Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati : मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नका, नाहीतर…; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाकरिता बारामती तालुक्यात ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाईल वापरण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 06, 2026 | 01:20 PM
मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नका, नाहीतर...; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन

मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नका, नाहीतर...; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन

Follow Us
Follow Us:
  • मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नका
  • निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन
  • प्रशासनास सहकार्य करण्याचेही आवाहन
बारामती : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाकरिता बारामती तालुक्यात ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाईल वापरण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ चे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.

 

पक्ष आणि उमेदवारांनी मतदान केंद्रापासून २०० मीटर लांब तात्पुरत्या कार्यस्थानी (उमेदवार, पक्षामार्फत चिठ्ठी वाटपाकरिता लावण्यात येणारे टेबल) विनाकारण गर्दी होणार नाही तसेच त्याठिकाणी कोणतेही भित्तीपत्रक, ध्वज, चिन्हे किंवा इतर प्रचार साहित्य लावू नये तसेच कोणत्याही खाद्यपदार्थाचे वाटप केले जाणार नाहीं किंवा गर्दी होईल अशी कोणतीही कृती केली जाणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामध्ये निवडणूक चिन्ह, पक्ष, उमेदवाराचे नाव असलेले कोणतेही प्रचार साहित्य यामध्ये चिन्ह छपाई केलेले टी शर्ट, टोप्या, उपरणे तसेच छापील चिठ्ठया आदी आणता येणार नाही.

उमेदवार, उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी यांना मतदानाच्या निरिक्षणासाठी मतदान केंद्राच्या आत ३ मतदाराचे मतदान होईपर्यंतच थांबता येईल, त्यानंतर उमेदवाराने मतदान केंद्राच्या बाहेर पडावे. उमेदवार, उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधीस एका मतदान केंद्रामध्ये संपूर्ण मतदानाच्या कालावधीत जास्तीत जास्त तीन वेळा जाता येईल.

मतदानाच्या दिवशी वाहनाच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाचे पालन करुन सर्व पक्षांचे उमेदवार व कार्यकत्यांनी सहकार्य करावे. वाहन परवाना वाहनांच्या दर्शनी भागांवर ठळकपणे लावावे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक उमेदवारास स्वतःच्या किंवा निवडणूक प्रतिनिधीच्या वापरासाठी दोन वाहने वापरण्याचा अधिकार असेल. ही वाहने त्यांच्या मतदारसंघातच वापरता येतील. कोणत्याही उमेदवारास अथवा पक्षाला मतदारांना ने-आण करण्यासाठी कुठल्याही वाहनाचा वापर करता येणार नाही.

तथापि खाजगी वाहनांच्या मालकांना त्यांच्या स्वतःच्या खाजगी वापरासाठी वापरण्यात येणारी खाजगी वाहने, खाजगी वाहनांच्या मालकांना त्यांच्या स्वतःसाठी किंवा त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीसाठी मतदानाचा हक्क बजावता येण्याकरिता मतदान केंद्रावर जाण्यासाठी असलेले वाहने, रुग्णालयातील वाहने, रुग्णवाहिका, दूधगाड्या, पाण्याचे टँकर्स,, तातडीच्या वीज पुरवठ्याची वाहने, पोलिसांची वाहने, निवडणुकीच्या कामकाजसंबंधी असलेल्या अधिकाऱ्यांची वाहने यासारख्या अत्यावश्यक सेवां वापरण्यात येणारी वाहने वापरण्यास परवानगी आहे, अशी माहिती नावडकर यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा : कामाचा माणूस ते भावनिक प्रचार…; जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराचा रोख बदलला

Web Title: Election officials have appealed not to carry mobile phones to the polling station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Election News
  • maharashtra
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
1

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण
2

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण

Sugar Prices Hike: साखरेच्या दराने गाठला नवा उच्चांक! सणासुदीत गोडवा महागणार?
3

Sugar Prices Hike: साखरेच्या दराने गाठला नवा उच्चांक! सणासुदीत गोडवा महागणार?

कचरागाड्यांचा त्रास आटोक्यात आणा! उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश; कांजूर कचराभूमीबाबत सुनावणी
4

कचरागाड्यांचा त्रास आटोक्यात आणा! उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश; कांजूर कचराभूमीबाबत सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.