
Maharashtra Local Body Election Result 2025 Live Updates
21 Dec 2025 11:57 AM (IST)
जव्हार नगरपरिषदेवर 20 पैकी 14 जागांवर भाजपाचा विजय
राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार) 3 जागांवर विजय
शिवसेनेचे (शिंदे) दोन उमेदवार विजयी
शरद पवार गट एका जागेवर विजयी
जव्हारच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या पूजा उदावंत विजयी
डहाणू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे राजू माच्छी विजयी
21 Dec 2025 11:56 AM (IST)
21 Dec 2025 11:56 AM (IST)
5 अपक्ष उमेदवार विजयी, माळेगाव नगरपंचायतीतील अपक्ष निवडून आलेले उमेदवार
प्रभाग 1
दिपाली अनिकेत बोबडे - अपक्ष
प्रभाग 3
रेश्मा सय्यद - महिला अपक्ष
प्रभाग 6
वैभव खंडाळे - अपक्ष
प्रभाग 7
पप्पू खरात - अपक्ष
प्रभाग 9
गायत्री राहुल तावरे आणि जयश्री बाळासाहेब तावरे या दोन्ही उमेदवारांना 616 मत अशी समान पडल्याने ईश्वर चिट्ठी काढण्यात आली यामध्ये अपक्ष उमेदवार जयश्री बाळासाहेब तावरे या विजयी झाल्या आहेत
21 Dec 2025 11:54 AM (IST)
सांगली - तासगाव नगरपरिषदेच रोहीत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. इथं स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजया बाबासाहेब पाटील 412 मताने विजयी झाल्या आहेत. आर. आर. पाटील यांचा हा पारंपारीक मतदार संघ आहे. या ठिकाणी त्यांचा मुलगा रोहीत पाटील सध्या इथं आमदार आहे. मात्र यावेळी त्यांना त्यांची नगर परिषद राखण्यात अपयश आलं आहे. इथं त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे.
21 Dec 2025 11:52 AM (IST)
फुलंब्रीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. आमदार अनुराधाताई चव्हाण, मंत्री अतुल सावे यांना धक्का देत ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. खुलताबादमध्ये काँग्रेसने खाते उघडले आहे.
21 Dec 2025 11:45 AM (IST)
संगमनेर येथे आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानाबाहेर समर्थक तसेच निवडून आलेल्या विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. संगमनेर सेवा समितीच्या निवडणुकीत तांबे–थोरात गटाचे बहुसंख्य उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. मैथिली तांबे या आघाडीवर असल्याची माहिती आहे. निकालानंतर तांबे यांच्या निवासस्थानाबाहेर विजयी उमेदवारांवर गुलालाची उधळपट्टी करण्यात आली. यावेळी समर्थकांकडून आमदार सत्यजित तांबे यांच्या नावाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आनंदोत्सवात माजी आमदार सुधीर तांबे हेही सहभागी झाले होते.
21 Dec 2025 11:34 AM (IST)
नगरपालिकेचे निकाल पुढे येत असून उरणमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत.
21 Dec 2025 11:29 AM (IST)
भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आनंदी जगताप झाल्या विजयी, आनंदी जगताप माजी आमदार संजय जगताप यांच्या मातोश्री, संजय जगताप यांनी नुकताच केला होता भाजपमध्ये प्रवेश
21 Dec 2025 11:28 AM (IST)
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे 17 उमेदवार विजयी, भाजपा गटाचे दोन उमेदवार विजयी, तानाजी खोमणे अपक्ष उमेदवार विजयी.
21 Dec 2025 11:22 AM (IST)
माजी मंत्री दिपक केसरकर यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. वेंगुर्ले शहरातील आठ पैकी तब्बल सात जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे, तर उर्वरित एका जागेवर शिंदे गटाच्या शिवसेनेने विजय संपादन केला. या निकालामुळे वेंगुर्लीतील राजकीय समीकरणे बदलली असून, केसरकर गटासाठी हा पराभव धक्कादायक मानला जात आहे. भाजपच्या या यशामुळे स्थानिक पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
21 Dec 2025 11:17 AM (IST)
भाजपच्या रुचिता घोरपडे १५४६ मतांनी आघाडीवर
भाजपच्या रुचिता घोरपडे यांना ६९५१ मत तर शिवसेनेच्या विना वामन म्हात्रे यांना ५४०५ मत
21 Dec 2025 11:16 AM (IST)
अक्कलकोट मध्ये मिलन कल्याणशेट्टी 3200 मतांनी आघाडीवर आहेत. पंढरपूरमध्ये प्रणिता भालके आघाडीवर आहेत. बार्शी मध्ये भाजपच्या कथले आघाडीवर आहेत तर मोहोळ मध्ये शिवसेनेच्या वस्त्रे आघाडीवर आहेत हा पहिला फेरीचा निकाल आहे दुधनी मध्ये इतिहास घडण्याची शक्यता आहे भाजपच्या बाजार मठ या सुमारे 2000 मतांनी आघाडीवर आहेत येथे पहिल्यांदाच पक्षाचा नगराध्यक्ष निवडून येण्याची शक्यता आहे
21 Dec 2025 11:16 AM (IST)
रत्नागिरी शिवसेना शिल्पा सुर्वे विजयी नगराध्यक्षा यांचा विजय झाला आहे.
21 Dec 2025 11:07 AM (IST)
गंगाखेडमध्ये उर्मिला केंद्रे आघाडीवर आहेत. उर्मिला केंद्रे या धनंजय मुंडे यांच्या भगिनी असून धनंजय मुंडे स्वत: बहिणीसाठी मैदानात दाखल झाले होते. गंगाखेडमध्ये प्रचार करताना धनंजय मुंडे दिसले होते.
21 Dec 2025 11:05 AM (IST)
औसामध्ये भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 17 उमेदवार विजयी झाले आहे.
21 Dec 2025 11:01 AM (IST)
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार शिरकाव करत राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. भाजपचे उमेदवार ॲड. अंकित बंगेरा यांनी शेकाप–काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभय म्हामुणकर यांचा पराभव करत भाजपाचा अलिबाग नगरपरिषदेत प्रवेश निश्चित केला. या निकालामुळे शेकापला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) यांनीही दोन जागांवर विजय मिळवत आपले अस्तित्व कायम राखले आहे. ठाकरे गटाचे उमेदवार संदीप पालकर आणि श्वेता पालकर यांनी शेकापचे उमेदवार महेश शिंदे आणि रेश्मा घरत यांचा पराभव केला. या विजयामुळे ठाकरे गटाने शेकापच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, नगराध्यक्ष पदाच्या लढतीत शेकापने बाजी मारली आहे. शेकापच्या अक्षया नाईक यांनी भाजपच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांचा पराभव करत नगराध्यक्ष पद पटकावले.
21 Dec 2025 11:00 AM (IST)
बदलापूर नगर अध्यक्ष पदाच्या पहिल्या फेरीत भाजप आघाडीवर
भाजपच्या रुचिता घोरपडे 1700 मतांनी आघाडीवर
भाजपच्या रुचिता घोरपडे यांना 6878 मत तर शिवसेनेच्या विना वामन म्हात्रे यांना 5087 मत
21 Dec 2025 11:00 AM (IST)
देवरूख नगर पंचायत निवडणूकत युती आघाडीवर
जाहीर निकाल ९पैकी ७ युती.
प्रभाग ९भाजपा बंडखोर विजयी
प्रभाग ८अपक्ष विजयी
प्रभाग
१ वेलणकर भाजपा
२ यशंवत गोपाळ राष्ट्रवादी
३ गेल्ये शिवसेना
४ वैभव पवार शिवसेना
५ स्वाती राजवाडे भाजपा.
६ प्राची भुवड राष्ट्रवादी.
७ श्रद्धा इंदुलकर भाजपा.
८ सिद्धेश वेल्हाळ अपक्ष
९ सौ. नार्वेकर अपक्ष
21 Dec 2025 10:53 AM (IST)
राहाता नगरपालीकेवर एकहाती सत्ता…
20 पैकी भाजप सेनेचे 19 नगरसेवक विजयी…
नगराध्यक्षपदी _ भाजपचे स्वाधीन गाडेकर बहुमताने विजयी..
21 Dec 2025 10:51 AM (IST)
पहिल्या फेरीतील पक्षनिहाय कल
पहिल्या फेरीत शिवसेना उबाठा 1, मनसे 1, शिवसेना 1 आणि भाजप 3 (1 बिनविरोध)
त्याचप्रमाणे नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार निता मालप या आघाडीवर आहेत
चिपळूण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ कल
नगराध्यक्ष मतदान आकडेवारी
उमेश सकपाळ ५६० मतांनी आघाडी घेतली आहे.
21 Dec 2025 10:50 AM (IST)
पहिल्या फेरीत शिवसेना उबाठा 1, मनसे 1, शिवसेना 1 आणि भाजप 3 (1 बिनविरोध)
त्याचप्रमाणे नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार निता मालप या आघाडीवर आहेत
21 Dec 2025 10:49 AM (IST)
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणूक निकालापूर्वीच भाजप नगराध्यक्ष पदाची उमेदवार मिलन कल्याणशेट्टी यांच्या अभिनंदनाचे बोर्ड कार्यकर्त्यांनी झळकवले असून फटाक्यांची आतषबाजी सुरू केले आहे अक्कलकोट नगर परिषदेसाठी भारतीय जनता पार्टी कडून विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे चुलत बंधू मिलन कल्याणशेट्टी हे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत त्यांची मतमोजणी अजून पूर्ण झालेली नाही तोपर्यंत अक्कलकोट शहरात त्यांच्या अभिनंदन त्यांचे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी सुरू केली आहे
निकालापूर्वीच भाजप नेत्याचे होर्डिंग झळकले
21 Dec 2025 10:47 AM (IST)
सासवड नगरपालिका
24 सदस्य संख्या आणि 1 नगराध्यक्ष आहे
22 उमेदवारांसाठी मतमोजणी आहेत.
2 बिनविरोध झाले आहेत.
भाजपच्या नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार जगताप या आघाडीवर
भोरमध्ये भाजपची आघाडी, उमेदवारांकडून गुलाल उधळणीला सुरुवात
इंदापूर मध्ये सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार असलेले प्रदीप कंद पिछाडी वर
अजित पवारांच्या पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा आघाडीवर
21 Dec 2025 10:45 AM (IST)
गुहागरमध्ये मनसेने खातं उघडल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेच्या कोमल जांगळी नगरसेवकपदी...
21 Dec 2025 10:39 AM (IST)
भगूरमध्ये अजित पवार गटाचे सर्वच सात उमेदवार आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे. ही आघाडी सुरूवातीला येणाऱ्या कलानुसार आहे.
21 Dec 2025 10:33 AM (IST)
महाराष्ट्रातील लातूरमधील एका नगरपंचायत आणि चार नगरपरिषदांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत, ज्यामध्ये ३२ अध्यक्ष आणि १२८ नगरसेवक जागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या ५४५ उमेदवारांचे राजकीय भविष्य निश्चित होणार आहे.
21 Dec 2025 10:30 AM (IST)
पहिल्या फेरीत युतीचे उमेदवार उमेश सकपाळ 35 मतांनी आघाडीवर आहेत.
21 Dec 2025 10:28 AM (IST)
कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड नगरपालिकेचा पहिला निकाल हाती आला आहे. मुरगूड मध्ये मुश्रीफ गटाला धक्का बसला आहे. पहिल्या फेरीत माजी खासदार संजय मंडलिक यांच्या शिवसेना भाजपचे ४ चार उमेदवार आघाडीवर आहेत.
21 Dec 2025 09:53 AM (IST)
बुलढाणा जिल्ह्यात 11 नगरपरिषद साठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणी ला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे, नगराध्यक्षांसाठी 87 उमेदवार रिंगणात तर 286 नगरसेवकांसाठी 1181 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात सात ठिकाणी तिरंगी, दोन ठिकाणी चौरंगी, तर दोन ठिकाणी दुहेरी लढत पाहायला मिळत आहे.. या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
21 Dec 2025 09:47 AM (IST)
येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार असून यावेळी नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र लोणारी व शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार रुपेश दराडे यांच्यामध्ये सरळ लढत बघायला मिळाली होती. यावेळी 13 प्रभागांसाठी 13 टेबलची व्यवस्था मतमोजणी करता करण्यात आली असून सकाळपासूनच पोलिसांचा कडीकोट बंदोबस्त या मतमोजणी केंद्र बाहेर बघायला मिळत आहे
21 Dec 2025 09:43 AM (IST)
सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी नऊ वाजून गेले तरी अद्याप स्ट्रॉंग रूम उघडली नाही. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा माने, मारुती बनकर आणि विश्वेश झपके या तिन्ही उमेदवारांनी एकत्रित येऊन आयोगाच्या विरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. वेळेत स्ट्रॉंग उघडली गेली नाही त्यामुळे उमेदवार नाराज असून मतमोजणी पूर्वीच सांगोल्यात आता उमेदवार आणि प्रशासकीय यंत्रणेतील कलगीतुरा पाहायला मिळत आहे.
21 Dec 2025 09:25 AM (IST)
अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी काहीच वेळात सुरू होणार आहे. यातील संगमनेर, कोपरगाव आणि शिर्डी नगरपरिषद निकालाकडे सर्वांच लक्ष लागले आहे. तर कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीकडे संवेदनशील म्हणून पाहिली जात आहे.
21 Dec 2025 09:15 AM (IST)
धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच एक नंबर राहील असा दावा आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. भाजप एक नंबरचा पक्ष होणार असेल तर भाजपाचे किती, आणि इतर पक्षातील फोडाफोडी करून आणलेली किती उमेदवार विजयी होणार हे ही पाहावे लागले असं म्हणत त्यांनी भाजपला चिमटा काढला आहे.
21 Dec 2025 09:07 AM (IST)
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत असलेल्या अनगरला यंदाच्या वर्षी नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. एकूण १७ सदस्यसंख्या असलेल्या या नगरपंचायतीवर अखेर भाजपचा झेंडा फडकला आहे. कारण, आता या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्राजक्ता पाटील या मोहोळ माजी आमदार राजन पाटील यांच्या स्नुषा आहेत.
21 Dec 2025 08:50 AM (IST)
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर आता सर्वांना लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये केवळ महायुतीच नव्हे, तर महाविकास आघाडीतील पक्षही ठिकठिकाणी एकमेकांविरुद्ध रिंगणात होते. त्यामुळे आजच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे.
21 Dec 2025 08:40 AM (IST)
मालवणमध्ये भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोट असल्याचा आरोप करत कोर्टात धाव घेतली. त्यामुळे शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांची मालवणमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सोबत याआधी उबाठाचा नगराध्यक्ष होता, त्यामुळे ही जागा उबाठाची असल्यानं याठिकाणी माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
21 Dec 2025 08:30 AM (IST)
रायगडमधील महाड आणि रोहा नगरपालिकेत मतदानाच्या दिवशी जोरदार राडा झाला होता. महाडमधील प्रभाग क्रमांक 2 मध्ये बंद पडलेल्या ईव्हीएम मशिनमुळे या परिसरात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपापसात आमने-सामने आल्याने हा प्रकार घडला आणि या भानगडीत सुशांत जाबरे यांच्या कडून विकास गोगावले यांना पिस्तुल दाखवण्यात आली.
21 Dec 2025 08:20 AM (IST)
बीड जिल्ह्यातील परळीमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. नगर परिषदेच्या मुख्य इमारतीत मतमोजणी होत असल्याने आज वैद्यनाथ मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग बंद असणार आहे. काही दिवसांपूर्वी स्ट्रॉंग रूम बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या राड्यानंतर आज मतमोजणीसाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोड वर आहे.
21 Dec 2025 08:10 AM (IST)
मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. काँग्रेसने मुंबई निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी शनिवारी ही घोषणा केली. मुंबई काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीनंतर चेन्नीथला म्हणाले, ‘आम्ही महाविकास आघाडीसोबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या. पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते की, नागरी निवडणुका स्वतंत्रपणे लढाव्यात. त्यामुळे काँग्रेस बीएमसी निवडणुका स्वबळावर लढणार आहे’.
21 Dec 2025 07:55 AM (IST)
राज्यात झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल हाती यायला काही तास शिल्लक राहिले आहेत. अशात आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील यायला सुरुवात झाली आहे. भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरणार असून, आम्ही केलेल्या विकास कामाची ही पोचपावती असणार असल्याचं मंत्री अतुल सावे म्हणाले आहे.
21 Dec 2025 07:47 AM (IST)
राज्यात दोन टप्प्यात झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा आज निकाल हाती येणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आजच्या निकालात भाजप एक नंबरचा आणि शिंदेंची शिवसेना दोन नंबरचा पक्ष ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
21 Dec 2025 07:34 AM (IST)
पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार या तीन नगरपरिषद आणि वाडा नगर पंचायतीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष मत मोजणाला सुरवात होणार आहे. पालघरमध्ये चारही ठिकाणच्या मिळून नगरसेवक पदासाठी 318, तर नगराध्यक्षपदासाठी 17 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भविष्य आज ठरणार आहे. पालघरमधील मतमोजणी केंद्रावर मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
21 Dec 2025 07:26 AM (IST)
तीन मराठी वृत्तवाहिन्यांनी नगरपरिषद निवडणुकीचा एक्झिट पोल दिला असून, त्यात भाजप हा निर्विवादपणे क्रमांक एकचा पक्ष राहील असे म्हटले आहे. दोन वृत्तवाहिन्यांनी दुसऱ्या क्रमांकावर शिंदेसेना, तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असेल. त्यानंतर अजित पवार गटाला यश मिळेल, असा अंदाज वर्तविला आहे. अन्य एका वृत्तवाहिनीने भाजपकडे १४७ नगरपरिषदांची अध्यक्षपदे जातील, असे म्हटले असून, शिंदेसेना क्रमांक २ वर, अजित पवार गट क्रमांक ३ वर, तर काँग्रेस क्रमांक ४ वर राहील, असे म्हटले आहे. एक्झिट पोलचे हे अंदाज कितपत खरे ठरतात याची उत्सुकता असेल.
21 Dec 2025 07:15 AM (IST)
अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथील श्रीनाथ शाळेतील मतदान केंद्रावरील मतपेटी हलवताना वाद झाला आहे. मतपेट्या सिलिंगच्या वेळी आमच्या पक्षाचा उमेदवार का नाही यातून हा वाद झाला आहे.तसेच मतपेट्या क्रुझर वाहनातूनच का नेण्यात येत आहेत असाही मुद्दा उपस्थित केल्याची माहिती आहे.
21 Dec 2025 07:10 AM (IST)
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर आता सर्वांना वेध लागलेत मतमोजणीचे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये केवळ महायुतीच नव्हे, तर महाविकास आघाडीतील पक्षही ठिकठिकाणी एकमेकांविरुद्ध रिंगणात होते. त्यामुळे आजच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. राज्यातील लहान शहरांचा कौल कोणाला? याचा फैसला आज होणार आहे.
21 Dec 2025 06:59 AM (IST)
राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. यातच दुबार मतदारावरून निवडणूक आयोगावर विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे. अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी आणि मनसेने मुंबईत मोर्चा देखील काढला होता. मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यप्रकार याबाबत आवाज उठवला होता.
21 Dec 2025 06:56 AM (IST)
सातारा जिल्ह्यात ४९.१४ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये ५५.३७ टक्के, गडचिरोली जिल्ह्यात ५४.८१ टक्के, त्र्यंबकेश्वरमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं, तर पुणे जिल्ह्यात ५१.०६ टक्के मतदान झालं. पुण्यातील जुन्नर ४७ टक्के, तळेगाव दाभाडे ३६ टक्के राजगुरूनगर ५३.४४ टक्के लोणावळा ५५ टक्के, चाकण ५७.६४, आळंदी ५९.३३ टक्के मतदान झालं आहे. तसेच वर्धा जिल्ह्यात दुपारी ४४ टक्के मतदान झालं. यामध्ये हिंगणघाट ४५.६७ टक्के, वर्धा ४३.६३ टक्के, सिंदी रेल्वे ५१ टक्के, आर्वी ४५ टक्के, पुलगाव 38.19 टक्के मतदान झालं आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यामधील चार नगरपालिकेत ४६ टक्के मतदान झालं आहे.
21 Dec 2025 06:54 AM (IST)
२ डिसेंबर २०२५ ला मतदानाची प्रक्रिया पार पडली. तर २१ डिसेंबर ही निकालाची तारीख ठरवण्यात आली. त्यानुसार आज म्हणजेच २१ डिसेंबर २०२५ ला कोणत्या पक्षाचा उमेदवार जिंकला आणि कुणाचा पराभव होणार, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Nagarparishad & Nagarpanchayat Election Result 2025 LIVE Updates : महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांमधील २४६ नगरपरिषद (Nagarparishad Election Result) जागांसाठी यंदा निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ ला मतदानाची प्रक्रिया पार पडली. तर २१ डिसेंबर ही निकालाची तारीख ठरवण्यात आली. त्यानुसार आज म्हणजेच २१ डिसेंबर २०२५ ला कोणत्या पक्षाचा उमेदवार जिंकला आणि कुणाचा पराभव होणार, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.