नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल होऊन ४ ट्रक एकमेकांवर आदळले; एकाच मृत्यू, ४ गंभीर
या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्रक एकमेकांना धडकल्याने एका ट्रकचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला. यामुळे एक व्यक्ती ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकून पडली. स्थानिकांनी तातडीने बचावकार्य सुरू करत त त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी पुढे येत जखमींना मदत केली.
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, पण पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी घठनास्थळी दाखल होत, अपघात ग्रस्त वाहने बाजूला केली. त्यानंतर काही वेळात वाहतूकदेखील सुरळीत करण्यात आली. नवले पूल आणि भूमकर पूल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे पुन्हा एकदा वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.






