Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली; हजारो महिला पुनर्पडताळणीत ठरल्या बाद

सध्या जिल्ह्यात २ लाख ४३ हजार ६०५ लाभार्थी आहेत. भंडारा जिल्ह्यात सुरुवातीला २ लाख ९९ हजार ९७१ लाडके बहिणींचे अर्ज प्राप्त झाले. त्यातून कागदपत्रांच्या अपूर्तमुळे १७१८३ अर्ज अपात्र ठरले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 03, 2025 | 02:51 PM
महिला योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत खडखडाट

महिला योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत खडखडाट

Follow Us
Follow Us:

भंडारा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरत आहे. या योजनेतील काही गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच पारदर्शकता आणण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह भंडारा जिल्ह्यातही विशेष पडताळणी व तपासणी मोहीम युद्ध स्तरावर राबविण्यात आली आहे.

सध्या जिल्ह्यात २ लाख ४३ हजार ६०५ लाभार्थी आहेत. भंडारा जिल्ह्यात सुरुवातीला २ लाख ९९ हजार ९७१ लाडके बहिणींचे अर्ज प्राप्त झाले. त्यातून कागदपत्रांच्या अपूर्तमुळे १७१८३ अर्ज अपात्र ठरले. त्यामुळे जिल्ह्यात २ लाख ८२ हजार ७८८ अर्ज पात्र ठरले होते. मात्र, आजपर्यंत पुनर्पडताळणीत बोगस आढळून आलेले २२ हजार लाडक्या बहिणी आढळल्याने लाभ घेणाऱ्या २ लाख ४३ हजार ६०५ लाभार्थी महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, अर्ज केलेल्या महिलांपैकी ९४ टक्क्यांहून अधिक महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळत आहे. ही योजना राज्य शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केली असून, पात्र महिलांना दरमहा १५०० इतके मानधन त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होते. लाडक्या बहिणींचा लाभ घेणाऱ्या बोगास लाभार्थी आढळून आल्याने पुनर्तपासणी सुरू केली असल्याने मागील एक महिन्यात २२ हजार बोगस लाभार्थी आढळून आल्या आहेत.

अजूनही महिला रडारवर

कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक असणाऱ्या, कुटुंबातील सदस्य आयकर रिटर्न भरत असल्यास, शासकीय/निमशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या, पेन्शनधारक तसेच इतर शासकीय योजनांमधून १५०० पेक्षा जास्त अनुदान मिळणाऱ्या, घरात चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) असणे, स्थायिक पत्त्याबाहेर स्थलांतरित झालेले अर्जदार योजनेसाठी अपात्र आहेत. काही महिलांनी आपली पात्रता स्वतः तपासून योजनेतून माघार घेतली. त्यामध्ये निराधार योजनेचे लाभार्थी आहेत. या महिलांनी महिला व बालविकास कार्यालयात लेखी निवेदन देऊन लाभ नाकारला.

अनुदानामुळे आर्थिक स्थैर्य

‘लाडकी बहीण’ योजनेत २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा १५०० अनुदान दिले जाते. विशेषतः शेतमजूर, विधवा महिला, घरकाम करणाऱ्या महिला व बचत गटांतील कार्यकर्त्यांना या योजनेचा मोठा फायदा झाला आहे. गावपातळीवर महिलांच्या आर्थिक स्थैर्याला या योजनेमुळे बळ मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बायोमेट्रीक पडताळणी होणार

तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी व अपात्रतेचे निदान अचूक होण्यासाठी ओटीपी व आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी लागू करण्याचा विचार शासनाने सुरू केला आहे. यामुळे भविष्यातील फसवणूक रोखता येईल, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

Web Title: Thousands of women were rejected in the re examination of ladki bahin yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government
  • Maharashtra Government Scheme

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता थेट तालुक्यात, गरजू रुग्णांना मिळणार मोठा दिलासा
1

दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता थेट तालुक्यात, गरजू रुग्णांना मिळणार मोठा दिलासा

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांगांसाठी १६ योजना जाहीर, २१८ कोटींचा निधी उपलब्ध
2

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांगांसाठी १६ योजना जाहीर, २१८ कोटींचा निधी उपलब्ध

Marathwada Water Grid Project : मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार? २० हजार कोटींचा वॉटर ग्रीड प्रकल्प, फडणवीसांचे निर्देश
3

Marathwada Water Grid Project : मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार? २० हजार कोटींचा वॉटर ग्रीड प्रकल्प, फडणवीसांचे निर्देश

Mahayuti Internal Politics: मुख्यमंत्री फडणवीसांचा दादा भुसेंना झटका; शालेय शिक्षण विभागातील निर्णय थेट सनदी अधिकाऱ्यांकडे
4

Mahayuti Internal Politics: मुख्यमंत्री फडणवीसांचा दादा भुसेंना झटका; शालेय शिक्षण विभागातील निर्णय थेट सनदी अधिकाऱ्यांकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.