Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather Update : नागरिकांनो सावध व्हा, तो पुन्हा येतोय…! पुढील 48 तास धोक्याचे, आता कुठे अतिमुसळधार पाऊस कोसळणार?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्राच्या हवामान उलथापालथ होणार हे आधीच हवामान विभागाकडू स्पष्ट करण्यात आले होते. अशातच आता पुन्हा महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 01, 2025 | 12:41 PM
नागरिकांनो सावध व्हा, तो पुन्हा येतोय...! पुढील 48 तास धोक्याचे, आता कुठे अतिमुसळधार पाऊस कोसळणार? (फोटो सौजन्य-X)

नागरिकांनो सावध व्हा, तो पुन्हा येतोय...! पुढील 48 तास धोक्याचे, आता कुठे अतिमुसळधार पाऊस कोसळणार? (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • आता स्वेटर नाही तर, पुन्हा छत्री आणि रेनकोट बाहेर काढण्याची वेळ आली
  • चक्रीवादळाचा परिणाम हा महाराष्ट्रावर देखील होणार आहे
  • राज्याच्या अनेक भागांमध्ये पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार
Maharashtra Weather Update News In Marathi: नागरिकांनो वेळीच सावध व्हा, आता स्वेटर नाही तर, पुन्हा छत्री आणि रेनकोट बाहेर काढण्याची वेळ आली आहे. ऐन थंडीच्या काळात हवामान विभागाकडून पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागराच गोंधळ सुरु असून आधी सेनयार चक्रीवादळ आणि आता डिटवाह चक्रीवादळ महाराष्ट्रावर घोंगावतोय. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेत आलेल्या धुमाकूळ घातलेल्या डिटवाह चक्रीवादळामुळे भारतामध्ये देखील काही राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील ४८ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळसह, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पुद्दुचेरी आणि अंदमान आणि निकोबार या बेटांवर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका वाढला! पारा तब्बल १०.२ अंशांवर; ४ दिवसांत ७ अंशांची मोठी घट

महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे?

महाराष्ट्रात चक्रीवादळाचाही हा परिणाम असणार आहे. पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण राहील, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तर उर्वरित महाराष्ट्रात फक्त तीव्र थंडी पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

महाराष्ट्रात थंडीची लाट, पुण्यासह या शहरांमध्ये हवामान बदल

महाराष्ट्रात हवामान बदलत आहे, पुण्यासह अनेक शहरांमध्ये थंडीची तीव्रता वाढत आहे. येत्या काही दिवसांत ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई वगळता राज्यभर तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे, ज्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा थंडीचा अनुभव येत आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सकाळी धुके पडेल, नंतर आकाश निरभ्र होईल. मुंबईतील कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस होते. इतर कोकण जिल्ह्यांमध्येही अशीच हवामान परिस्थिती राहील.

तसेच पुण्यातील किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे. कोल्हापूरमध्ये ढगाळ सकाळनंतर दुपारी आकाश निरभ्र होईल, तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. सकाळी उत्तर महाराष्ट्रात दाट धुके राहील, ज्यामुळे दृश्यमानता कमी होऊ शकते. नंतर आकाश निरभ्र होईल, किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. जळगावमध्ये किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील.

मराठवाड्यातही थंडी वाढली आहे. येत्या काही दिवसांत थंडीचा जोर वाढेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील, तर नांदेडमध्ये अंशतः ढगाळ आकाश राहील. विदर्भात अंशतः ढगाळ आकाश आणि धुके राहील, ज्यामुळे थंडी वाढेल. नागपूरमध्ये कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांमध्येही अशीच हवामान परिस्थिती राहील. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढू लागला आहे. येत्या काही दिवसांत तापमान आणखी घसरू शकते. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?

Web Title: Maharashtra weather update heavy rain and cold in next 48 hours badly damage by ditwa cyclone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 12:41 PM

Topics:  

  • imd
  • maharashtra

संबंधित बातम्या

ठाकरे सेनेच्या माजी नगराध्यक्षासह आमदारांनी नगरपालिकेत २५० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा भाजपाचा आरोप : लेखा परीक्षणाचा हवाला
1

ठाकरे सेनेच्या माजी नगराध्यक्षासह आमदारांनी नगरपालिकेत २५० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा भाजपाचा आरोप : लेखा परीक्षणाचा हवाला

Mumbai Local : विरार ते डहाणू दरम्यान १५ डब्यांची लोकल धावणार,नवीन वर्षाच्या आधी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय
2

Mumbai Local : विरार ते डहाणू दरम्यान १५ डब्यांची लोकल धावणार,नवीन वर्षाच्या आधी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय

“मी माझा जीव देईन पण झाडे तोडू देणार नाही…”,नाशिकच्या तपोवनातील झाडे तोडण्याविरुद्ध सयाजी शिंदे यांची आक्रमक भूमिका 
3

“मी माझा जीव देईन पण झाडे तोडू देणार नाही…”,नाशिकच्या तपोवनातील झाडे तोडण्याविरुद्ध सयाजी शिंदे यांची आक्रमक भूमिका 

कॉम्प्रेहेन्सिव्ह मॉड्यूलर सर्व्हे एज्युकेशन २०२५ जाहीर! महाराष्ट्रातील प्रति विद्यार्थी सरासरी खर्च ‘इतका’
4

कॉम्प्रेहेन्सिव्ह मॉड्यूलर सर्व्हे एज्युकेशन २०२५ जाहीर! महाराष्ट्रातील प्रति विद्यार्थी सरासरी खर्च ‘इतका’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.