Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्याच्या अर्थसंकल्पात हेल्थ सेक्टरकडे दुर्लक्ष? आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील तरतुदींवर तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. महसुलातील मर्यादित वाढ आणि खर्चातील कपात यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 07, 2026 | 01:28 PM
राज्याच्या अर्थसंकल्पात हेल्थ सेक्टरकडे दुर्लक्ष? आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

राज्याच्या अर्थसंकल्पात हेल्थ सेक्टरकडे दुर्लक्ष? आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

Follow Us
Follow Us:
  • तज्ज्ञांच्या मते, यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारची खर्च करण्याची क्षमता मर्यादित प्रमाणातच वाढली आहे.
  • सामाजिक क्षेत्रातील एकूण निधीत घट झाल्याचे विश्लेषणातून समोर आले आहे.
  • आरोग्य, पोषण आणि काही कल्याणकारी योजनांसाठीच्या तरतुदींमध्येही कमी झाल्याचे सांगितले जात आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमध्ये घट झाल्याने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अपेक्षित बळ मिळणार नसल्याची टीका आरोग्य धोरण अभ्यासक डॉ. रवी दुग्गल यांनी केली आहे. महसुलातील मर्यादित वाढ आणि सामाजिक क्षेत्रातील खर्चातील कपात यामुळे आरोग्य सेवांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. दुग्गल यांच्या विश्लेषणानुसार, यंदाच्या अर्थसंकल्पातील सरकारची आर्थिक खर्च करण्याची क्षमता गेल्या वर्षाच्या सुधारित अंदाजाच्या तुलनेत केवळ १.८ टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढ सुमारे ५ टक्के महागाईदरापेक्षा कमी असल्याने सामाजिक क्षेत्रातील खर्चात मोठी वाढ अपेक्षित नव्हती.

भारताची अणुक्षेत्रात मोठी झेप! ‘Isomed 2.0’ प्रकल्पामुळे निर्जंतुकीकरण प्रक्रिया झाली अधिक वेगवान, वाचा सविस्तर

राज्याच्या नाममात्र उत्पन्नात १४ टक्क्यांची वाढ अपेक्षित असली तरी त्या तुलनेत महसूलवाढ साधण्यात सरकारला यश आले नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, याचा परिणाम सामाजिक क्षेत्रातील एकूण तरतुदींवर दिसून येतो. सामाजिक क्षेत्रासाठीची तरतूद २,८९,६७१ कोटी रुपयांवरून २,६८,४६० कोटी रुपयांवर आली आहे.

पोषण क्षेत्रातील तरतूद ४५ टक्क्यांनी कमी

महिला कल्याणातील ‘लाडकी बहीण’ योजनेच्या तरतुदीतही घट झाली असून ती ३०,६१९ कोटी रुपयांवरून २१,००० कोटी रुपयांवर आली आहे. पोषण क्षेत्रातील तरतूद ४५ टक्क्यांनी कमी होऊन ५,८५१ कोटी रुपयांवरून ३,१९९ कोटी रुपये झाली आहे. ग्रामीण विकासासाठीचा निधीही ३५,८१५ कोटी रुपयांवरून ३४,०१० कोटी रुपये इतका कमी झाला आहे. आरोग्य क्षेत्रातही निधीत घट झाल्याचे दुग्गल यांनी सांगत मागील वर्षाच्या सुधारित अंदाजातील ३८.४५५ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा आरोग्य क्षेत्रासाठी ३३.६५४ कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून ती सुमारे १२.५ टक्क्यांनी कमी आहे.

काळजी घ्या ! उष्णतेचा वाढला कडाका; तापमानातही झाली मोठी वाढ

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Maharashtra rajya budget health sector neglect experts concern health services impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Budget
  • Health Sector
  • maharashtra

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.