Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला मुख्यमंत्री होण्याची मागणी या निवडणुकीत होणार पूर्ण? काय असेल महाराष्ट्राचं राजकारण

सध्या महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री हवी असा बोलबाला चालू झाला आहे. मात्र याची खरंच अशी परिस्थिती अथवा गरज आहे का? महिला मुख्यमंत्री झाल्यास यासाठी कोणाची नावं पुढे येऊ शकतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय घडू शकते? याबाबत महत्त्वाची माहिती आपण घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 19, 2024 | 10:32 AM
महाराष्ट्राचे राजकारण, नक्की घडतंय काय?

महाराष्ट्राचे राजकारण, नक्की घडतंय काय?

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार का? यावर सध्या समाजमाध्यमांवर आणि राज्यातील राजकीय वर्तुळांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. विविध राजकीय पक्षांच्या काही प्रमुख महिला नेत्यांनी मत मांडले आहे की आता राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी एका महिलेला देण्याची वेळ आली आहे. या विचारधारेची मागणी वाढत असून, काही सर्वेक्षणांनुसार हे मत मतदारांमध्येही लोकप्रिय ठरत आहे.

या निवडणुकीत विविध पक्षांकडून विजय मिळवणाऱ्या काही प्रमुख महिला नेत्यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी समोर येत आहेत. अनेक मतदारांनी यावेळी महिला मुख्यमंत्री बनावी, असे मत व्यक्त केले आहे. या वाढत्या मागणीमुळे सर्वच पक्षांनी महिलांना अधिक तिकिटे देण्याची शक्यता वाढली आहे. कसे असेल महाराष्ट्राचे राजकारण? यावेळी होईल का महिला मुख्यमंत्री, जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock) 

काय आहे चित्र

महाविकास आघाडीतील एका सूत्राने सांगितले की, त्यांच्या अंतर्गत सर्वेक्षणात काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास (राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)) अनुकूल प्रतिसाद मिळत आहे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांना कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. शरद पवार यांच्या राज्यभरातील प्रचार मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, अहमदनगर आणि नाशिक भागांमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना जनाधार वाढत असल्याचे सूचित होत आहे.

हेदेखील वाचा – लोकसभेतील ती चूक टाळण्यासाठी शिंदे गटाचा नवा प्लॅन; उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी नवी रणनीती

सुप्रिया सुळेंना मिळेल का संधी?

एका ज्येष्ठ नेत्याने गुप्तता राखण्याच्या अटीवर सांगितले की, शरद पवार यांची राज्यभरातील वाढलेली राजकीय सक्रियता त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बनवण्यासाठी आहे आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना शह देण्यासाठी चाणक्यनिती असल्याची शक्यता वर्तावली जात आहे. मात्र, सुप्रिया सुळे आणि शरद पवार दोघांनीही मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय निवडणुकानंतर आकडेवारीनुसार होईल, असे सांगितले आहे.

सुप्रिया सुळेंचा प्रभाव

मविआतील एका सूत्राने सांगितले की, सुप्रिया सुळे यांचा राष्ट्रीय पातळीवर तसेच त्यांच्या स्वतःच्या पक्षातही मोठा प्रभाव आहे. अजित पवार यांच्याशी असलेला मतभेद पाहता, राष्ट्रवादीच्या मूळ गटात आता सुळे यांच्या विरोधात उभे राहणारे मोठे नेते नाहीत. मविआने बहुमत मिळवले तर सुप्रिया सुळे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सर्वमान्य ठरू शकते, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

काय आहे परिस्थिती

मात्र, सगळेच या विचारधारेचे समर्थन करत नाहीत. अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, केवळ महिला मुख्यमंत्री झाली म्हणून राज्यातील महिलांच्या समस्या सुटणार नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की, राज्यातील खऱ्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करणारे नेतृत्व अजित पवार यांचेच असायला हवे. चाकणकर यांनी महाविकास आघाडीवर टीकाही केली की, ते महायुतीवर टीका करण्यातच व्यस्त आहेत.

हेदेखील वाचा – महायुतीसाठी कसे आहे महाराष्ट्रातील वातावरण?; शिवसेनेच्या सर्वेक्षणातून मोठी माहिती समोर

महिलांची भूमिका

महिलांची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरू शकते, हे मध्य प्रदेशाच्या निवडणुकीत दिसून आले आहे. भाजपला महिलांच्या मतांमुळे विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत, जसे की ‘मुख्यमंत्री लड़की बहीण’ योजना आणि मोफत एलपीजी सिलिंडर योजना.

महिलांना मतदार म्हणून आकर्षित करणे एक प्रमुख निवडणूक रणनीती असू शकते, परंतु महिला नेतृत्वाला महत्त्व मिळेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Maharashtra politics will the demand for a woman chief minister be fulfilled in this vidhan sabha election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2024 | 10:28 AM

Topics:  

  • Latest Political News
  • maharashtra election 2024
  • Maharashtra Vidhan Sabha

संबंधित बातम्या

चीनमध्ये खळबळ! उच्चपदस्थ राजदूत लिऊ जियानचाओ यांना अटक, परराष्ट्र मंत्रिपदाच्या होते शर्यतीत
1

चीनमध्ये खळबळ! उच्चपदस्थ राजदूत लिऊ जियानचाओ यांना अटक, परराष्ट्र मंत्रिपदाच्या होते शर्यतीत

Sanjay Raut : “निवडणूक आयोगाच्या डोळ्यावर पट्टी अन् तोंडात बोळा…; खासदार संजय राऊत मतांच्या चोरीवरुन भडकले
2

Sanjay Raut : “निवडणूक आयोगाच्या डोळ्यावर पट्टी अन् तोंडात बोळा…; खासदार संजय राऊत मतांच्या चोरीवरुन भडकले

Maharashtra Politics : अधिवेशन काळातच मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ महत्त्वपूर्ण घोषणा; आश्वासन देत म्हटलं…
3

Maharashtra Politics : अधिवेशन काळातच मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ महत्त्वपूर्ण घोषणा; आश्वासन देत म्हटलं…

“आमच्याच तंगड्या वर करतो अन्…; भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान, राजकारण तापलं
4

“आमच्याच तंगड्या वर करतो अन्…; भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान, राजकारण तापलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.