Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद; खोटारड्या बोम्मई सरकारच्या मंत्र्यांना महाराष्ट्राचे उत्तर; मुंबईतील कानडी भाषिकांची आकडेवारी घ्या जाणून

कर्नाटकचे उच्च शिक्षणमंत्री अश्वत्थ नारायण आणि कायदामंत्री माधुस्वामी यांनी गरळ ओकली. तसेच, २० टक्के कानडी लोकसंख्या असलेल्या मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, आव्हान दिले. मात्र, मुंबईत कानडी भाषिकांची कमाल संख्या ८ टक्केच असल्याचे समोर आले आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Dec 29, 2022 | 10:21 AM
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद; खोटारड्या बोम्मई सरकारच्या मंत्र्यांना महाराष्ट्राचे उत्तर; मुंबईतील कानडी भाषिकांची आकडेवारी घ्या जाणून
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाने (Maharashtra Legislative Assembly) कर्नाटकच्या ठरावाला प्रत्युत्तर दिल्यामुळे बोम्मई सरकार (Bommai Government) खवळले आहे. त्यामुळे खोटारडे वक्तव्य केले जात आहेत. कर्नाटकचे उच्च शिक्षणमंत्री अश्वत्थ नारायण आणि कायदामंत्री माधुस्वामी यांनी गरळ ओकली. तसेच, २० टक्के कानडी लोकसंख्या (Kannada Population) असलेल्या मुंबईला केंद्रशासित (Mumbai Union Territory) प्रदेश म्हणून जाहीर करा, आव्हान दिले. मात्र, मुंबईत कानडी भाषिकांची कमाल संख्या ८ टक्केच असल्याचे समोर आले आहे.

कर्नाटकचे मंत्री, आमदार यांची दंडेली अजून थांबलेली नाही. ते सतत महाराष्ट्रविरोधी वक्तव्ये करीत असल्याने त्यांचा तीव्र निषेध करावा आणि सभागृहाच्या भावना केंद्रापर्यंत पोहोचवाव्यात. तसेच कर्नाटकला तंबी देण्यात यावी, असे अजित पवार (Ajit Pawar)  म्हणाले. तर, कर्नाटक सरकारने आव्हानाची भाषा करू नये. दावे करणाऱ्या तेथील मंत्र्यांना कर्नाटक सरकारने समज द्यावी. मुंबई ही कुणाच्या बापाची नाही, महाराष्ट्राची आहे. बाळासाहेब ठाकरे यांनीही मुंबईचे संरक्षण केले. १०५ हुतात्म्यांचे बलिदानही विसरता येणार नाही. महाराष्ट्राच्या बाजूने न्याय मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सर्व ताकद लावली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उत्तर दिले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत दिल्लीत झालेल्या बैठकीत दोन्ही राज्यांकडून नव्याने दावे केले जाणार नाहीत असे ठरले होते. तरीही कर्नाटकमधील मंत्री, आमदार करत असलेली वक्तव्ये बैठकीशी विसंगत आहेत. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती कुणाच्या बापाची नाही. मुंबईवर कुणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही. कर्नाटकचे मंत्री आणि आमदारांना निषेधाचे पत्र पाठवू. केंद्रीय गृहमंत्र्यांनाही पत्र लिहून या बोलघेवड्यांना तंबी देण्याची मागणी करू, असे फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठातील कन्नड विभागाच्या प्रमुख प्रा.जी. एन. उपाध्ये यांच्या मते, २०११ च्या जनगणनेप्रमाणे तेव्हा मुंबईत कन्नड भाषकांची संख्या ५ लाख होती. आता १० वर्षांत ही संख्या ९ लाखांवर गेली. सध्या मुंबईसह उपनगरांत २१ लाख कानडी नागरिक राहतात. २०११ मध्ये मुंबईची लोकसंख्या १.२५ कोटी होती. २०२२ मध्ये ती २.७१ कोटी गृहीत धरली तरी यात कानडी लोकसंख्येचे प्रमाण ८ टक्के आहे.

Web Title: Maharashtras reply to bogus karnataka government ministers know the statistics of kannada speakers in mumbai nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2022 | 10:21 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Ajit Pawar: अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना
1

Ajit Pawar: अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे, अजित पवारांच्या सूचना

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार; ‘या’ दोन नेत्यांचा अजित पवारांच्या पक्षात प्रवेश
2

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार; ‘या’ दोन नेत्यांचा अजित पवारांच्या पक्षात प्रवेश

Kolhapur News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यात ताकद वाढणार: अजित पवार
3

Kolhapur News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यात ताकद वाढणार: अजित पवार

Shivsena : राज ठाकरेंना मोठा झटका, दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
4

Shivsena : राज ठाकरेंना मोठा झटका, दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.