
RSS विरोधात युवक काँग्रेस आक्रमक, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी; नेमकं काय आहे मागणी?
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे व मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झिनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहभाग होत जोरदार घोषणाबाजी करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निषेध केला. या आंदोलनाची भनक लागताच पोलिसांनी टिळक भवनला वेढा घातला होता. टिळक भवनला अक्षरशः पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा असतानाही युवक काँग्रेसच्या पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. तासभर चाललेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी कार्यर्त्यांना ताब्यात घेतले.
यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विकृत चेहरा या प्रकरणातून समोर आला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. “लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार असताना भाजपा सरकारने मात्र पोलिसांना पुढे करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही धिक्कार करतो. केरळमधील इंजिनिअर आनंदू अजि यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर असून, त्याची सखोल चौकशी करावी व दोषींना कठोर शिक्षा करावी”, अशी मागणी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झिनत शबरीन यांनी यावेळी केली.