मुंबईसह राज्यात रेड अलर्ट, आज कुठे असेल पावसाचा मारा? वाचा एका क्लिकवर (फोटो सौजन्य-X)
Maharashtra rain update in Marathi: अखेर मान्सूनचे आगमन झाले असून राज्यात पुढील ६ ते ७ दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर, हवामान खात्याने राज्यातील काही भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात पुढील ६-७ दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि गोव्यात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. २७ मे ते २ जून या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे संकेत आहेत. मुसळधार वादळ, ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मुंबईत सकाळपासूनच रिमझिम सुरू झाली. मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान खात्याने समुद्रकिनाऱ्यांना भरती-ओहोटीचा इशारा दिला. त्यानुसार दुपारच्या सुमारास समुद्राची पातळी चार ते पाच मीटर उंच होती.मात्र आज सकाळ पासून समुद्रकिनाऱ्यांवर सकाळीच ओहोटी असल्याचे चित्र दिसून येत आहे. आज सकाळपासून दादर चौपाटी परिसरात समुद्राचे पाणी ओहटीमुळे बरेच कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. गेल्या २ दिवसांपासून पाऊस पडत होता, परंतु आज सकाळपासून पुन्हा मुसळधार पाऊस पडला, हजेरी लावली. पहाटेपासूनच आकाशात सर्वत्र काळे कुट्ट ढग पसरले असून अनेक भागांत मुसळधार पाऊस तर काही भागांत संततधार पाऊस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या पावसाचा केळीसह पपई तसेच इतर फळबागांना मोठा फटका बसला असून अनेक शेतकऱ्याची मशागतीचे कामे लांबणीवर पडली आहे.
पूर्वमोसमी पावसाने घेतला 254 झाडांचा बळी घेतला असून मे महिन्यात झाडे पडण्याच्या सर्वाधिक घटना घडल्य आहेत. विकासकामे झाडांना मारक ठरत आहेत. शहराला मे महिन्यातील पूर्वमोसमी पावसाने दिलला तडाखा आणि त्यानंतर आता मान्सूनच्या दमदार हजेरीमुळे शहरात मे महिन्यात तब्बल २५४ झाडं पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मे महिन्यात झाडे पडण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. तर, या झाडपडीमुळे एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जुनी झाडे कोसळत असल्याने महापालिकेची विकासकामे झाडांच्या मुळावर उठली आहेत अशी चर्चा सुरू आहे. झाडांची मुळं तसेच खोड कमकुवत झाल्याने हे चित्र आहे.
जानेवारी: २५
फेब्रुवारी: २९
मार्च: ३९
एप्रिल: ७२
मे: २५४
गेले काही दिवस कोकणामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्रमुख नद्या पाण्याखाली जात असल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी, वशिष्ठी आणि काजली किंवा प्रमुख नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे. दरवर्षी जून महिन्यात सुरू होणाऱ्या पावसाने या वर्षी २० मेपासूनच संततधार कोसळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या पावसामुळे टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. मे महिन्यात विहिरी, नाले, तलाव, कोरड्या पडल्या होत्या.पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ४८ गावांतील ११२ वाड्यांना १५ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. जवळपास २८,५०५ ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होती.