Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्यूबेक सोबतच्या भागीदारीतून महाराष्ट्रात होणार मोठी गुंतवणूक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास!

महाराष्ट्र ही भारतामध्ये वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. देशात येणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ४० टक्के परकीय गुंतवणुक ही महाराष्ट्रात येते. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, क्वांटम कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, खाण संशोधन या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी असून महाराष्ट्र क्युबेकसोबत भागिदारी करण्यात येणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 03, 2026 | 07:28 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र ही भारतामध्ये वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. देशात येणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ४० टक्के परकीय गुंतवणुक ही महाराष्ट्रात येते. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, क्वांटम कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, खाण संशोधन या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी असून महाराष्ट्र क्युबेकसोबत या क्षेत्रासाठी भागीदारी करण्यास तयार आहे. या भागीदारीतून राज्यात निश्चितच मोठी गुंतवणूक येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

India Policy मध्ये अचानक मोठा ‘टर्न’! चिनी कंपन्यांना थेट सरकारी प्रकल्पांमध्ये बोली लावायला दिली?

महाराष्ट्र – क्यूबेकमधील संबंध दृढ करण्याचे प्रतिक

कॅनडातील क्युबेक प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार मंत्री क्रिस्टोफर स्किट यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळासमवेत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २०१८ मध्ये मॉन्ट्रियल येथे भेट दिली असता, त्यावेळी माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीनीकरणीय ऊर्जा, जैवतंत्रज्ञान तसेच आदिवासी कल्याण या विषयावर सामंजस्य करार करण्यात आले होते. हे करार महाराष्ट्र आणि क्यूबेकमधील संबंध अधिक दृढ असल्याचे प्रतीक आहे. तसेच नुकतेच कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नेतृत्वात आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाशी मुंबई भेटीदरम्यान महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी विषयी सकारात्मक चर्चा झाली होती.

क्यूबेकमधील गुंतवणूकदारांना मोठी संधी

नवी मुंबईमध्ये एज्युसिटी उभारण्यात येत असून या ठिकाणी सर्व आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे.या एज्युसिटीमध्ये क्यूबेकमधील विद्यापीठांनी आपली दालने उघडून ‘मायनिंग इंजीनियरिंग’ या विषयाशी संबंधित अभ्यासक्रम विशेषत्वाने सुरू करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यामध्ये पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसह वाढवण बंदर प्रकल्पावर काम सुरू आहे. राज्यामध्ये गुंतवणूक करून उद्योग उभारण्यासाठी सुलभ धोरण आहे. राज्यातील गुंतवणूक ही दीर्घकालीन अनुकूल परिणाम देणारी आहे. ‘क्रिटिकल आणि स्ट्रॅटेजिक मिनरल्स’ मध्ये गुंतवणुकीची क्यूबेकमधील गुंतवणूकदारांना मोठी संधी आहे.

नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र पुढे येतोय

एरोस्पेस, डिफेन्स या क्षेत्रातही राज्यामध्ये मोठे काम होत आहे. नागपूर परिसरात ‘डिफेन्स कॉरिडोर’ ची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे एरोस्पेस क्षेत्राची परिसंस्था वेगाने विस्तारित होत आहे. त्याचप्रमाणे जीसीसी, डेटा सेंटर, बॅटरी स्टोरेज, कृषी मधील नवीन तंत्रज्ञान या क्षेत्रातही महाराष्ट्र पुढे येत आहे. त्यामुळे क्यूबेकने महाराष्ट्रसोबत दीर्घकालीन भागीदारी करावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.

क्युबेक महाराष्ट्रासोबत भागीदारी

क्युबेक प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार मंत्री क्रिस्टोफर स्किट म्हणाले की, क्यूबेक कॅनडामध्ये प्रगत राज्य असून कृत्रिम बुद्धिमत्ता, डाटा सेंटर, शिक्षण, क्रिटिकल मिनरल्स यामध्ये मोठी गुंतवणूक आहे. क्युबेक महाराष्ट्रासोबत विविध क्षेत्रांमध्ये भागीदारी करण्यास तयार आहे. पेन्शन फंड संस्थेच्या माध्यमातून भारतामध्ये मोठी गुंतवणूक करण्यास क्युबेकने तयारी केली आहे. भागीदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यात रस असल्याचेही स्किट यांनी सांगितले.

यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबळगन, राजशिष्टाचार विभागाचे सचिव राजेश गवांदे, कॅनडातील क्यूबेक प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार सहाय्यक उपमंत्री डॉमिनिक मार्कोट्टे, सल्लागार श्रीमती लिया फर्टीन, संचालक मायकल कॉन्स्टेनिन, स्टीफन फलेक्कर, क्यूबेक प्रांतातील सीडीपीक्यू गुंतवणूक संस्थेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक नटराजन वेंकटरमण आदी उपस्थित होते.

Post Office च्या ‘या’ योजनेत पंतप्रधान मोदीही करतात गुंतवणूक, केवळ व्याजातून होते लाखोंची कमाई

Web Title: Maharashtra quebec canada partnership investment devendra fadnavis marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Business News
  • Canada
  • Canada News
  • India Canada row
  • Marathi News

संबंधित बातम्या

Dexogrowचा नवा फ्लेवर धमाका! मुलांच्या पोषणासाठी नवा पर्याय; व्हॅनिला अन् चॉकलेट सॅशे भारतात लाँच
1

Dexogrowचा नवा फ्लेवर धमाका! मुलांच्या पोषणासाठी नवा पर्याय; व्हॅनिला अन् चॉकलेट सॅशे भारतात लाँच

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन
2

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच
3

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच

गिफ्टिंगमध्ये नवा ट्रेंड! CoverSure कडून विमा भेटीचा पर्याय; 12 महिन्यांत 1 दशलक्ष कुटुंबांचे लक्ष्य
4

गिफ्टिंगमध्ये नवा ट्रेंड! CoverSure कडून विमा भेटीचा पर्याय; 12 महिन्यांत 1 दशलक्ष कुटुंबांचे लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.