Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

सात-बारावरील नोंदीसाठी लाच मागितल्याप्रकरणी सोमनाथ संपत महानवर याच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 07, 2026 | 12:30 AM
तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

Follow Us
Follow Us:
  • तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं
  • एसीबीने एकाला रंगेहात पकडले
  • वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
बारामती : बारामती तालुक्यातील निंबुत येथील तलाठी व मंडल अधिकारी यांच्या नावाने सात-बारावरील नोंदीसाठी लाच मागितल्याप्रकरणी सोमनाथ संपत महानवर याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. याप्रकरणी सोमनाथवर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

निंबुतच्या मागील तलाठ्यावरही लाचलुचपत विभागाने कारवाई केली. त्यानंतर दोन-तीन वर्षे पूर्णवेळ तलाठी नव्हते. तेव्हा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच खासगी व्यक्ती सोमनाथ महानवर याने सरकारी कार्यालयाचा ताबा घेतला होता. नवीन महिला तलाठी आल्यानंतरही महानवरच अर्थपूर्ण व्यवहार करत होता.

निंबुतच्या शेतकऱ्याने शेतीच्या गटामध्ये भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून सहा गुंठ्यांचे चार प्लॉट तयार केले होते. त्यानुसार तहसीलदारांनी सात-बारावर नोंद करण्यासाठी निंबुतच्या गाव कामगार तलाठी जयश्री तनपुरे यांना ११ फेब्रुवारीला आदेश दिले. नोंदीसाठी शेतकरी निंबुत तलाठी कार्यालयात गेल्यावर कार्यालयातील सोमनाथ महानवर याने तलाठी जयश्री तनपुरे आणि मंडल अधिकारी संतोष मोहिते यांच्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर महानवरने तसा व्हॉटसअॅप मेसेजही पाठविला.

वैतागलेल्या शेतकऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या प्राथमिक पाहणीत सोमनाथ महानवर याने तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्यासाठी २० हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ मार्चला रचलेल्या सापळ्यात महानवर याला १५ हजार रुपयांची लाच घेताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडले. सुहास हट्टेकर अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

35 हजारांची लाच घेणं भोवलं

पुणे जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तपासात मदत करणे, तसेच जप्त केलेली गाडी परत करण्यासाठी एक लाखांची लाच मागणाऱ्या मुळशीतील पौड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. तडजोडीत तक्रारदाराकडून ३५ हजारांची लाच घेताना सहायक फौजदाराविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार सचिन बाळासाहेब शिंदे (वय ४६, रा. ग्रीन फ्लाॅरेन्झा सोसायटी, सूस, ता. मुळशी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Acb has taken action by catching a person red handed while accepting a bribe in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Bribe News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी
1

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त
2

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
3

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
4

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.