महायुती सरकारचे खातेवाटप लवकरच होण्याची शक्यता (फोटो- ट्विटर)
Maharashtra Home Minister: राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र अजूनही खातेवाटप झालेले नाही. खातेवाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीत आहेत. खातेवाटपावर भाजपच्या शीर्ष नेतृत्वाशी चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. यावेळेस राज्याचा गृहमंत्री कोण होणार यावर मुख्यमंत्री फडणवीस बोलले आहेत. ते नेमके काय बोलले आहेत, ते जाणून घेऊयात.
दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावलेस फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यांचे प्रमुख नेते आहे. आमच्यासाठी ते पक्षाचे पितृतुल्य नेतृत्व आहे. आमचे सर्वांचे जवळचे नाते पंतप्रधान मोदी यांच्याशी आहे. त्यांची भेट घेणे आनंदाची बाब आहे. मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली. कारण पंतप्रधान मोदींच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप श्रद्धा आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतात. म्हणून मी त्यांना मूर्ती भेट दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खातेवाटपावर प्रश्न विचारले असता ते म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख अजून ठरायची आहे. 14 तारीख ही तुम्ही ठरवली आहे. आमची अजून ठरायची आहे.” परभणीमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “परभणीत जे काही घडले ते चुकीचे आहे, संविधानानाबाबत त्या माथेफिरूने जे काही केले त्याचा निषेध केला पाहिजे. त्याला अटक झाली. अटक झाल्यावर अशा प्रकरची हिंसा होणे योग्य नाही.”
महाराष्ट्राचे गृहमंत्री तुम्ही होणार का असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावेस देवेंद्र फडणवीस म्हणाले, “यावर तुम्ही थोडी वाट बघा.” लवकरच राज्याचे मंत्रिमंडळ वाटप होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: राज्य मंत्रिमंडळ विस्तारासह खातेवाटपाचंही अखेर ठरलं ! ‘या’ दिवशी होणार विस्तार?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. हा शपथविधी सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला. पण, यामध्ये फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला होता. असे असताना आता नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1867095660014485706
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (दि.16) नागपुरात सुरू होणार आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील नव्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना गृहमंत्रालयाची मागणी सोडायला तयार नाही. तर भाजप त्यांना गृहमंत्रालयाऐवजी नगरविकास खाते देण्यास तयार आहे. असे असताना आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.