Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra ZP Election 2026: मतदानासाठी कामगारांना मिळणार ‘भरपगारी सुट्टी’; राज्य सरकारचे कडक आदेश

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने उद्योग समुह, खासगी कंपन्या आणि व्यावसायिक आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांसाठी शनिवारी पगारी सुट्टी जाहीर केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 05, 2026 | 01:19 PM
Maharashtra ZP Election 2026: मतदानासाठी कामगारांना मिळणार ‘भरपगारी सुट्टी’; राज्य सरकारचे कडक आदेश
Follow Us
Close
Follow Us:
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनिमित्ताने राज्य सरकारने मोठा निर्णय
  • जर दुसऱ्या जिल्ह्यात कामाला असतील, तर त्यांनाही मतदान करण्यासाठी सुट्टी दिली जावी,
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज रात्री १० वाजता थांबणार
Maharashtra ZP Election 2026:

राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनिमित्ताने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मतदानाच्या दिवशी १८ वर्षांवरील सर्व नोंदणीकृत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी कर्मचारी आणि कामगारांना भरपगारी सुट्टी किंवा सवलत दिली जावी, असे आदेश राज्य सरकारकडून आस्थापनांना देण्यात आले आहेत.

ज्या १२ जिल्ह्यांमध्ये मतदान आहे, तेथील मतदार जर दुसऱ्या जिल्ह्यात कामाला असतील, तर त्यांनाही मतदान करण्यासाठी सुट्टी दिली जावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना हा निर्णय लागू असेल. यात खाजगी कंपन्या आणि कारखाने, आयटी (IT) कंपन्या आणि औद्योगिक युनिट्स, दुकाने, शॉपिंग मॉल्स आणि रिटेल आउटलेट्स, हॉटेल्स, भोजनालये आणि थिएटर्स या आस्थापनांचा समावेश करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा वापर करण्यास अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता मालकांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले आहे.

ZP Election 2026: पुणे जिल्ह्यात 23 हजार मनुष्यबळाची नियुक्ती; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने उद्योग समुह, खासगी कंपन्या आणि व्यावसायिक आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांसाठी शनिवारी पगारी सुट्टी जाहीर केली आहे. उद्योग, कामगार आणि खाण विभागाने आदेश जारी करण्यात आला आहे. (Maharashtra ZP Election)

उद्योग, कामगार आणि खाण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, १८ वर्षे आणि त्यावरील सर्व नोंदणीकृत मतदारांनी निवडणुकीत भाग घेणे आवश्यक आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी उद्योग समुह आणि आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगारी रजा मंजू करावी. १२ जिल्ह्यांमधील मतदार जर इतर ठिकाणी काम करत असतील तर त्यांनाही पगारी सुट्टी दिली जावी. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत सर्व आस्थापनांसाठी हा निर्णय लागू असणर आहे. यासोबतच कारखाने, खाजगी कंपन्या, आयटी कंपन्या, दुकाने, व्यवसाय आणि औद्योगिक युनिट्स,व्यावसायिक प्रतिष्ठाने, निवासी हॉटेल्स, भोजनालये, थिएटर, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि रिटेल आउटलेट्स या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही हा निर्णय लागू असेल.

Nuclear War Alert : अमेरिका-रशियामधील ‘तो’ १५ वर्षांचा करार संपला; आता जगाचा विनाश निश्चित?

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज रात्री १० वाजता थांबणार आहे. यानंतर कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक सभा किंवा प्रचाराला करता येणार नाही. राज्यातील जिल्हा परिषदांसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान, तर, ९ फेब्रुवारी २०२६ मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी आणि १४६ पंचायत समिती गणांसाठी ही मतदान प्रक्रिया होणार आहे. जिल्हा परिषदेसाठी २९९, तर पंचायत समितीसाठी ५२८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. सुमारे २९ लाख ७२ हजार ३५९ मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे प्रचारावर शोककळा पसरली होती, ज्यामुळे अनेक ठिकाणी प्रचार शांततेत पार पडला. जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट आणि चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Web Title: Maharashtra zp election 2026 paid leave for employees on polling day maharashtra govt issues strict orders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

ZP Election 2026: निवडणुक प्रचारतोफा आज थंडावणार! ७ फेब्रुवारीला मतदान; ‘असे’ शोधा मतदार यादीत नाव
1

ZP Election 2026: निवडणुक प्रचारतोफा आज थंडावणार! ७ फेब्रुवारीला मतदान; ‘असे’ शोधा मतदार यादीत नाव

ZP Election 2026 : निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज; कर्जत तालुक्यातील 220 मतदान केंद्रावर होणार मतदान
2

ZP Election 2026 : निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज; कर्जत तालुक्यातील 220 मतदान केंद्रावर होणार मतदान

Sindhudurg: निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; ८०० कर्मचारी तैनात
3

Sindhudurg: निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; ८०० कर्मचारी तैनात

ZP Election 2026: कळवंडे, सावर्डेत चुरशीच्या लढती; उमेदवारांची धावपळ
4

ZP Election 2026: कळवंडे, सावर्डेत चुरशीच्या लढती; उमेदवारांची धावपळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.