Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ, तर शेतकरी भवन योजनेलाही…

Cabinet Meeting Decisions News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकी विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 16, 2025 | 05:19 PM
शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ, तर शेतकरी भवन योजनेलाही मुदतवाढ

शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ, तर शेतकरी भवन योजनेलाही मुदतवाढ

Follow Us
Close
Follow Us:

Cabinet Meeting Decisions News In Marathi : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक आज (१६ सप्टेंबर) पार पडली. याबैठकीत राज्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत आठ प्रमुख निर्णय घेण्यात आले. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील काही सदस्य उपस्थित होते..

दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी पॉलिसी २०२५ जाहीर करण्यात आलं. तसेच, वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध कामे आणि राज्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला.

Sindhudurg News : स्वच्छता विभाग कंत्राटदारांची ऐशीतैशी; “वेळेत पगार दिला नाही तर…” ; जिल्हाध्यक्षांचा प्रशासनाला इशारा

मंत्रिमंडळ बैठकित कोणते निर्णय झाले?

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ जाहीर, सन २०५० पर्यंतचे नियोजन, सुमारे ३ हजार २६८ कोटी रुपयांचा आराखडा (उद्योग विभाग)

उद्योग विभाग

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ जाहीर करण्यात आले आहे. याच निर्णयाअंतर्गत सन २०५० पर्यंतचे नियोजन करण्यात आले असून सुमारे ३ हजार २६८ कोटी रुपयांचा हा आराखडा असणार आहे.

वस्त्रोद्योग विभाग

अकोला येथील दि निळकंठ सहकारी सूतगिरणीला “खास बाब” म्हणून शासन अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थसहाय्याच्या ५:४५:५० या गुणोत्तरानुसार निवड करण्यात येणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्ता तसेच विद्यार्थींनीसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुपटीने वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाच हजारो विद्यार्थी- विद्यार्थिनींना फायदा होणार आहे.

सहकार व पणन विभाग

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेस पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यभरात ११६ बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी व अस्तित्वातील भवनांच्या दुरूस्तीसाठी असा एकूण १३२ कोटी ४८ लाखांचा खर्च केला जाणार आहे. विविध ठिकाणी ७९ नवीन शेतकरी भवन उभारण्याचे प्रस्तावित आहे.

सहकार व पणन विभाग

आधुनिक संत्रा केंद्र उभारण्याच्या योजनेस २ वर्षे मुदतवाढ देण्यात आली आहे. नागपूर, काटोल, कळमेश्वर, (जि.नागपूर), मोर्शी (जि.अमरावती ) व संग्रामपूर, (जि.बुलढाणा) येथे आधुनिक संत्रा केंद्र उभारण्यात येत आहेत. मुदतवाढीसह योजनेच्या स्वरुपात अनुषंगिक बदल करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग

भंडारा ते गडचिरोली दरम्यान ९४ किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे.. प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या आखणीस व भूसंपादनास मान्यता देण्यात आली. भुसंपादनासह अनुषंगिक ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता आजच्या बैठकीत देण्यात आली आहे.

ऊर्जा विभाग

नवीनकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी संयुक्त उद्यम कंपनी. महानिर्मिती व मे.सतलज जलविद्युत निगम लि. यांची संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. राज्यभरात ५ हजार मेगावॅट क्षमतचे प्रकल्प विकसित केले जाणार.

नियोजन विभाग

राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पायाभूत प्रकल्पांबाबत यापुढे उपसमिती यापुढे मंत्रिमंडळ समिती म्हणून कामकाज करतील.

राज्याला मुसळधार पावसाने झोडपले; मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र अतिमुसळधार पाऊस, आता पुढील 48 तास…

Web Title: Maharashtra government cabinet meeting decision 8 major decisions increase in hostel student allowance extension of shetkari bhavan scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Maharashtra Advocate General Resign : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात दिली माहिती
1

Maharashtra Advocate General Resign : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात दिली माहिती

राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात निवासी डॉक्टर आक्रमक; 18 सप्टेंबरला दिला संपाचा इशारा
2

राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात निवासी डॉक्टर आक्रमक; 18 सप्टेंबरला दिला संपाचा इशारा

Devendra Fadnavis: “पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी…”; CM फडणवीसांनी दिली मान्यता
3

Devendra Fadnavis: “पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी…”; CM फडणवीसांनी दिली मान्यता

Eknath Shinde : पुरामुळे अडकले 40 जण, एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
4

Eknath Shinde : पुरामुळे अडकले 40 जण, एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.