Maharashtra Cabinet Expansion: 'हा' कट्टर शिवसैनिक कॅबिनेट मंत्री होणार? शिंदेंच्या मनातील 12 मंत्र्यांची यादी बघाच..
Shivsena Ministers List: राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र अजूनही खातेवाटप झालेले नाही. खातेवाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीत आहेत. खातेवाटपावर भाजपच्या शीर्ष नेतृत्वाशी चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. यावलेस शिवसेनेच्या कोट्यातून कोण मंत्री होणार याची उत्सुकता आहे.
महायुतीच्या या नवीन सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला एकूण 12 मंत्रीपदे येण्याची शक्यता आहे. त्यातील 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदे मिळू शकतात. यावेळेस शिवसेनेकडून नवीन चेहऱ्याना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. गेले अडीच वर्षे मंत्रीपद मिळण्याच्या चर्चेत असणाऱ्या आमदार भरत गोगवले आणि संजय शिरसाट यांना देखील मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. गेल्या सरकारमध्ये शेवटपर्यंत यांना मंत्री होण्याची संधी मिळाली नव्हती.
मात्र या सरकारमध्ये त्यांना संधी मिळू शकते. मागच्या सरकारमध्ये त्यांना महामंडळाचे अध्यक्षपद देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र या सरकारच्या मंत्री मंडळात या दोन नेत्याना एकनाथ शिंदे यांनी संधी दिल्याचे समजते आहे. तसेच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यान देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र यांच्या वाट्याला कोणती खाती येतील हे पहावे लागणार आहे.
शिवसेनेच्या 12 संभाव्य मंत्र्यांची यादी
एकनाथ शिंदे
उदय सामंत
शंभुराज देसाई
दादा भुसे
प्रताप सरनाईक
संजय शिरसाट
गुलबरव पाटील
भरत गोगावले
राज्यमंत्री
योगेश कदम
विजय शिवतारे
प्रकाश आबिटकर
राजेंद्र यडरावकर
हेही वाचा: Devendra Fadnavis: महाराष्ट्राचा गृहमंत्री कोण होणार? मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे भाष्य; म्हणाले…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खातेवाटपावर प्रश्न विचारले असता ते म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख अजून ठरायची आहे. 14 तारीख ही तुम्ही ठरवली आहे. आमची अजून ठरायची आहे.” परभणीमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “परभणीत जे काही घडले ते चुकीचे आहे, संविधानानाबाबत त्या माथेफिरूने जे काही केले त्याचा निषेध केला पाहिजे. त्याला अटक झाली. अटक झाल्यावर अशा प्रकरची हिंसा होणे योग्य नाही.”
महाराष्ट्राचे गृहमंत्री तुम्ही होणार का असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावेस देवेंद्र फडणवीस म्हणाले, “यावर तुम्ही थोडी वाट बघा.” लवकरच राज्याचे मंत्रिमंडळ वाटप होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. हा शपथविधी सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला. पण, यामध्ये फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला होता. असे असताना आता नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.