Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! मराठी भाषेबाबात सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सर्व सरकारी कार्यालयांमध्ये….

मराठी भाषा संवर्धनासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिर्वाय करण्यात आलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 03, 2025 | 09:42 PM
मोठी बातमी! मराठी भाषेबाबात सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सर्व सरकारी कार्यालयांमध्ये....

मोठी बातमी! मराठी भाषेबाबात सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सर्व सरकारी कार्यालयांमध्ये....

Follow Us
Close
Follow Us:

मराठी भाषा संवर्धनासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिर्वाय करण्यात आलं आहे. मराठा भाषा बोलणे आणि मराठी व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा सरकारचा उद्देश आहे. शासकीय कार्यालयात सर्वत्र मराठी फलक असणार आहेत. तसेच मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्त भंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल संशयास्पद? EVM च्या याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

मराठी भाषेला अलिकडेच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. मराठी भाषेचे महत्त्व टीकविण्यासाठी मराठी बोलणे आणि मराठीत व्यवहार करणं आवश्यक आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मराठी भाषेचं संवधर्न करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्राच्या सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयात मराठी बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला.

मराठी भाषा बोलण्याबद्दल दर्शनी भागात फलक लावावा लागणार आहे. शासकीय कार्यालयांतील संगणकावरील कळफलक देखील मराठी भाषेतच लावण्यात येणार आहेत. मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. महाराष्ट्र राज्यभाषा अधिनियम, १९६४ अनुसार सर्व शासकीय कार्यालयांतील मूळ प्रस्ताव, सर्व पत्रव्यवहार, टिप्पण्या, आदेश, संदेशवहन मराठीतच असतील आणि कार्यालयीन स्तरावरील सर्व प्रकारची सादरीकरणे आणि संकेतस्थळे मराठीत असतील याची काळजी घेण्याचे आदेश सरकारने पारित केले आहेत. मराठी भाषा धोरणाच्या जिल्हा स्तरावरील अंमलबजावणीचं काम जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीकडे सोपवण्यात येणार आहे.

Chandrahar Patil: …तर पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे; महाराष्ट्र केसरी वादावर चंद्रहार पाटलांची संतप्त प्रतिक्रिया

केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये आणि सर्व बँका इत्यादींमध्ये दर्शनी भागात लावण्यात येणारे सूचनाफलक, अधिकाऱ्यांचे नामफलक, अर्ज नमुने मराठीतून असणे अनिवार्य करण्यात आले आहे. शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांची तसेच महामंडळे, मंडळे, शासन अंगीकृत उपक्रम, कंपन्या यांची शासनाने (मंत्रिमंडळाने) निश्चित केलेली मराठी नावेच आस्थापनांच्या कामकाजात वापरली जातील. नवीन नावे निश्चित करताना मराठीतील एकच नाव निश्चित केले जाईल. त्याचे इंग्रजीत भाषांतर न करता रोमन लिपीत केवळ त्याचे रुपांतर करण्यात येईल. ज्या आस्थापनांना द्विभाषिक नावे आहेत त्यांचा कारभार यापुढे मराठी नावाने होईल असं सरकारने म्हटले आहे. त्यामुळे आता मराठी भाषा संवर्धनाला अधिक बळ मिळणार आहे.

Web Title: Mahayuti government big decision marathi speaking mandatory in all government offices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 09:25 PM

Topics:  

  • maharashtra government decision
  • Mahayuti Governmet

संबंधित बातम्या

Breaking News : अखेर हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द, लोकभावनेपुढे सरकारची नरमाईची भूमिका
1

Breaking News : अखेर हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द, लोकभावनेपुढे सरकारची नरमाईची भूमिका

तुम्ही अद्याप e-KYC केलं नाही का? तर लवकर करून घ्या; अन्यथा रेशनकार्ड होणार बंद
2

तुम्ही अद्याप e-KYC केलं नाही का? तर लवकर करून घ्या; अन्यथा रेशनकार्ड होणार बंद

‘लाडकी बहीण’नंतर राज्यातील महिलांसाठी सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय; आता महिलांना…
3

‘लाडकी बहीण’नंतर राज्यातील महिलांसाठी सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय; आता महिलांना…

आनंदाची बातमी ! आता 35 लाख नवीन घरे उभारली जाणार; राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी
4

आनंदाची बातमी ! आता 35 लाख नवीन घरे उभारली जाणार; राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.