Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Kumbh Mela Fund Approved : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल इतक्या कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर; नगरविकास विभागाचा GR जारी

Nashik Kumbh Mela 2026: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला गती देण्यासाठी राज्य सरकारने कुंभमेळा प्राधिकरणाला आणखी 1,800 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. 2025-26 मध्ये यापूर्वी 3,098 कोटी रुपये वितरित करण्यात आले असून, निधीच्या वापरासाठी शासनाने विविध अटी घातल्या आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 11, 2026 | 01:34 PM
Nashik Kumbh Mela, Kumbh Mela Fund Sanction

Nashik Kumbh Mela, Kumbh Mela Fund Sanction

Follow Us
Follow Us:
  • नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १८०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर
  • नगरविकास विभागाने निधी वितरणाबाबत गुरुवारी जारी केला अधिकृत शासन निर्णय (GR)
  • विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर ३,००० कोटींच्या पुरवणी मागणीतून निधी सुपूर्द.
Nashik Kumbh Mela  : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू असून आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. कुंभमेळ्याशी संबंधित आवश्यक कामे अधिक वेगाने होण्यासाठी राज्य सरकारने कुंभमेळा प्राधिकरणाला 1,800 कोटींचा अतिरिक्त निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला.

पावसाळी अधिवेशनात 3 हजार कोटींची तरतूद

राज्य सरकारने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आवश्यक कामांसाठी 3 हजार कोटींची पुरवणी मागणीला मंजूरी दिली होती. त्यानंतर अवघ्या दिड महिन्यात कुंभमेळा प्राधिकरणाच्या विनंतीनुसार या तरतुदीपैकी 1,800 कोटी रुपये वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे.

Bihar Politics: NDA ची सत्ता जाणार? बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट; नितीश कुमारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा

यापूर्वी 2025-26 या आर्थिक वर्षात कुंभमेळा प्राधिकरणाला 3,098 कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता. गेल्या दोन वर्षांत उपलब्ध झालेल्या निधीमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध पायाभूत सुविधा आणि आवश्यक कामांना मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत 3,098 कोटींचे वितरण

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर विविध टप्प्यांसाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामध्ये 283 कोटी, 717 कोटी, 501.40 कोटी, 396.60 कोटी आणि 1,200 कोटी रुपये अशा टप्प्यां हा निधी वितरीत केला जाणार आहे. या सर्व निधीची एकत्रित रक्कम 3,098 कोटी रुपये आहे.

आता 2026-27 साठी मंजूर करण्यात आलेल्या 3 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी तरतुदीपैकी 1,800 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

निधी वापराबाबत कडक अटी

महत्त्वाची बाब म्हणजे, शासनाने मंजूर केलेला 1,800 कोटी रुपयांचा निधी फक्त सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामासाठीच वापरला जावा, अशी अट घालण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या कामासाठी मंजूर करण्यात आलेल्या उद्दिष्टांसाठीच वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..

वित्त विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना, आर्थिक अधिकार प्रदान करण्यासंदर्भातील नियम तसेच अन्य अटींचे पालन करूनच निधीचा वापर करावा लागणार आहे.

निधीच्या योग्य वापराची जबाबदारी कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि नाशिक विभागीय आयुक्तांकडे देण्यात आली आहे. संबंधित कामांना सक्षम प्राधिकरणांकडून प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित संस्थांना निधी वितरित करावा किंवा खर्च करावा, अशीही अट शासन निर्णयात नमूद करण्यात आली आहे.

खर्चानंतर विनियोग प्रमाणपत्र बंधनकारक

मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या खर्चाचे प्रमाणपत्र तातडीने शासनाला सादर करणेही  बंधनकारक करण्यात आले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी संबंधित अर्थसंकल्पीय शीर्षकाखाली उपलब्ध असलेल्या तरतुदीतून हा खर्च भागविण्यात येणार आहे.

निधीच्या या वितरणामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि इतर कामांच्या अंमलबजावणीला आता वेग येण्याची अपेक्षा आहे.

 

 

Web Title: Maharashtra government approves 1800 crore additional fund for nashik kumbh mela

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik Bus Stand: बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा
1

Nashik Bus Stand: बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ
2

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याने बदलणार नाशिकचा वाहतूक नकाशा; ६५.६ किमी रिंग रोडसह १,४३५ किमी रस्त्यांचा महाप्रकल्प
3

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याने बदलणार नाशिकचा वाहतूक नकाशा; ६५.६ किमी रिंग रोडसह १,४३५ किमी रस्त्यांचा महाप्रकल्प

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी
4

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.