उन्हाच्या चटक्यासोबतच 'गारपिटी'चे संकट! (Photo Credit- X)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथा आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहू शकतो. १९ एप्रिलला दुपारनंतर घाट क्षेत्र आणि उत्तर खानदेशात ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी पावसाला सुरुवात होऊ शकते. २० आणि २१ एप्रिलला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे विभाग, छत्रपती संभाजीनगर, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भातील अमरावती परिसरात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. २२ एप्रिलला पावसाचा जोर हळूहळू ओसरण्याची चिन्हे आहेत.
राज्यात 20-22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये… — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 18, 2026
Kolhapur News : एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार ! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा धोका लक्षात घेता कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत:
१. पीक संरक्षण: काढणी केलेली पिके सुरक्षित जागी किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावीत.
२. कामाचे नियोजन: शेतीची कामे हवामानाचा अंदाज घेऊनच नियोजित करावीत.
३. विजेपासून संरक्षण: वादळ आणि विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत आश्रय घेणे टाळावे.
राज्यात सध्या तापमानाचा पारा वाढलेला असताना, दुपारनंतर अचानक आभाळ दाटून येण्याचे प्रमाण वाढणार आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे हे बदल होत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या वादळी पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार असला, तरी शेती पिकांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.






