Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OTM 2026: जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राचा डंका! मुंबईतील ‘ओटीएम’ प्रदर्शनात राज्याच्या दालनाला पर्यटकांची पसंती

मुंबईत पार पडलेल्या 'ओटीएम २०२६' मध्ये महाराष्ट्र पर्यटनाच्या दालनाला जागतिक पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पर्यटनाचा जीडीपीमधील वाटा १५% पर्यंत नेण्याचे ध्येय पर्यटन विभागाने ठेवले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 09, 2026 | 07:30 PM
OTM 2026 मध्ये महाराष्ट्र पर्यटनाचा जलवा! राज्याच्या दालनाला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

OTM 2026 मध्ये महाराष्ट्र पर्यटनाचा जलवा! राज्याच्या दालनाला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Follow Us
Close
Follow Us:

 

  • OTM 2026 मध्ये महाराष्ट्र पर्यटनाचा जलवा!
  • राज्याच्या दालनाला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि. ९ फेब्रुवारी २०२६: वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे आशियातील सर्वात मोठा ट्रॅव्हल ट्रेड शो ‘आऊटबाऊंड ट्रॅव्हल मार्ट २०२६’चे (ओटीएम) आयोजन करण्यात आले होते. जागतिक स्तरावर पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी मुंबईत या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र पर्यटन दालनात ४० हून अधिक पर्यटन भागधारकांनी सहभाग घेतला.

सदर कार्यक्रमामध्ये मा.श्री. संजय खंदारे, (भा.प्र.से.) प्रधान सचिव, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन, डॉ. बी.एन.पाटील (भा.प्र.से) संचालक, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन, मा.श्री. निलेश गटणे, (भा.प्र.से) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन, मा.श्री. चंद्रशेखर जयस्वाल, महाव्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र पर्यटन दालनाला भेट दिली. तसेच दालनामध्ये उपस्थित असलेल्या पर्यटन भागधारकांशी संवाद साधला.

राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटनस्थळांची माहिती देखील ‘ओटीएम’च्या माध्यमातून देण्यात आली. सदर प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र पर्यटन दालन उभारुन सहभाग घेतला. महाराष्ट्र पर्यटन दालनाद्वारे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्र, त्या ठिकाणी जाण्याची सोय, उपलब्ध सेवा सुविधा इ. माहिती पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आली.

महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या युवा पर्यटन राजदूत नवेली देशमुख यांनीही ‘ओटीएम’ कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पर्यटन दालनाला भेट देऊन दालनामध्ये सहभागी झालेल्या भागधारकांशी संवाद साधला. तसेच नवेली देशमुख यांनी महाराष्ट्र पर्यटन दालनाला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत कौतुक केले.

Karjat News : कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..

मा. श्री. संजय खंदारे, (भा.प्र.से.) प्रधान सचिव, (पर्यटन), महाराष्ट्र शासन

“‘ओटीएम’मधील सहभागाने निश्चितच महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळेल. तसेच जगाच्या नकाशावर पर्यटनासाठी महाराष्ट्र नवी उंची गाठेल असा विश्वास आहे. या माध्यमातून पर्यटनाला गती मिळून अधिकाधिक रोजगाराची निर्मिती करण्यात येणार आहे. ‘ओटीएम’ने पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी दिलेल्या या व्यासपीठाबाबत आयोजकांचे आभार मानतो.”

डॉ. बी.एन.पाटील, (भा.प्र.से.) संचालक, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन

“महाराष्ट्र राज्याच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात सध्या पर्यटनाचा वाटा ७ ते ८ टक्के आहे. भविष्यात तो १५ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे राज्यभरात विविध कार्यक्रम आणि उत्सव आयोजित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘आउटबाऊंड ट्रॅव्हल मार्ट’ (ओटीएम). राज्यातील पर्यटन उत्पादनांच्या प्रसारासाठी हे एक प्रभावी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ ठरले आहे. या कार्यक्रमाद्वारे भागधारकांना जगभरातील कंपन्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली. या उपक्रमांमुळे येत्या काळात महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रात जागतिक भरारी घेईल.”

मा. श्री. निलेश गटणे, (भा.प्र.से.) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन

“‘ओटीएम २०२६’ प्रदर्शन जागतिक पर्यटनाचे महाद्वार आहे. या प्रदर्शनाद्वारे पर्यटन व्यावसायिक क्षेत्राला नवे व्यासपीठ मिळाले आहे. जागतिक पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटनाच्या माध्यमातून राज्याचा सांस्कृतिक वारसा, गडकिल्ले, विविध पर्यटन स्थळे यांची नव्याने ओळख होईल. ‘ओटीएम’मधील सहभागामुळे निश्चितच महाराष्ट्रातील पर्यटनाला अधिक चालना मिळेल. शिवाय या माध्यमातून पर्यटनाला गती मिळण्याबरोबरच अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. जगाच्या नकाशावर महाराष्ट्र पर्यटनासंबंधित नवी उंची गाठेल असा आम्हाला विश्वास आहे”.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागची ३१ मे २००६ रोजी स्थापना झाली. राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या विभागाची स्थापना करण्यात आली. पर्यटन आणि संस्कृती यांची नाळ एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे. कारण ऐतिहासिक स्मारके, लोककला आणि स्थानिक परंपरा या केवळ सांस्कृतिक ठेवा नसून पर्यटन आकर्षण म्हणूनही ओळखल्या जातात. हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि या क्षेत्रांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ स्तरावरील विभाग स्थापन केला.

सदर विभाग महाराष्ट्रातील अद्वितीय कला प्रकार, परंपरा आणि ऐतिहासिक स्थळे जपण्यासाठी, त्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी कार्य करतो. तसेच, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवून, पर्यटन विकासाला चालना देऊन हा विभाग राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देत आहे. सदर विभागाच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्य केवळ एक पर्यटन स्थळ म्हणूनच नव्हे, तर एक जिवंत संस्कृती आणि वारसा असलेले राज्य म्हणून अधिक समृद्ध आणि आकर्षक बनत आहे.

Dharashiv : तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका

Web Title: Maharashtra tourism pavilion otm 2026 mumbai huge response updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • maharashtra
  • tourim

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटना अध्यक्षपदी संतोषकुमार माळवे; तर सरचिटणीसपदी संदीप सावंत
1

सातारा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटना अध्यक्षपदी संतोषकुमार माळवे; तर सरचिटणीसपदी संदीप सावंत

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीवर मध्यरात्री ‘दरोडा’; मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन यांच्यावर आरोप
2

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीवर मध्यरात्री ‘दरोडा’; मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन यांच्यावर आरोप

Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळीचा गळा आवळतोय? पुणे जिल्ह्यातील केंद्रांच्या संख्येत लक्षणीय घट
3

Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळीचा गळा आवळतोय? पुणे जिल्ह्यातील केंद्रांच्या संख्येत लक्षणीय घट

Satara News: वाईत मृत्यूचा सापळा ठरलेला रस्ता; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप उसळला
4

Satara News: वाईत मृत्यूचा सापळा ठरलेला रस्ता; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप उसळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.