Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Monsoon Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी

Maharashtra Monsoon : सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. संभाव्य पूरस्थिती, वाहतूक विस्कळीत होणे आणि स्थानिक पातळीवर नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 04, 2026 | 10:03 AM
Maharashtra Monsoon, Mumbai Rain, Thane Red Alert

Maharashtra Monsoon, Mumbai Rain, Thane Red Alert

Follow Us
Follow Us:
  • मुंबईसह कोकण आणि घाट माथा परिसरात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा
  • अतिवृष्टी, विजांचा कडकडाट, पाणी साचणे, पूरस्थिती आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
  • हवामान विभागाने रेड अलर्ट कायम ठेवला असून काही ठिकाणी पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
 

Maharashtra Monsoon Update: राज्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह कोकण आणि घाट माथा परिसरात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ४ ते ६ जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

मुंबई हवामान विभागाने मुंबईसह ठाणे जिल्ह्यासाठी ४ आणि ५ जुलै रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टी, विजांचा कडकडाट, पाणी साचणे, पूरस्थिती आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या शक्यतेमुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना शनिवार, ४ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा निर्णय राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आणि सीआयई या सर्व व्यवस्थापनांच्या शैक्षणिक संस्थांना लागू आहे.

Ketan Agrawal Murder Case: सिया-चेतनला मोठा दिलासा! पोलीस कोठडी वाढवण्यास कोर्टाचा नकार

दुसरीकडे पालघर जिल्ह्यातही पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली असून अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

तसेच सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. संभाव्य पूरस्थिती, वाहतूक विस्कळीत होणे आणि स्थानिक पातळीवर नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सखल भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, घाट रस्त्यांवरील प्रवास टाळावा आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

हेल्पलाईन क्रमांक

बृहन्मुंबई महानगरपालिका: 1916

पालघर जिल्हा: 02525-297474 / +91 82379 78873

ठाणे महानगरपालिका: 022-25364779 / 022-25301740 / +91 93723 38827

ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष: 1800-222-108 / 8657887101

पनवेल महानगरपालिका: 022-27458040 / 41 / 42

Aamir Khan आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाची उत्सुकता शिगेला! ‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी; शाही मेजवानीचा मेन्यू

मुंबईत पावसाची उसंत, पण सतर्कतेचा इशारा कायम

सलग चार दिवसांच्या मुसळधार पावसानंतर शुक्रवारी मुंबईत काही काळ पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे रस्ते वाहतूक सुरळीत सुरू होती. उपनगरीय लोकल सेवा ५ ते १० मिनिटे उशिराने धावत होत्या. मात्र हवामान विभागाने रेड अलर्ट कायम ठेवला असून काही ठिकाणी पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पुण्यातही पावसाचा जोर वाढला

पुणे शहरात कालपासून सुरू असलेल्या पावसाने अधिक जोर धरला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शहरात जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस पुणे शहरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Web Title: Maharashtra monsoon update mumbai thane rain red alert kdmc palghar school holiday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 10:03 AM

Topics:  

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert : आता नुसता धो धो पाऊस बरसणार! राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Rain Alert : आता नुसता धो धो पाऊस बरसणार! राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.