Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: छत्री घेऊनच फिरा! अवकाळीमुळे साताऱ्यात मोठे नुकसान,18 मेंढ्यांचा मृत्यू अन्…

दरवर्षीप्रमाणे ते या परिसरात मेंढ्या चारण्यासाठी आले होते. घटनेची माहिती मिळताच कोंडवे वाघाचे पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. शासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 13, 2026 | 09:59 PM
Maharashtra Rain Alert: छत्री घेऊनच फिरा! अवकाळीमुळे साताऱ्यात मोठे नुकसान,18  मेंढ्यांचा मृत्यू अन्…
Follow Us
Follow Us:

साताऱ्यात अवकाळी पावसाचा तडाखा
विजेच्या धक्क्यात १८ मेंढ्यांचा मृत्यू
महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

सातारा: सातारा जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही भागांत गारांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, पशुधन आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली असून प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी करण्यात येत आहे.

तालुका सातारा येथील कोंडवे गावात विजेचा तडाखा बसून १८ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मेंढपाळ हनुमंत मासाळ यांच्या मेंढ्यांवर अचानक वीज कोसळली. या घटनेत त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सुदैवाने, काही वेळापूर्वीच कागद आणण्यासाठी दुसरीकडे गेल्यामुळे हनुमंत मासाळ यांचा जीव वाचला.

दरवर्षीप्रमाणे ते या परिसरात मेंढ्या चारण्यासाठी आले होते. घटनेची माहिती मिळताच कोंडवे वाघाचे पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

उकाड्यापासून आता दिलासा मिळणार; राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

दरम्यान, अवकाळी पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयालाही बसला. शवविच्छेदनगृह परिसरात सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास दोन मोठी झाडे कोसळली. झाडे पडताच परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

उन्हाच्या चटक्यासोबतच ‘गारपिटी’चे संकट! राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाचा इशारा, ‘या’ भागात हाहाकार माजवणार

जिल्ह्याच्या पश्चिम भागातही दीड तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. ग्वाल्हेर–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग मंदावला होता. काही ठिकाणी वाहनचालकांना दिवे सुरू करून सावधगिरीने प्रवास करावा लागला. अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Maharashtra rain alert satara 18 sheeps death imd updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 09:59 PM

Topics:  

  • Maharashtra Rain Update
  • Satara Rain
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: राज्यात पुन्हा हवामान बदलणार! ‘या’ १५ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; IMD कडून यलो अलर्ट जारी
1

Maharashtra Rain Alert: राज्यात पुन्हा हवामान बदलणार! ‘या’ १५ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; IMD कडून यलो अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.