Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather IMD Alert: राज्यात पुन्हा धो-धो कोसळणार! २२ जिल्ह्यांना येलो अलर्ट; मुंबई-ठाण्यात पावसाचा अलर्ट

Maharashtra Weather Update: कोकण भागात विजांच्या कडकडाटासह ताशी 30-50 किमी वेगाचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणाला पुढील 3 दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे

  • By anuradha sagar
Updated On: Sep 21, 2026 | 10:26 AM
Maharashtra Weather Update, IMD Rain Alert Maharashtra

Maharashtra Weather Update, IMD Rain Alert Maharashtra

Follow Us
Follow Us:
  • विश्रांतीनंतर राज्यात पावसाचे पुनरागमन, वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
  • आयएमडी सॅटेलाईट प्रणालीनुसार पुढील ५ दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज
  • येत्या ७२ तासांत राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये ‘येलो अलर्ट’ जारी
Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार एंट्री घेतली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे राज्यभरात उकाडा चांगलाच वाढला होता. उन्हाचे चटकेही बसू लागले होते. पण मध्यरात्रीपासून पावसाला सुरूवात झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून २४ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सॅटेलाईट प्रणालीनुसार, राज्यात पुढील 5 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाच्या सरी कोसळणार आहे. येत्या 72 तास 22 जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकण भागात विजांच्या कडकडाटासह ताशी 30-50 किमी वेगाचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणाला पुढील 3 दिवसांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर आज मुंबई, ठाणे आणि पालघर या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांनाही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला.

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया,

महाराष्ट्रात पुढील ३ दिवसांचा पावसाचा अंदाज

आज (२१ सप्टेंबर) मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

येत्या दोन दिवसांत राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. २२ सप्टेंबरला राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भासह मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.

२२ सप्टेंबरला येलो अलर्ट असणारे जिल्हे :

विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, हिंगोली, वाशीम आणि यवतमाळ, तसेच नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर (घाट परिसर) येथे येलो अलर्ट आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, नाशिक, पालघर, मुंबई, ठाणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी अतिशय तुरळक पावसाच्या सरी पडू शकतात.

‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’

२३ सप्टेंबरला पावसाचा जोर ओसरणार

२३ सप्टेंबर रोजी राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र, दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता कायम राहणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे.

याआधीच्या अंदाजानुसारही २२ सप्टेंबरला राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक हवामानाच्या अंदाजानुसार आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

Web Title: Maharashtra weather update imd issues yellow alert for 22 districts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • maharashtra weather update
  • Monsoon Alert

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.