Satara Rain Alert News: सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला असून प्रशासनाने २७४ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर केले आहे. ताथवडे घाटात १ मृत्यू झाला असून कराडमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे.
मल्हारपेठमध्ये झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे निसरेफाटा, एफिल आणि रासे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली…
सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असून कोयना धरणात ३५.७१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक ३९२ मिमी पाऊस झाला असून ९४ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन सतर्क मोडवर आहे.
महाबळेश्वरमध्ये गेल्या १०० वर्षांतील विक्रमी ११ इंच पाऊस पडल्याने सातारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सातारा, पाटण, महाबळेश्वरसह ५ तालुक्यांतील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
मांढरदेव परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह कण्हेरी गावच्या डोंगरावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. डोंगर माथ्यावरून नाले खळाळू लागले. त्यामुळे क्षणातच ओढे दुथडी भरून वाहू लागले.
दरवर्षीप्रमाणे ते या परिसरात मेंढ्या चारण्यासाठी आले होते. घटनेची माहिती मिळताच कोंडवे वाघाचे पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. शासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी…
म्हसवड शहरातील शिंगणापूर चौकातील सर्व दुकानात पाणी शिरले तर या परिसरातील पेट्रोल पंपातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने हा मार्ग काही काळाकरीता बंद करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली.
नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगून नागरिकांनीही पुराच्या पाण्यात वाहने नेण्याचे अनाठायी धाडस करु नये, पाण्यात उतरु नये, असे आवाहन केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दूरदृश्यप्रणालीवरुन जिल्ह्यातील पर्जन्यस्थितीचा आढावा घेतला.