आता लाडक्या बहिणींना मिळणार 'डबल गिफ्ट'; हिवाळी अधिवेशनात 1400 कोटींची तरतूद
नागपूर: विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान आजपासून नागपूरमध्ये सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्याआधी काल राजभवनात महायुतीच्या 39 आमदारांचा शपथविधी पार पडला. दरम्यान महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. यंदाच्या निवडणुकीत या योजनेचा महायुतीला फायदा झाल्याचे म्हटले जात होते. प्रचारात लाडक्या बहिणीस 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. आज हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने लाडक्या बहीणींबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तब्बल 35 हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मंजूर केल्या. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी देखील निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणीला पुढील हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुती सरकारच्या मागच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे राज्यात महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले असे म्हटले जात आहे. सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
2100 रुपये कधी जमा होणार?
लाडकी बहीण योनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना डॉ महिन्यास 1,500 रुपये दिले जातात. जवळपास अडीच कोटी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा केले जातात. आतापर्यंत पाच महिन्यांचे पैसे सरकारने दिले आहेत. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणीना 2100 रुपये देण्याबद्दल महायुतीने भाष्य केले होते. त्यामुळे आता लाडक्या बहीणींच्या खात्यात 2100 रुपये कोणत्या महिन्यापासून जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लाडकी बहीण योजनेतील पुण्यातील 10 हजार महिलांचे अर्ज बाद
विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना रद्द होणार, अशा चर्चा निवडणुकीपूर्वी सुरू होत्या. त्यामुळे राज्यभरातील महिलावर्गात एकच खळबळ माजली होती. पण योजना बंद होणार नाही. असे त्यावेळचे उपमुख्यमंत्री आणि विद्यमान देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सांगितलं होते. पण निवडणुकीनंतर राज्यात आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी सुरू झाली असून त्यात आतापर्यंत 1 हजार महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. निकषात न बसणारे अर्ज बाद करण्यात आले आल्याची माहिती आहे.
हेही वाचा: Majhi Ladki bahin Yojna: माझी लाडकी बहीण योजनेतील पुण्यातील 10 हजार महिलांचे अर्ज बाद
महायुती सरकारने पाच महिन्यांपूर्वी अंतरिम अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली आणि जुलैपासून योजनेचे पैसे मिळणेही सुरू झाले. नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 7500 रुपये जमा झाले. आता निवडणुकीनंतर जिल्हा प्रशासनाने प्रलंबित अर्जांची छाननी सुरू केली आहे. यात आतापर्यंत 9814 अर्ज निकषात न बसल्यामुळे अपात्र ठरल्याची माहिती आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 20 लाख 84 हजार 364 महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर एकूण अर्जदारांपैकी 69 हजार, 175 अर्जदारांची आधार कार्ड बँक खात्याशी जोडले गेले आहे की नाही, याची तपासणी बाकी आहे.