एलबीएचएम बुद्धिबळ स्पर्धा (फोटो- istockphoto)
एआयसीएफ, फिडे, एमसीए आणि पीडीसीसी यांच्या मान्यतेखाली होणाऱ्या या स्पर्धेत एकूण १६,१६,१६० रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्वीस लीग पद्धतीने नऊ फेऱ्यांमध्ये स्पर्धा होणार आहे. खुला गट, रॅपिड, १७०० पेक्षा कमी रेटिंग आणि ब्लिट्झ अशा प्रकारांत सामने होतील.खुल्या गटातील सामने १० ते १४ नोव्हेंबर, ब्लिट्झ १४ नोव्हेंबर, रॅपिड १५ नोव्हेंबर, तर १७०० पेक्षा कमी रेटिंगची स्पर्धा १६ ते १८ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे.
जिद्दीपुढे अडचणीही फिक्या! १०६ विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय Chess स्पर्धेत सहभाग; गौरव फुलसुंदर अव्वल
आंतरराष्ट्रीय मास्टर मोहम्मद इम्रान (२४७५), सुयोग वाघ (२२७५), कशिश जैन (२२५३), संकेत चक्रवर्ती (२२२०), निखिल दीक्षित (२१४२), साक्षी चितलांगे (२१२९), भवन कोल्ला (२२१५), प्रथमेश शेरला (२०८५) आणि अनय पिंपरकर (१६९५) यांच्यासह अव्वल खेळाडू सहभागी झाले आहेत. आयए नितीन शेणवी मुख्य पंच, तर आयए आम्रीश तल्लू उपमुख्य पंच म्हणून काम पाहणार आहेत.
जिद्दीपुढे अडचणीही फिक्या!
अखिल मराठी प्रज्ञाचक्षू बुद्धिबळ संघटना (एमसीएव्हीसी) आणि पुण्यातील स्वामी विवेकानंद जीवन ज्योत संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी देवाची येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय खुली दृष्टिहीन विद्यार्थ्यांची बुद्धिबळ स्पर्धा (Sports) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या तब्बल १०६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होत बुद्धिबळाच्या पटावर आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले.
Mumbai Mayor Cup: बुद्धिबळाच्या पटावर युवा खेळाडूंचा जलवा! अर्जुन कुलकर्णी, अहान काटरुका गटविजेते
मुंबई, नांदेड, सोलापूर, अमरावती यांसह महाराष्ट्रातील विविध भागांतून मुला-मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. एकूण १०६ विद्यार्थ्यांनी बुद्धिबळाच्या पटावर आपले कौशल्य पणाला लावत स्पर्धेत रंगत आणली.
Ans: एलबीएचएम बुद्धिबळ महोत्सव स्पर्धेत १२०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.
Ans: एलबीएचएम बुद्धिबळ महोत्सव स्पर्धेत १६,१६,१६० रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.






