फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘मुंबई क्लायमेट वीक’चे यजमानपद भूषवणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.