Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health: ‘औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची…’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी दिले ‘हे’ स्पष्ट निर्देश

Health: आरोग्य विभागाच्या सर्व आठ परिमंडळांमध्ये पुढील महिनाभर विशेष औषध गुणवत्ता तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नव्याने प्राप्त झालेल्या औषधांसह आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या औषधसाठ्यातील नमुने यादृच्छिक पद्धतीने तपासण्यात येतील.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 25, 2026 | 08:41 PM
Health Deaprtment

Health Deaprtment

Follow Us
Follow Us:
  • औषध गुणवत्ता तपासणीसाठी उपकरणांचा प्रभावी वापर करा- प्रकाश आबिटकर 
  • आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
  • औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड न करण्याचे निर्देश 
मुंबई/Health: राज्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देताना औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील आरोग्य संस्थांना पुरवठा होणाऱ्या औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’ या नावीन्यपूर्ण उपकरणाचा प्रभावी वापर करावा. तसेच औषध गुणवत्ता तपासणीसाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा (एसओपी) अवलंब करून नियमित तपासणी करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

आरोग्य भवन येथे औषधांच्या गुणवत्ता तपासणीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, शहरी आरोग्य सेवा आयुक्त डॉ. सुनील भोकरे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य संस्थांना पुरवठा होणाऱ्या औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी या उपकरणाच्या वापराबाबत तज्ज्ञांच्या उपस्थितीत मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यानंतर शासन निर्णयाद्वारे राज्यातील आठ परिमंडळांसाठी प्रत्येकी एक उपकरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ औषध निर्माण अधिकाऱ्यांचे उपकरण हाताळणीचे प्रशिक्षण महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे.

Pune News: बाल लसीकरणात पुणे आघाडीवर; आरोग्य विभागाची उल्लेखनीय कामगिरी

या पार्श्वभूमीवर प्रत्येक परिमंडळातील जिल्ह्यांसाठी औषध तपासणीचे वेळापत्रक निश्चित करून प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीची कार्यवाही, त्याचे अनुपालन, तपासण्यात आलेल्या औषधांची संख्या आणि तपासणीचा सविस्तर अहवाल दर आठवड्याला सादर करावा लागणार आहे.

महिनाभर विशेष तपासणी मोहीम

आरोग्य विभागाच्या सर्व आठ परिमंडळांमध्ये पुढील महिनाभर विशेष औषध गुणवत्ता तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नव्याने प्राप्त झालेल्या औषधांसह आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या औषधसाठ्यातील नमुने यादृच्छिक पद्धतीने तपासण्यात येतील. प्राथमिक तपासणी, नमुने पुढील तपासणीसाठी पाठविणे, पुष्टीकरण अहवाल प्राप्त झाल्यानंतरची कार्यवाही आणि त्याची नोंद ठेवणे यासाठी स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येणार आहेत.

सर्व आरोग्य संस्था राज्यस्तरीय रुग्णालय कक्षाच्या अधिनस्त असल्याने ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’च्या वापराबाबतचे सनियंत्रण सहसंचालक, रुग्णालय स्तरावरील कक्षामार्फत करतील. संबंधित प्राधिकरण, रुग्णालय यंत्रणा आणि खरेदी यंत्रणेने संयुक्त पथके तयार करून तपासणीची कार्यवाही अधिक प्रभावी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

Amravati Fire News: अमरावती रुग्णालय दुर्घटना: व्हेंटिलेटरपासून टेंडरपर्यंत सर्व बाबींची चौकशी; आबिटकरांची मोठी माहिती

प्रत्यक्ष नमुन्यांवर प्रशिक्षण

औषधनिहाय नमुना तपासणी, उपकरण हाताळणी, तपासणीच्या निकालांचे विश्लेषण आणि नोंद व्यवस्थापन याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. प्रत्येक विभागात प्रत्यक्ष नमुन्यांवर सराव केल्यास तपासणीतील अचूकता वाढण्यास मदत होईल, असे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले. औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या उपकरणांचा प्रभावी वापर करून क्षेत्रीय पातळीवर नियमित तपासणीची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार आहे. गुणवत्तापूर्ण औषधांचा पुरवठा आणि नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देत औषध गुणवत्ता तपासणीची प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबविण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Maharashtra health minister prakash abitkar orders to not to compromise on the quality of medicines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 08:41 PM

Topics:  

  • Government of Maharashtra
  • Health News
  • Maharashtra Health Department
  • Prakash Abitkar

संबंधित बातम्या

Amazon: नो स्पॅम कॉल्स, नो एजंट! अमेझॉन पेवर आता स्वतःच निवडा अन् खरेदी करा हेल्थ इन्शुरन्स
1

Amazon: नो स्पॅम कॉल्स, नो एजंट! अमेझॉन पेवर आता स्वतःच निवडा अन् खरेदी करा हेल्थ इन्शुरन्स

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
2

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
3

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

Migraine: मायग्रेनच्या त्रासाने हैराण? ‘या’ सवयी ठरतील फायदेशीर, डोकेदुखीपासून मिळेल आराम
4

Migraine: मायग्रेनच्या त्रासाने हैराण? ‘या’ सवयी ठरतील फायदेशीर, डोकेदुखीपासून मिळेल आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.