'राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थींवर अन्याय होणार नाही'; आदिती तटकरेंचे आश्वासन (Photo Credit- Social Media)
विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना रद्द होणार, अशा चर्चा निवडणुकीपूर्वी सुरू होत्या. त्यामुळे राज्यभरातील महिलावर्गात एकच खळबळ माजली होती. पण योजना बंद होणार नाही. असे त्यावेळचे उपमुख्यमंत्री आणि विद्यमान देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सांगितलं होते. पण निवडणुकीनंतर राज्यात आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी सुरू झाली असून त्यात आतापर्यंत 1 हजार महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. निकषात न बसणारे अर्ज बाद करण्यात आले आल्याची माहिती आहे.
महायुती सरकारने पाच महिन्यांपूर्वी अंतरिम अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली आणि जुलैपासून योजनेचे पैसे मिळणेही सुरू झाले. नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 7500 रुपये जमा झाले. आता निवडणुकीनंतर जिल्हा प्रशासनाने प्रलंबित अर्जांची छाननी सुरू केली आहे. यात आतापर्यंत 9814 अर्ज निकषात न बसल्यामुळे अपात्र ठरल्याची माहिती आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 20 लाख 84 हजार 364 महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर एकूण अर्जदारांपैकी 69 हजार, 175 अर्जदारांची आधार कार्ड बँक खात्याशी जोडले गेले आहे की नाही, याची तपासणी बाकी आहे.
सावधान! तुम्ही भेसळयुक्त दूध तर पित नाही ना? 1 लिटर केमिकलपासून बनवले 500 लिटर,
महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी दिलेल्या माहिती नुसार, 5724 अर्जांमध्येही काही किरकोळ त्रुटी असल्याने ते तात्पुरते नाकारण्यात आले आहेत. पण त्यांना त्रुटी दूर करून पुन्हा अर्ज सादर करता येणार आहे. तर एकूण 12 हजार अर्जांची छाननी बाकी आहे. म्हण्जेच 99.43 टक्के अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. या योजनेतील जिल्ह्यातील शिल्लक अर्ज मंजूर करण्याची प्रक्रियादेखील सुरू कऱण्यात आली आहे. सध्या दहा हजार अर्ज अपात्र ठरले आहेत. तर, लाडक्या बहिणींना पुढील हप्ता कधी मिळणार हे सरकारकडून जाहीर केले जाईल.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेतंर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील 4 लाख 32 हजार, 890 महिलांनी अर्ज भरला होता. त्यांपैकी 3 लाख 89 हजार, 920 महिला पात्र ठरल्या, त्यांना योजनेंतर्गत नोव्हेंबर पर्यंतचा लाभही मिळाला. तर 42 हजार, 486 महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. यात रहाटणी येथील ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील सर्वाधिक 65871 महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. तर पांजरपोळ आणि भोसरी येथील ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय भागातील 63106 आणि थेरगाव येथील 60 033 महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
Majhi Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींना परत द्यावे लागणार योजनेचे पैसे?