Photo Credit-Social media
मुंबई: महाराष्ट्र विधनासभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी निवड़णुकांसाठी जोरदार तयारी सूरू केली आहे. जागावाटपावरही चर्चा सुरू आहे.कोणत्या मतदारसंघात आपल्या पक्षालाअनुकूल वातावरण आहे. याचीही चाचपणी सुरू आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाने केलेल्या सर्वेक्षणातून मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात महायुतसाठी 209 जागांवर अनुकूल वातावरण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील काही मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले.या सर्वेक्षणात 209 मतदारसंघात महायुतीसाठी अनुकूल वातावरण असल्याचे समोर आले आहे. शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर येत्या दोन आठवड्यात महायुतीचे जागावाटप पूर्ण होईल, अशीही माहिती आहे.
हेही वाचा: विकत आणायची गरज नाही, या टिप्स फॉलो करून घरीच तयार करा घट्ट दही
दरम्यान, राज्यात दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर गेल्या आवड्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुका होतील, असा अंदाज वर्तवला होता. याशिवाय महायुतीमधील काही नेत्यांनी 15 दिवसांतच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण –
राज्याची विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले हेत. त्याच अनुषंगाने राजकीय पक्षांकडून विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आपल्या समन्वयकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व 288 जागांचा आढावा घेतला. या सर्वेक्षणात 209 मतदारसंघात महायुतील पोषक वातावरण असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनवणे यांनी दिली.
हेही वाचा: बद्धकोष्ठता, लठ्ठपणा, डायबिटीजपासून आराम मिळवण्यासाठी उपाशी पोटी प्या ‘हे’ पेय
पण या 209 पैकी ज्या मतदारसंघात ज्यापक्षाचे आमदार आहेत आणि ज्या ठिकाणी ज्या पक्षाची जिंकण्याची सर्वाधित शक्यता आहे, त्या ठिकाणी त्याच पक्षाच्या उमेदवाराला जागा दिली जाई आणि महायुतीचे नेते याबाबतचा अंतिम निर्णय घेतील. महायुतीत जागावाटपात कोणताही वाद नसल्याचे किरण सोनावणे यांनी म्हटले आहे.