दरोड्याच्या तयारीत असलेल्या तरुणांना अटक
नागपूर : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक केली आहे. यात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर श्रीराम काळुसे (वय 50) आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी (तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी), रोहिणी विठोबा कुंभार (वय 49) यांचा समावेश आहे. दोघांनी मूळ शालार्थ आयडी तयार नसताना आर्थिक फायद्यासाठी 398 शिक्षकांचे पगार काढून शासनाची 100 कोटींनी आर्थिक फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोगस शालार्थ आयडी प्रकरणात रवींद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे तपासास सुरुवात झाली. तपासात जवळपास साडेसहाशे आयडी बोगस असल्याची बाब समोर आली. त्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी काळुसे यांनी 15 मार्च 2024 या दरम्यान तब्बल 154 शिक्षकांचे शालार्थ आयडी तयार झाले नसताना त्यांचे पगार काढण्याची प्रक्रिया केली.
याशिवाय, रोहिणी कुंभार यांनी 21 मार्च 2022 ते 15 मार्च 2024 या दरम्यान 244 शिक्षकांचे प्रस्ताव बोगस असताना, त्यांना अशाच प्रकारे वेतन दिले. त्यातून सरकारची 100 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली. या सर्व प्रक्रियेत त्यांचा सहभाग सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम सुतार यांना आढळून आल्याने त्यांनी बुधवारी काळुसे आणि कुंभार यांना अटक केली. चौकशीसाठी बोलावून गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली.
आरोपींची संख्या झाली 14 वर
या प्रकरणात आरोपींची संख्या 14 झाली आहे. आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये माजी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, चिंतामण वंजारी, वैशाली जामदार यांच्यासह शिक्षणाधिकारी, 4 कर्मचारी, दोन संस्थाचालक व दोन आणि शिक्षकांना अटक केली.