
Raj Thackeray,Nashik rally, municipal elections
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नाशिकमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये प्रचार सभा पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या ठाकरे शैलीत राज्य सरकारचा चांगलाच समाचार घेतला.
Oil Sale : ट्रम्प यांची मोठी घोषणा! व्हेनेझुएलाचे 5 कोटी बॅरल तेल विक्रीला, भारताला खरेदीची संधी?
लाडकी बहीण योजनेच्या पैशांना भुलून महायुतीला मतदान करत असाल तर तुमच्या पुड्या पिढ्या तुम्हालाच दोष देतील आमच्या भवितव्याचा विचार कोणाची केला नाही. आमचं शहर तसचं राहिलं त्याचा विकास झाला नाही. आमचा बाप विकला गेला, आईने पैसे घेतले. त्यामुळे आमचं भविष्य चांगलं घडलं नाही, असं तुमचीच मुलं म्हणतील. पण जर तुम्हाला असे नको असेल तर मनसे-शिवसैनिकांच्या नगरसेवकांना निवडून द्या, असे आवाहन राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यावेळी केलं.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार-पाच वर्षे पुढे का ढकलल्या गेल्या, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताधारी महायुतीला कोंडींत पकडण्याचा प्रयत्न केला. १९५२ साली जन्माला आलेल्या पक्षाला २०२६ मध्येदेखील दुसऱ्याची पोरे दत्तक का घ्यावी लागत आहेत, असा प्रश्न विचारत त्यांनी भाजपची खिल्लीही उडवली.
नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीवरही त्यांनी संताप व्यक्त केला. ” पूर्वीचा लाकूडतोड्या तरी बरा होता. त्याला देवीने विचारले सोन्याची, चांदीची कुऱ्हाड होती का? त्यालाही तो भाळला नाही. असा टोला त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना लगावला. “यांनी तपोवनातील झाडे छाटायच्या आधीही इतर पक्षांतील लोक, कार्यकर्ते छाटले आणि ते करून भागलं नाही म्हणून आता ते पुन्हा बाहेरुन लोक आणत आहेत. निवडणुकाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या सांगण्याला नाशिककर भुलले आणि आम्ही सत्तेत असताना जी कामे केली ती विसरले. पण दत्तक चं आश्वासन देणारे फडणवीस मात्र पुन्हा नाशिककडे फिरकलेच नाहीत, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.