Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Shinde : शिंदेंना सभापतीपदावरून हटवा, महाविकास आघाडीचं पत्र, नेमकं कारण काय?

विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेत्यांचे हक्क डावलले जात असून त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे, राम शिंदे यांना सभापती पदावरून हटवण्याची मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 19, 2025 | 07:12 PM
शिंदेंना सभापतीपदावरून हटवा, महाविकास आघाडीचं पत्र, नेमकं कारण काय?

शिंदेंना सभापतीपदावरून हटवा, महाविकास आघाडीचं पत्र, नेमकं कारण काय?

Follow Us
Close
Follow Us:

विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे सभागृहाचं कामकाज पक्षपाती व एकांगी चालवत आहेत. सभागृहाचं कामकाज नियमानुसार होत नाही. विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेत्यांचे हक्क डावलले जात असून त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे, राम शिंदे यांना सभापती पदावरून हटवण्याची मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानपरिषदेतील सभापती आणि तालिका सभापती चित्रा वाघ यांच्यावर देखील एककलमी कार्यक्रमाचे गंभीर आरोप करत दोघांनाही पदावरुन हटविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आमदारांनी आपल्या सहीचे पत्रही सभापतींना पाठवलं आहे.

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 183 (ग) व म.वि.प. नियम 11 नुसार आम्ही पुढील प्रस्तावाची सूचना देत आहोत. “महाराष्ट्र विधानपरिषदेचे मा. सभापती प्रा.राम शिंदे हे सभागृहाचे कामकाज करताना पक्षपाती व एकांगीपणे कामकाज चालवत आहेत. सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नाही, विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेते यांचे हक्क डावलले जात असल्याने त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. तरी सभापतींना पदावरून दूर करण्यात यावे.”, असा मजकूर दानवे यांनी दिलेल्या पत्रातून लिहिण्यात आला आहे.

विधानपरिषदेतही महाविकास आघाडीचे आमदार संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. विधानपरिषदेत विरोधक आमदारांनी सभात्याग करून ते सभागृहाबाहेर आले होते. विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध 5 मार्च रोजीच अविश्वास प्रस्ताव दिला होता. मात्र, काल हा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. त्यावरूनही विरोधी पक्षातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, आज कुठेही सभागृहाच्या कार्यक्रमात नसताना भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी गोऱ्हे यांच्यावर विश्वास ठराव मांडला आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे त्यांचा त्यांना माज आहे, रेटून त्यांनी गोऱ्हे बद्दलचा विश्वास ठराव मंजूर करून घेतला. आम्हाला कुठली बोलण्याची संधी त्यांनी दिली नाही, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी विरोध दर्शवला.

लोकशाही असल्याने विरोधी पक्षाच्या एका जरी आमदाराला भूमिका मांडू दिली पाहिजे. सभागृहात मुख्यमंत्री होते, विधान परिषद अध्यक्ष होते. मात्र, विरोधी पक्षातील आमदारांना बाजू मांडू दिली नाही. त्यामुळे, सभापती यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी अविश्वास ठराव मांडला असून आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, उद्या विधान परिषदेचे कामकाज देखील काळ्याफिती लावून करणार आहोत. उपसभापती जेव्हा सभापतीच्या खुर्चीवर बसतील तेव्हा एकही महाविकास आघाडीचा आमदार सभागृहात बसणार नाही, अशी भूमिका मविआच्या आमदारांनी घेतली आहे.

दरम्यान, विरोधी पक्षातील शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही सभागृहातील वादावर भूमिका मांडली. दोन्ही सभागृहात मनमानी कारभार सुरु आहे. आम्ही प्रश्न विचारले तर मंत्रीच नसतात, मग बोलून, विषय मांडून फायदा तरी काय? वरच्या सभागृहात अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला तरी रेटून नेण्याचं काम हे सत्ताधारी लोकांककडून केलं जातय. महाराष्ट्राचे मणिपूर बनवण्याचा प्रयत्न हे सरकार करतय, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Web Title: Mahavikas aaghadi mla letter to remove ram shinde from maharashtra vidhan parishad speaker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 07:12 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Mahavikas Aghadi
  • ram shinde

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
2

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
3

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा
4

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.