कोरेगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील आपले संघटन बळकट करण्यासाठी एकीकडे शिर्डी येथे चिंतन शिबिरामध्ये व्यस्त असताना कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दे धक्का दिला आहे. वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सदस्य डॉ. अभय तावरे यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मुंबईत वर्षा निवासस्थानी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर येथे प्रवेश केला.
भाडळी खोऱ्यातील ज्येष्ठ नेते विजयराव घोरपडे, पंचायत समितीचे माजी सदस्य विलासकाका पवार आणि राजूआप्पा घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोलवडी विकास सोसायटीचे अध्यक्ष भानुदास भोसले, किन्हई येथील ज्येष्ठ नेते सुनीलबापू भोसले, भाडळेचे माजी सरपंच धनंजय तारळकर, किरण घोरपडे, रामभाऊ निकम, अरविंद तारळकर, महेश चव्हाण, निलेश जाधव, सचिन जाधव, वैभव भोसले, राजेंद्र वायदंडे, आकाश खाडे, अमोल भोसले, दिलीप भोसले, सचिन भोसले, संजय भोसले, शरदभाऊ भोसले, सुनीलराव घोरपडे, हनुमंतराव जाधव, अविनाश यशवंत मोहिते, राजू साळुंखे, सचिन फणसे, चंदूकाका पवार, अनिल अवचिते, रमेश कलाटे, शांताराम चाटे, आदित्य तावरे, सुनील धुमाळ यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेची ताकद वाढविणार : डॉ. तावरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार महेश शिंदे यांनी डॉ. अभय तावरे, सुनीलबापू भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हातात भगवा झेंडा देवून स्वागत केले. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आमदार महेश शिंदे यांच्या कामाची पद्धत पाहून आणि सर्वसामान्यांचा विकास करण्याची त्यांची हातोटी लक्षात घेऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यकाळात कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आणि वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटात बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद वाढविणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची ध्येय धोरणे आणि विचारधारा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचविणार असल्याची ग्वाही डॉ. अभय तावरे यांनी यावेळी दिली.