नवी दिल्ली : भारत आणि कॅनडामधील बिघडलेले संबंधाबाबत आता नवीन अपडेट समोर आल्याचे दिसून आले आहे. तणावाचे वातावरण सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने दोन महिन्यांनतर कॅनडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
निज्जर यांची हत्या भारतीय गुप्तहेर एजन्सीने केल्याचा आरोप
खलिस्तानी दहशतवादी निज्जर यांची हत्या भारतीय गुप्तहेर एजन्सीने केल्याचा आरोप कॅनडाने केला होता. भारताने हे आरोप फेटाळून लावले होते. कॅनडाच्या दाव्यामुळे दोन्ही देशांमध्ये संबंध आतापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तरावर गेले होते. भारताने दोन महिन्यांपूर्वी कॅनडियन नागरिकांना व्हिसा देण्यास बंदी आणली होती. कॅनडाने या निर्णयामुळे नाराजी व्यक्त केली होती.
संबंध सुधारण्यासाठी भारताचे सकारात्मक पाऊल
कॅनडासोबतचे संबंध सुधारण्यासाठी भारताने हे सकारात्मक पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. फ्री प्रेस जनरलने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. व्यावसायिक कामासाठी अनेक कॅनडियन नागरिक भारतात येत असतात. भारत सरकारच्या या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.
Web Title: Major improvement in india canada relations visa service resumes after two months nryb