ईव्हीएमविरुद्धच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी (फोटो- टीम नवराष्ट्र)
Prakash Ambedkar: महाराष्ट्र विधानसभेचा निकाल मागच्या वर्षी जाहीर झाल्यापासून विरोधक या निकालावर शंका घेत आहेत. ईव्हीएममध्ये फेरफार असल्याचे आरोप केले जात आहेत. महाविकास आघाडीला त्यांचा झालेला पराभव मान्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. विरोधक ईव्हीएमवर आक्षेप घेताना दिसून येत आहेत. याबबात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत नेमके काय काय घडले आहे ते जाणून घेऊयात.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा जोरदार विजय झाला. 200 पेक्षा जास्त जागा जिंकत महायुतीने राज्यात प्रचंड मोठ्या बहुमताने सरकार स्थापन केले आहे. मात्र अनेकांनी या निकालावर संशय व्यक्त केला. ईव्हीएममध्ये फेरफार याबाबत हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी पार पडली. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजल्यानंतर झालेल्या मतदानावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. याविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याच्या वाजुने वकील प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली. त्यांनी ईव्हीएमबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात युक्तीवाद केला. निवडणूक आयोगाने नियमांचे पालन केले नाही असा युक्तीवाद करण्यात आला.
हेही वाचा: EVM Machine : विधानसभेचा निकाल संशयाच्या भोवऱ्यात! महाविकास आघाडीबरोबर मनसेला देखील EVMवर संशय
विधानसभेचा निकाल संशयाच्या भोवऱ्यात
राज्यामध्ये विधानसभा निवडणूका झाल्या असल्या तरी राजकारण रंगले आहे. महायुतीला न भूतो न भविष्यती असा विजय मिळाला आहे. 288 जागांपैकी 230 जागांवर महायुतीने विजय मिळवला. पण आता या निकालावर संशय व्यक्त केला जात असून ईव्हीएम मशीनवर संशय घेतला जात आहे.
हेही वाचा: EVM Machine: “ईस्त्रायली कंपनीच्या माध्यमातून मतदान यंत्रात…”; प्रशांत जगतापांचा मोठा आरोप
यंदाची निवडणूक ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. अटीतटीचा सामना होण्याची शक्यता असताना एकतर्फी निकाल हाती आला आहे. राज्यामध्ये भाजपला तब्बल 132 जागा मिळाल्या आहेत. तर शिंदे गटाला 57 आणि अजित पवार गटाला 41 जागांवर विजय मिळाला आहे. महायुतीच्या या अफाट यशामुळे विरोधी पक्षनेता पदावर दावा देखील करण्यात महाविकास आघाडीच्या कोणत्याच पक्षाला शक्य झाले नाही. त्यामुळे मविआने ईव्हीएम घोटाळ्याचा मुद्दा ऐरणीवर आणत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर आज सुनावणी पार पडली आहे.