Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malegaon Sugar Factory Elections: ‘मी चांगलं काम करेल का ८५ वर्षांचा माणूस?’ अजित पवारांचा निशाणा कुणावर?

माळेगाव नगरपंचायतीसाठी गेल्या चार वर्षांत ३५० कोटी रुपये दिले. एक्ससाईज डिपार्टमेंट कोणाकडे आहे? अजित पवारकडेच. सगळं आपल्या हातात आहे. आता राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 15, 2025 | 09:45 AM
'माळेगाव'च्या अध्यक्षपदावर अजितदादा आज होणार विराजमान

'माळेगाव'च्या अध्यक्षपदावर अजितदादा आज होणार विराजमान

Follow Us
Close
Follow Us:

Malegaon Sugar Factory Elections: “अजित पवारला पैशाची गरज नाही, बापजाद्याच्या कृपेने बरं चाललं आहे. मी सत्तेला हापापलो नाही. मी चांगलं काम करेल का ८५ वर्षांचा माणूस?” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८५ वर्षांचे विरोधक चंद्रराव तावरे यांना टोला लगावला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना अजित पवार  बोलत होते.

बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकीनिमित्त कारखान्याच्या सदस्यांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माझं पॅनेल निवडून दिलं, तर मी चेअरमन असेन. मग साखर आयुक्त काय करेल? सहकार मंत्री काय करेल?” असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत सभासदांना आपल्याच पॅनेलला मतदान करण्याचे आवाहन केलं.

Kedarnath Helicopter Crash: मोठी बातमी! केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; सर्व सात जणांचा मृत्यू

एकदा कारखान्याचा चेअरमन झालो तर कामगारांचे प्रश्न योग्य पद्धतीने मार्गी लावेन, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. “डायरेक्टर चुकला तरी चिंता नाही, मी आहे ना. काय करायचं ते मी करेन,” असं म्हणत त्यांनी आपल्या कार्यक्षमतेवर भर दिला.  अजित पवार म्हणाले,  “काही दिवसांपूर्वी एक महिला माझ्याकडे आली होती.  एक व्यक्ती त्रास देत असल्याचे तिने सांगितलं.  मी तिला म्हणालो, बिनधास्त घरी जा, उद्या तो तुझी माफी मागेल. आणि खरंच, तसंच झालं,” अशी आठवण सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपले शब्द खरे ठरल्याचं सांगितलं.

तसेच, “मी सांगितलं होतं ना सोमेश्वर कारखाना बाहेर काढला नाही, तर फॉर्म भरणार नाही. मग आधी कारखाना बाहेर काढला आणि नंतरच फॉर्म भरला. मी पाच वर्षे भत्ता घेणार नाही, असाही शब्द दिल्याचे अजित पवारांनी सांगितलं.  इतकेच नव्हे तर, अजित पवारला पैशाची गरज नाही. बापजाद्याच्या कृपेने बरं चाललं आहे. मी सत्तेसाठी हापापलो नाही.”

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी वाढ! गगनाला भिडल्या आजच्या किंमती, चांदीचा भाव स्थिर

वयाचा मुद्दा उपस्थित करत, “मी चांगलं काम करेल की ८५ वर्षांचा व्यक्ती? हे तुम्हाला ठरवायचं आहे.  असं म्हणत त्यांनी कारखाना निवडणुकीतील आपले विरोधक, 85 वर्षांचे चंद्रराव तावरे यांच्यावर निशाणा साधला. याआधीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच, “माळेगाव नगरपंचायतीसाठी गेल्या चार वर्षांत ३५० कोटी रुपये दिले. एक्ससाईज डिपार्टमेंट कोणाकडे आहे? अजित पवारकडेच. सगळं आपल्या हातात आहे. आता राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. अजित पवारची मान खाली घालायची की ताट ठेवायचं, हे तुम्हा सभासदांच्या हातात आहे,” असे म्हणत त्यांनी पॅनेलला विजयी करण्याचं आवाहन केलं.

“छत्रपती कारखान्याचे चेअरमन होण्याची माझी इच्छा होती, पण आता पुढची पाच वर्षं अजित पवारच चेअरमन असणार आहेत,” अजित पवार यांनी माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत आपल्या पॅनेलला पाठिंबा देण्याचे आवाहन केलं.

Web Title: Malegaon sugar factory elections ajit pawar again targets chandrarao tavaren raising the issue of age

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 09:45 AM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati news
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
2

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका
3

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक
4

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.